Pages

Sunday, March 31, 2019

आम्ही अभिव्यक्त होणार

आपलं महानगर 
दिनांक - ३१ मार्च  २०१९ 

थिएटर ऑफ रेलेवन्सच्या प्रक्रियांमध्ये काही चूक आणि बरोबर असं नसतंच. कारण चूक आणि बरोबर हे तुम्हाला एका निष्कर्षावर आणून ठेवतात आणि तिथे आपले मनन, चिंतन थांबते. आमच्या बालनाट्य कार्यशाळेमध्ये चूक बरोबर या पलीकडे, निर्माण आणि विध्वंस हा नवीन दृष्टीकोन आम्ही मुलांना देतो.

लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा

संत तुकारामांच्या या ओळी आठवल्या की बालपणात हरवून जायला होतं. पुन्हा एकदा लहान व्हावंसं वाटतं. बालपणातील धम्माल, मस्ती सारंकाही आठवतं. बालपणाच्या आठवणी ताज्या होऊन गमतीदार किस्से आठवतात, आपली स्वप्ने आणि सतत नवीन काही करण्याची इच्छा, लहानपणी वेगवेगळे प्रयोग करून स्वतःहून नवीन शोधण्याची उर्मी या सार्‍या बालपणातील आठवणी आयुष्यातील अशा काळात घेऊन जातात जिथे आपण असतो, आपल्यावर कशाचाच पगडा नसतो. समाजाचा, संस्कृतीचा, ना परंपरांचा कशाचाच नाही. आपल्या चेहर्‍यावर मुखवटेही नसतात. असते ते निरागस, निर्मळ मन आणि या निरागस मनाला अभिव्यक्त व्हायचं असतं आपल्या पद्धतीनेआता ही बाल्यावस्था समाजातील कोणत्याही स्तरावरील असो गरीब, श्रीमंत, उच्चभ्रू वा दारिद्य्ररेषेखालील, नामवंत वा वंचित, महालात राहणारे असो रस्त्यावर हे लहान कोवळे मन आपल्या पद्धतीने-स्वेच्छेने अभिव्यक्त व्हायला जाते तेव्हा समाज त्याला एका साचेबद्ध जीवनपद्धतीत अडकवत जातो.
मला हे नाही करायचे, हे माझ्या मनाविरुद्ध आहे हे कोणी ऐकणारच नसतं. जसजसे वय वाढत जाते तसतसे कंडिशनिंगचे स्तर वाढत जातात. मग हळूहळू आपण या रॅट रेसचा एक भाग होतो. अपेक्षांचं ओझं पेलता पेलता आपण फक्त शरीराने मोठे होतोविचार अभिव्यक्ती कुंठित होते आणि रम्य बालपण वाळूच्या कणांसारखं हातातून निसटून जातं..आज आपण याच बालपणातील शहाणपणाची गोष्ट करणार आहोत.अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा व्यक्तिगत स्वातंत्र्याप्रमाणेच संविधानाने दिलेला, लोकशाही मूल्यांवर आधारित मूलभूत मानवी अधिकार आहे आणि हा मला माझ्या जन्मापासूनच मिळतो. मुक्तपणे अभिव्यक्त होण्याकरता आपल्याला पोषक कौटुंबिक, सामाजिक वातावरण सहाय्य करू शकते; पण आपल्याकडे ही स्थिती विरोधाभासी आहे.

