'अनहद नाद...'चा रंगसंवाद
रविवार, १४ जून २०१५
प्रहार
रंगभूमीवर वेगवेगळ्या कलाकृती सादर होत असतात. त्या माणसांच्या प्रश्नांवर, त्यांच्या जगण्यावर भाष्य करत असतात. असाच एक दीर्घाक २९ मे रोजी पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये सादर करण्यात आला. 'अनहद नाद - अन् हर्ड साऊंड्स ऑफ यूनिवर्स' या बहुभाषिक नाटकाचा फक्त प्रयोग सादर केला नाही, त्या नाटकाने रसिकांशी संवादही साधला. हा दीर्घाक म्हणजे स्त्री जाणिवा, पर्यावरण, संस्कृती, परंपरेची एका कॅनव्हासवर साकारलेली, वेगवेगळ्या रंगाविष्काराची काव्यात्मक चित्रकलाकृतीच.
आवाज, नाद, ध्वनी, अंधार, रात्र, काप्तवा, चंद्र, सूर्य, नदी, वसुंधरा अशा एक-दोन नव्हे अनेक संज्ञांचा गुंता. आधी त्यात गुंतवून ठेवणे आणि नंतर त्याची सोडवणूक करणे, माणसाच्या जगण्यात असे अनेक गुंठे असतात, अर्थात, हे गुंते सुटणारे नसतात, ते सोडवता सोडवता चाटघाला येतो वैताग. याच मुल्यांचे कलात्मक सादरीकरण करून कलावंतांच्या जगण्याची गोष्ट वा दीर्घाकात मांडली आहे. स्त्री कलावंत, तिच्या जगण्याची गोष्ट, तिच्या अस्तित्वाची गोष्ट, लिला परंपरेत जखडून ठेवल्याची गोष्ट आकार घ्यायला लागते आणि ती परखडपणे व्यक्त होत जाते. 'कृष्णाने मला नाही, मी कृष्णाला जन्म दिला. ग्रह मला प्रभावित करत नाही, भी ग्रहांना प्रभावित करते. मी नियतीला बदलण्याची ताकद ठेवते. मी जननी आहे. भी वसुंघरा अआहे, मी प्रकृती आहे, असे स्त्रियांचे सामर्थ्य सांगणारे मनोगत या नाटकात येते. परंपरा आणि
संस्कृतीवर प्रहार करते. स्त्रियांचा हा आत्मविश्वास सांगून हे नाटक थांवत नाही, तर कलावंतांच्या माध्यमातून सुंदर विश्वनिर्मितीचे आशादायी स्वप्नही विणणते.
ही कलाकृती सादर करताना तंत्राचा खूप वापर न करता संवाद सामर्थ्य, कोरिओग्राफी आणि नेटक्या पार्श्वसंगीताद्वारे श्रीमंत इशली आहे. त्यातून नाटकाला तरलता, लयबद्धतेची आखीव रेखिय किनार चढवली गेली आहे. वर उल्लेख केलेल्या वेगवेगळ्या संज्ञा प्रयोगभर आपल्याলা भेटत राहतात. त्याची महानता, त्याची ताकद, त्या
संज्ञांतून माणसांचा संघर्ष ताकदीने सादर करण्यात आला आहे.
हे नाटक आपल्याला अनेक प्रश्नांत अडकवते, ते प्रश्न आपल्या अवतीभवतीचे आहेत, त्यामुळे ते जवळचे वाटतात, हे सारे प्रभावी संवादाच्या आणि अभिनयाच्या ताकदीवर विणण्यात आले आहे. दि एक्सपेरिमेंटल थिएटर फाऊंडेशन निर्मित, मंजुल भारद्वान लिखित आणि दिग्दर्शित हा दीघाँक योगिनी चौक, अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, वैशाली भोसले, कोमल खामकर, अमित डियोडी आणि संदेश यांच्या अभिनयाने ती आविष्कृत झाली आहे. हे नाटक माणसाच्या जगण्यावर चोलता बोलता पर्यावरणातील वेगवेगळ्या घटकांवर होणान्या आधातांवर भाष्य करते. ती आधात करणारी माणसे पर्यावरणाच्या हासाकडे कसे नकळत दुर्लक्ष करतात आणि माणसाच्या विध्वंसासाठीच कसे कारणीभूत ठरतात, याचीही जाणीव ही कलाकृती करून देते. ही कलाकृती फक्त कलावंतांची नाही तर ती रसिकांना आपणही या कलाकृतीतील भूमिकेत आहोत, याची प्रचिती देते. है या दोघांकाचे यश आहे. *
महेंद्र सुके
mahendra.suke@prahaar.co.in

