नाटक गोधड़ी - दर्शक का प्रतिसाद !
बड़ी बहस चलती है मनोरंजन होना चाहिए नाटक में, वैचारिक नाटक देखने दर्शक नहीं आते आदि आदि ... उन सबको किनारे करते हुए नाटक को मुख्यधारा में स्थापित करता है ‘थिएटर ऑफ़ रेलेवंस’ नाटय सिद्धांत ! पढ़िए,समझिये और ‘थिएटर ऑफ़ रेलेवंस’ के रंग आंदोलन से जुड़िये !
.....
प्रिय अश्विनी
आपला प्रत्यक्ष संवाद होण्यापूर्वी मी नुकतेच "गोधडी" बद्दल ऐकले होते. मला खूप उत्सुकता होती काय आहे हे गोधडी नाट्य ? कशी साकारली असेल ही गोधडी ? आणि काय योग आला की दुसऱ्याच दिवशीची आपली भेट 'गोधडी' होऊन आली, आपल्या संवादात ती उलगडली आणि प्रत्यक्ष नाटक पाहून ती पांघरूनच मी नाट्यगृहातून बाहेर पडले.
मला गोधडी चा प्रयोग खूप आवडला. जिज्ञासूपणे संस्कृतीचा शोध घेत काळानुसार सगळ्या विषयांना भावनिक स्पर्श करत करत केव्हा सद्यपरिस्थिती पर्यंत येऊन पोहोचलो कळलेही नाही. संपूर्ण प्रयोगाचा एकसंध परिणाम जाणवला. जिज्ञासा ही सत्याला शोधत असते, सत्याचा प्रकाश हा विद्येच्या वाटेवर असतो. आपण सगळे विद्यावंत, अभ्यासू, जाणकार आहात. शंभर टक्के उजेड नाही गवसला तरी शोध थांबत नसतोच. तो अखंड आहे. या नाटकामुळे तुमच्या शोध यात्रेत आम्हा प्रेक्षकांनाही जोडलत त्याबद्दल धन्यवाद! सगळ्यांची विचार चक्र फिरू लागली. परवा तुमच्या प्रयोगाला मिळालेली भरभरून दाद हीच तुमची यशस्वीता.
नाटकात वेगळे संगीत, बदलती वेशभूषा, नेपथ्य, हे नसल्याची पुसटशीही जाणीव होत नाही. दमदार लेखन, उत्कृष्ट संवाद साधणारे सर्व कलाकार, त्यांचे भावपूर्ण अभिनय, रंगमंचावरचा वावर, प्रवाही नाट्य या सगळ्या गोष्टी अगदी कौतुकास्पद आहेत.
नाटक डॉट वेळेवर सुरू होणे, लेखक, दिग्दर्शक मंजुल भारद्वाज यांचा नाटक सुरू होण्यापूर्वी आणि नंतर चा प्रेक्षकांबरोबरचा संवाद ही गोष्ट मनाला भावली. प्रेक्षक आणि नाटकातले कलाकार यांच्यातला अंतर नाहीसं करणं आहे हा हेतू आवडला. नवनवीन प्रयोगांसाठी लक्षलक्ष शुभेच्छा !!
आपण असेच जोडलेले राहू. अशा सगळ्या कलांमुळे आपण नुसतं वागण्याच्या जगातून समृद्ध जगण्याकडे वळतो हे माझं प्रामाणिक मत आहे. तुमचं आमच्या घराशी जोडलं जाणं हे आमच्यासाठी 'फिक्स डिपॉझिट' आहे. संपूर्ण टीमला धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
- सुहास यशवंत नाशिक

No comments:
Post a Comment