विकसनशील असलेल्या भारतात आज लहान मुलांच्या बाबतीत भीषण समस्या दिसून येतात:
) देशातील एकूण जनसंख्या पैकी एक पंचमांश मुले-मुली शाळेबाहेर आहेत, शाळेपासून वंचित आहेत.
) समाजात पाहता किती टक्के लहान मुले आपल्याला रस्त्यावर अनाथ बेवारस दिसतात. पुरेशा प्रमाणात सुरक्षा, शिक्षणाचा अभाव तसेच स्वच्छतेच्या सुविधांपासून वंचित असलेली ही मुले शहरातील रस्त्यांवर अत्यंत असुरक्षित वातावरणात आयुष्य जगत असताना आपण पाहतो.
) बाल मजुरी
) पालक मुलांना मारतात, वर्गात शिक्षक मुलांना मारतात.
) जाती-धर्मामुळे वंचित असलेली मुले
) मुलांच्या टक्केवारीनुसार किती टक्के मुली आहेत, मुलीचा गर्भ मारणे किंवा मुलीला जन्मानंतर मारणे.
) मुलगी म्हणून कुटुंबात-समाजात अवहेलना.
) बालविवाह, बलात्कार आणि छळ.
) दर पाच मुलांमधून तीन मुलं लैंगिक शोषणाला बळी पडतात.
१०) एकंदर समाजात असा समज झालेला आहे की, मुले ही फक्त त्यांच्या पालकांची संपत्ती आहे.
११) लहान मुलांना स्वतःचे विचार मांडणे, चांगल्या वाईटाची निवड करणे, निर्णय घेण्याची कुवत नसते असा समज आहे.
१२) त्यांना समजून मदत करण्याऐवजी त्यांच्यावर मोठ्याचे विचार लादले जातात.
१३) मुख्यत्वे लहान मुलांच्या अभिव्यक्तीला दरक्षणी खोडले जाते.

हो, भारतीय समाजातील काही मुलांच्या जीवनाची ही वस्तूस्थिती आहे. या समस्यांचा समाज दृष्टिकोनातून अभ्यास केला तर हे समजून येतं की मुळातच लहान मुलांवर शोषण करण्याची मानसिकता भारतात जास्त प्रमाणात आढळून येते. भारत लहान मुलांच्या बाबतीत सर्वात निर्दयी, निष्ठूर मानसिकतेचा देश आहे. इथे मला असं वाटतं की, मोठ्यांनी लहानांना सतत टोचून बोलण्यापेक्षा, त्यांच्या चुका काढण्यापेक्षा, त्यांना ओरडण्यापेक्षा, त्यांच्या अंतर्मनाला समजून घेणे आवश्यक आहे, ते जसे अभिव्यक्त होऊ पाहतात तसे त्यांना होऊ द्यावं, त्यांच्या चुकांतून त्यांना शिकण्याची संधी देणे अपेक्षित आहे, त्यांच्यासोबत संवाद सहवास करणे अपेक्षित आहे.या अभिव्यक्तीच्या पैलूंना केंद्रित करून आम्ही लहान मुलांसोबत वेगवेगळ्या विषयांवर थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य कार्यशाळा केल्या. या नाट्य कार्यशाळांमधून अभिव्यक्तीचे, संवादाचे, सर्जनशीलतेचे आणि कलात्मकतेचे महत्त्व मुलांना समजले.मुळात थिएटर ऑफ रेलेवन्सच्या प्रक्रियांमध्ये काही चूक आणि बरोबर असं नसतंच; कारण चूक आणि बरोबर हे तुम्हाला एका निष्कर्षावर आणून ठेवतात आणि तिथे आपले मनन, चिंतन थांबते. या बालनाट्य कार्यशाळेमध्ये चूक बरोबर या पलीकडे, निर्माण आणि विध्वंस हा नवीन दृष्टीकोन मुलांना आम्ही देतो.
निर्माण आणि विध्वंस हा दृष्टीकोन मुलांमध्ये रुजला की, प्रक्रियेला सुरुवात होते आणि प्रक्रिया सतत आपल्याला उत्क्रांत करण्यास प्रेरित करत असते. मनुष्याची जीवन प्रक्रिया म्हणजे उत्क्रांतीची प्रक्रिया आहे. अभिव्यक्तीचा काय अर्थ आहे आणि आपण का अभिव्यक्त होतो? हे प्रश्न आम्ही मुलांना विचारले तेव्हा मुलांनी याची विविध उत्तरे दिली की, आपल्या मनात येणारी भावना, विचार, संवेदना, कृती आपल्या स्वयंप्रेरणेने व्यक्त करणे म्हणजे अभिव्यक्ती. या बालनाट्य कार्यशाळांमधून या लहानग्यांनी अभिव्यक्त या शब्दाचा अर्थ आणि त्याच्या व्यापक स्वरूपाला कलात्मक उंची प्रदान केली. आपल्या छोट्या मोठ्या जीवन अनुभवांना एकत्रित करून आपल्याला जाणवते तसे, आपल्या पद्धतीने, आपल्या कल्पकतेने नाट्य स्वरूपात रचून त्यांना व्यक्त केले. ज्यातून बाल कलाकारांत आपल्या विषयाची स्पष्टता, कठीण शब्दांच्या अर्थाची उकल आणि आपण स्वतःच निर्माण करू शकतो हा विश्वास दृढ होत होता.
नाटकातून स्वतःला अभिव्यक्त करणे म्हणजे जीवनातील आव्हानांना वैचारिक दृष्टिकोन देऊन त्यांना सहज करून स्वीकारण्याची ताकद मिळणं. अभिव्यक्त होणं किती महत्त्वाचं असतं. भावना दाबून ठेवल्या की, त्याचे विष होऊन जाते. जे व्यक्तीला पोखरून पोखरून टाकते. मनात असणार्‍या भावना आपल्या आवडत्या आणि आपल्यातील विश्वासू व्यक्तीला सांगणे हा एक पर्याय या नाट्यकार्यशाळांमधून लहानग्यांनी दिला. याचे एक उदाहरण असे की, कार्यशाळेमध्ये दररोज आपल्या आवडत्या ताईला किंवा दादाला (कार्यशाळा मार्गदर्शकास) एक पत्र लिहायचे, सोबत एक पत्र आईबाबा स्वतःलाही लिहायचे यातून मुलांनी अशा काही मुद्यांना या पत्रातून मांडले ज्यांच्याविषयी सहसा त्यांच्या घरी संवाद होत नसे. या प्रक्रियेतून मुलं पालक यांच्यात असलेली संवादाची पोकळी भरून निघाली. मुलांच्या अभिव्यक्तीला प्राधान्य द्यायचे महत्त्वदेखील पालकांना पटले.
या कार्यशाळेत मुलांनी नाटकाच्या माध्यमातून स्वतःला अभिव्यक्त केले. स्वतः लिखाण दिग्दर्शन केले. कोणतीही वस्तू घटक घेऊन त्याच्याशी संवाद साधने त्या माध्यमातून स्व:संवाद साधणे अशा वेगवेगळ्या अभिव्यक्त होण्याच्या पद्धतीचला अभिव्यक्त होऊयाया कार्यशाळेमध्ये अनुभवायला मिळाल्या. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या छोट्या साथीदारांनी-अभिव्यक्त या जड शब्दाला अगदी सहजतेने आपल्या कलाकृतीतून सादर केले.
या नाट्य कार्यशाळेत संविधानाच्या समानता या तत्वालाही स्पष्ट केले. समानता या तत्वाला सखोलतेने समजले का? आपण समानतेला मानतो; पण या तत्त्वाला आयुष्यात अमलात आणतो का? मुलांच्या आयुष्यात म्हणजेच त्यांचे घर, परिवार आणि समाजात त्यांना वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जाते, समजले जाते आणि मुलगा असेल तर वेगळी वागणूक आणि मुलीला चौकटीत अडकवले जाते. तसेच स्वतःच्या प्रत्येक हावभावांना, आवाज, उठण्या बसण्याची पद्धत, मोकळेपणा या अभिव्यक्तीच्या पैलूंना नियंत्रित केले जाते. पण बालनाट्य कार्यशाळेतून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार, मुक्तपणे मोकळेपणाने वापरण्याची मोकळीक असते.मुलांचे व्यक्तिस्वातंत्र्य.मुलांना माहिती मिळण्याचे स्वातंत्र्य.विचार स्वातंत्र्य म्हणून इथे मुलं अभिव्यक्त होतात. आम्ही मुलांना हे सांगतो की, ही जागा माझी आहे हे मोठ्याने बोला. हे जीवन माझे आहे हे बोला. ही केवळ वाक्य असली तरी यात मुलांच्या सर्जनशीलतेला शोधणारी आणि बदलणारी प्रक्रिया इथे होते.नाटक म्हणजे केवळ अभिनय करणे नव्हे. नाटकांची परिभाषा अभिनय शैलीच्या पलीकडे आहेनाटक म्हणजे आपल्याशी संवाद साधणे आणि आपल्या विचारांचा भावनांचा समतोल राखणे. मन, भाव शरीर यांची सांगड घालणे. नाटक म्हणजे विचार, विचार म्हणजे शोध, शोध म्हणजे नावीन्य आणि प्रत्येक क्षण नवीन म्हणजे बालपण. कलेच्या माध्यमातून व्यक्ती म्हणून स्वतःला अभिव्यक्त करण्याची प्रक्रिया, उन्मुक्त होण्याची प्रक्रिया लहान मुले अनुभवतात. अभिनयासाठी अभिव्यक्ती नाही तर जीवन सक्षम करण्यासाठी अभिव्यक्ती हा मूलमंत्र या कार्यशाळांमधून मुले घेऊन जातात.

सायली पावसकर

Sunday, March 24, 2019

मानवतेचा कलात्मक हुंकार

सामना 

दिनांक - २४ मार्च  २०१९ 

>> मंजुल भारद्वाज
थिएटरच्या पारंपरिक चौकटी मोडून गेली 27 वर्षे थिएटर ऑफ रिलेव्हन्सहे अभियान मंचीय आविष्कार सादर करीत आहे. रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी थिएटरला थेट सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडलं. त्यांच्या नाटकांनी माणसांना अस्वस्थ केलं. आपलं जीवन आणि आपला समाज याची स्वत: समीक्षा करायला शिकवली. 27 मार्च रोजी जागतिक रंगमंच दिनाच्या पार्श्वभूमीवर थिएटर ऑफ रिलेव्हन्सचे प्रणेते मंजुल भारद्वाज यांनी व्यक्त केलेले विचार

नाटक म्हटलं की एक हसरा आणि एक रडका असे दोन मुखवटे सादर केले जातात. ‘थिएटर ऑफ रिलेव्हन्समुखवटे घालत नाही तर काढते. अनमास्क करते. दुसऱया महायुद्धानंतर जागतिकीकरणाच्या झपाटय़ात माणसाचे वस्तूकरण झाले. तंत्राच्या नादात माणुसकी हरवली, संस्कृती उद्ध्वस्त झाली. भावनांचा व्यापार सुरू झाला. माणसालाही असं वाटू लागलं की, तो एक वस्तू आहे. ‘खरीदो और बेचोहे तत्त्व त्याने स्वीकारायला सुरुवात केली. तिथेच खरी माझ्या रंगचिंतनाला सुरुवात झाली. त्यातूनच एका नव्या रंगसिद्धांताची निर्मिती आणि मांडणी होत गेली. नवे रंगतत्त्व जगासमोर आले. त्याचेच नावथिएटर ऑफ रिलेव्हन्स’.
12 ऑगस्ट 1992 रोजी या अभियानाचा शुभारंभ करीतदूर से किसीने आवाज दीया नाटकाचा प्रयोग आम्ही केला. मला आजही तो दिवस आठवतोय. आमच्या कलाकारांना सफेत कुडते देताना मी सांगितले होते की, हे आपले कफन आहे. साधारणतŠ तो दंगलीनंतरचा काळ होता. खूप संवेदनशील परिस्थिती होती. आम्ही दंगलीच्या जागी जाऊन प्रयोग केले. द्वेष आणि घाव यांनी जखमी झालेल्या मनांवर प्रेमाची आणि माणुसकीची फुंकर घालण्याचा तो प्रयत्न होता. साऱयांनी शांतपणे प्रयोग बघितला. प्रयोग संपताच उपस्थितांमधूनइन्सानियत जिंदाबादअशा घोषणा आल्या. थिएटरच्या ताकदीचा सिद्धांत तेव्हाच उमगला. त्याच कलासिद्धांतावरून पुढे जायचा ठाम निर्धार झाला.
एसी थिएटर, भव्य रंगमंच, टाळ्यांच्या कडकडाटात दिलेली दाद असं काहीथिएटर ऑफ रिलेव्हन्सला अपेक्षित नसतं. जिथं माणसांना आमची खरी गरज आहे तिथं आम्ही पोचतो. आम्हाला हवं तिथं मंच उभा होतो. गल्ली, मैदान, शाळेचा परिसर, झोपडपट्टी.. अगदी कुठेही. आमच्या सिद्धांतानुसार थिएटर हा एक चैतन्यदायी अनुभव आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक परिस्थितीत तो वेगळा असतो, नवा असतो. तो बदलत राहतो. थिएटरसाठी मूलभूत गरज आहे ती एक सादरकर्ता आणि एक प्रेक्षक यांची.
गेल्या 27 वर्षांत थिएटर ऑफ रिलेव्हन्सने जीवनाला नाटकाशी जोडून एक रंगचेतना जागृत केली आणि रंगचेतनेला लोकांशी जोडले. विचारांची प्रयोगशाळा बनून आम्ही बदल घडवत राहिलो. ‘मेरा बचपननाटकाने देशभरात 50 हजारांहून अधिक बालमजुरांचे जीवन सुधारले ती मुले आज शाळा-कॉलेजांत शिकत आहेत. जागतिकीकरणाविरोधातबी 7’ नाटक केले. पाण्याच्या खासगीकरणाविरोधातड्रॉप बाय ड्रॉपवॉटरसादर केले. माणसाला माणूस म्हणून जगू देणारेगर्भ’, शेतकरी आत्महत्या, शेती विनाशावरसंघर्ष शेतकऱयाचानाटक केले. कला हे उत्पादन नव्हे आणि कलाकार उत्पादक नव्हेत हा संदेश घेऊनअनाहत नाद अनहर्ड साऊंड ऑफ युनिव्हर्सरंगमंचावर आणले. राजकारणाकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी देणारेराजगतीसादर केले. हे करताना प्रेक्षक इथून बाहेर पडताना सोबत काय घेऊन जातील याचा विचार केला. आम्ही कधीही प्रेक्षकांनारसिकहोअशी हाक मारीत नाही, आम्ही त्यांनासहसंवादीअसे संबोधतो. प्रेक्षक हाच पहिला सशक्त आणि प्रभावी रंगकर्मी असतो असं आमचा सिद्धांत सांगतो. सादरीकरणात प्रेक्षकांना सहभागी करून घेण्याचे अद्भुत प्रयोग आमचे सुरूच असतात. तुम्हाला विदर्भातील एका प्रयोगाचे उदाहरण देतो. प्रयोग सुरू असताना आमच्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या हातात राख दिली आणि ती देताना कलाकारांनी सांगितलं, ही त्या मुलीची राख आहे, जिची काल हुंडय़ासाठी तिच्या सासरच्यांनी जाळून हत्या केली. हातातील राख बघून प्रेक्षक अंतर्बाह्य थरारून गेले होते. भावनांचा कल्लोळ एका पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे त्यांच्यात आत घुसला. अशा संवादातून प्रेक्षक केवळ प्रेक्षक राहत नाहीत, तर तिथे प्रकट होणाऱया विचारांचा पोषक आणि विश्लेषक बनतो. असे अनेक प्रयोग थिएटर ऑफ रिलेव्हन्सने केले आहेत. पुन्हा सांगतो आमचे सादरीकरण फक्त प्रेक्षकांच्या टाळ्या वाजण्यापर्यंत मर्यादित नसते.
मला नाटक प्रेक्षकांनी शिकवलं. जोपर्यंत सामान्य माणसाला नाटक आपलं वाटतं नाही तोपर्यंत ते नाटकच नसतं हे मला लोकांनीच शिकवलं. हजारो कार्यशाळा आम्ही आयोजित केल्या आणि करत आहोत. कार्यशाळांच्या माध्यमातून रंगभूमीपासून दूर असणाऱया व्यक्तीच्या आत थिएटरचे रोपण करतो. त्यांच्यामध्ये जागरूकता, चेतना निर्माण करतात. मग ती व्यक्ती प्रेक्षक राहता रंगकर्मी होऊन जाते. रंगकर्माला केवळ मनोरंजनाचे वा अभिव्यक्तीचे माध्यम मानता आपल्या आत बदल घडवून आणण्याचा पाया मानतात. ही अनुभूती व्यक्तीमध्ये क्रांतीचा जोश भरते आणि क्रांतीची मशाल स्वीकारण्यासाठी तयार करते.
थिएटरचे व्यावसायिक, प्रायोगिक, समांतर हे भेद मला मान्य नाहीत. ही फसवणूक असते, ज्यामध्ये लोकांचा सहभाग तेच खरे मेनस्ट्रीमचे नाटक असे मी मानतो. म्हणून बहिणाबाईंचे गाणे मला नेहमीच मुख्य प्रवाहातील वाटत आले. तुम्ही लोकांमध्ये चेतनेची ज्योत किती तेवत ठेवता हे महत्त्वाचे असते. कठीण परिस्थितीत थिएटरला माणुसकीचा आवाज बनवण्याचे कार्य थिएटर ऑफ रिलेव्हन्स करीत आहे. कौशल्य आणि कटिबद्धता हे दोन शब्द आमच्यासाठी महत्त्वाचे ठरतात. सांस्कृतिक चेतना जागवून सुंदर मानवी विश्व निर्माण करण्यासाठी आपण सारे कटिबद्ध आहोत. जागतिक रंगमंच दिनाच्या पार्श्वभूमीवर तसे आव्हान मी तमाम रंगकर्मींना करतो.

– shilpa.surve6@gmail.com

कलाकाराने चेतनेच्या प्रकाशाशी जोडायला हवे !

आपलं महानगर 
दिनांक - २४ मार्च  २०१९ 

कलाकाराला कलेचा उद्देश्य समजणे गरजेचे आहे, विकासाच्या नावावर ‘विनाशाच्या’ षडयंत्राला समजून घेणे गरजेचे आहे. सत्तेचे षडयंत्र समजून घेण्याची गरज आहे, सत्तेच्या अनुदानीत तुकड्यांपलीकडे जाऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. समाजातील ‘चेतनेच्या’ जडत्वाला तोडण्याची आवश्यकता आहे. २७ मार्च या विश्व रंगमंच दिवसानिमित्त घेतलेला हा वेध…

प्रत्येक प्राण्याला या विश्वात जगण्यासाठी ‘भोजनाची’ आवश्यकता असते, मग ती माती असो, पाणी असो, वनस्पती, मांस वा अन्य धातू ज्याने शरीर निरोगी राहील, पोट भरेल आणि प्राणी जिवंत राहील. प्रकृतीने सर्व प्राणिमात्रांसाठी मुबलक प्रमाणात संसाधने उपलब्ध करून दिली आहेत. मनुष्य सोडून सर्व प्राणी आपले भरण-पोषण प्रकृती अनुसार करतात किंवा मनुष्याद्वारे स्थापित व्यवस्थेनुसार करतात. हो, मनुष्याच्या जीवन व्यवहारासाठी अर्थार्जनाची आवश्यकता असते. मनुष्य सभ्य आहे, व्यवस्थेने मानवी सभ्यतेचा निर्माण केला व सत्ता कायम केली आणि प्रत्येक व्यवस्थेतील जीवन शैलीची सूत्र वेगवेगळी आहेत किंवा आपण असं म्हणू शकतो की कायदे व्यवस्था बनवलेली आहे किंवा सरकार प्रत्येक वेळी ‘रोजगार’ या शब्दाच्या बहुरंगी छत्री खाली मोहाचे जाळे पसरवीत आहे, प्रत्येक व्यवस्था आणि सत्तेचे हे प्रशासकीय हातखंड आणि सूत्र आहेत.
जसजसा मनुष्य ‘सभ्य’ होत चालला आहे तसतसे इतर प्राण्यांच्या तुलनेत त्याचे पोट वाढत चालले आहे. जो जितका मोठा, जितका विकसित, जितका आधुनिक, जितका हुकूमशाहा तेवढे त्याचे पोट वाढत जाते. जगातील सर्वात पुरातन लोकशाही अमेरिकेपासून जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतापर्यंत!

याचे कारण पोटाचा आकार नव्हे तर गरजेऐवजी ‘भ्रष्टाचाराला’ विकास समजण्याचा भ्रम आहे. वैज्ञानिक युग, विज्ञान पद्धती आणि विज्ञानातून निर्माण झालेल्या तंत्रज्ञानाचा व्यवसाय आणि व्यापार, नफेखोरी, खरेदी विक्रीच्या वर्चस्ववादी युगातील अवधारणा आहे.
संपूर्ण पृथ्वी ही निसर्गाची आहे हे विकसित मानवाला स्वीकार्य नाही. संपूर्ण पृथ्वी ही त्याचीच आहे हाच विकसित मानवाचा मंत्र आहे. म्हणूनच गरजांना अनिवार्य लोभाचे रूप देऊन चोवीस तास हजारो चॅनल विश्वभरात नफ्यासाठी संपूर्ण विश्वातील संसाधनांना लूटत आहेत.
अशा वेळेस काही जण ऐश करत आहेत आणि उर्वरित काहीजण प्रत्येक क्षणाला त्यांचे पोट भरण्यासाठी दारोदार फिरत आहेत. तरीही मनुष्य स्वतःला मोठ्या स्वाभिमानाने सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणवून घेतो आणि प्रकृती त्याच्यावर हसते, असो….
आदम काळापासून आजच्या ‘वैज्ञानिक सभ्यते’ च्या काळापर्यंत, मनुष्याला जीवन जगण्यासाठी शारीरिक शक्तीचा उपयोग करावा लागतो. उत्क्रांती काळात पायी चालणे, चाक आणि पंख या प्रत्येक शोध काळात मानवी शरीराच्या शारीरिक श्रमाची आर्थिक कमाईमध्ये फार महत्त्वाची भूमिका आहे. आदम काळात ‘शारीरिक बळ’ सर्वश्रेष्ठ होते. ज्याची जेवढी ताकद, त्याची तेवढी संपत्ती. बुद्धिमत्तेच्या विकासाने ‘शारीरिक बळाला’ अर्थनिर्मितीच्या सर्वात खालच्या पायरीवर फेकले.
आज जो मनुष्य केवळ शारीरिक श्रमावर आपली उपजीविका चालवतोय, तो या सभ्य आणि सुशिक्षित समाजाच्या वेशीबाहेर आहे. जे शारीरिक श्रमासोबत थोड्या कौशल्याचा वापर करतात त्यांची परिस्थिती आणखी चांगली…जे केवळ लैंगिक व्यवहाराचा उपयोग करतात त्यांची अवस्था चांगली आणि खराब दोन्ही… आणि जे बुद्धीचा उपयोग करतात ते समाजातील वरच्या स्तरावर गणले जातात. म्हणजेच मनुष्याच्या या प्रवासात अर्थ उपार्जनाचे चार स्तर आहेत. 1. शारीरिक श्रम आणि कौशल्य 2. भाव अभिव्यक्ती आणि कौशल्य 3. लैंगिक व्यवहार 4. चेतना, बुद्धी आणि विचार!
कला आणि कलाकाराची अर्थनिर्मिती कशी असावी? कला ‘चेतना’ आहे, विद्रोही आहे, मानवाला माणूस म्हणून घडवण्याचं आणि माणूसपण टिकवण्याचं माध्यम आहे. या विश्वात अशा अनेक व्यवस्था आहेत ज्या कलेचा आणि कलाकाराचा आपल्या दरबारात आपल्या सत्तेच्या प्रसार-प्रचारासाठी उपयोग करतात. आजही अनेक ठिकाणी हे होताना दिसते. ही व्यवस्था या कलाकारांना भोग आणि विलासाचे सर्व संसाधने उपलब्ध करून देते.
आजच्या काळात ग्रांट, अनुदान हे यासाठी अत्यंत उपयुक्त शब्द आहेत. खरे पाहता, ‘कला आणि कलाकार’ विद्रोही असतात, म्हणूनच सत्तेशी त्यांचा संघर्ष असतो. जन संपर्कातील कार्यकर्ते असल्या कारणाने असे कलाकार लोकांमध्ये राहून लोकांप्रमाणे आपली उपजीविका चालवतात आणि दडपशाही सत्तेच्या विविध यातना सहन करतात, मग त्या सरकारी असो वा सामाजिक!
भौतिक विकास, हाव, सत्ता आणि प्रसिद्धीच्या चकचकाटाने कलाकारांना संभ्रमित केले आहे. सत्तेने एका सुनियोजित षडयंत्राखाली कलेला ‘पोट भरण्याचं एक साधन’ इतकंच मर्यादित केलं आहे आणि कलाकारांना पोट भरणारी गर्दी. सत्तेने हे यासाठी केलं आहे जेणेकरून सत्ता जनतेचं शोषण करत राहील आणि त्यांना प्रश्न विचारणारा कलाकार, जनतेला जागरूक करणारा कलाकार, कलेला, ‘चेतनेचे’ सर्वतोपरीने माध्यम मानणारे कलाकार निर्माणच होऊ नये…
असे करून सत्ता आपल्या विरुद्ध होणार्‍या विद्रोहाला दाबते. कला आणि कलाकारांच्या अशा गर्दीला निर्माण करते जे सत्तेच्या तुकड्यांवर जगतील! ही सत्ता अशा समाजाला निर्माण करते, जिथे कला आणि कलाकाराला केवळ नाचण्या गाणार्‍या तुच्छ तुकड्यांच्या रुपात पाहिलं जातं किंवा उपभोग्यांच्या ‘भोग्यात्मक’ स्वरूपात पाहिलं जातं

आणि अशात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे शिक्षित असूनही अशिक्षित असा प्रसिद्धी पिपासू ‘मध्यम वर्ग’ जो कोणत्याही किमतीवर प्रत्येक प्रकारचं सुख उपभोगू इच्छितोय. आजच्या शोषणवादी व्यवस्थेचा ‘वाहक’ आहे हा ‘मध्यम वर्ग’. लोभाने पछाडलेला हा मध्यम वर्ग, अर्धवट विचार, अर्धवट ज्ञान, अर्धवट जीवन आणि स्वप्न मात्र जग काबीज करण्याचे! या रंगीत स्वप्नांच्या पूर्ततेसाठी ‘विकास’ या अभिशापग्रस्त महानगरांचा रहिवासी आहे हा ‘मध्यम वर्ग’! या महानगरांमध्ये आपल्या स्वप्नांना कमावण्यासाठी प्रत्येक क्षणी गर्दीत विशेष होण्याच्या अभिनयाच्या धडपडीत तरबेज झालाय हा मध्यम वर्ग. प्रत्येक प्रकारच्या कृत्रिम बाजाराचा ग्राहक आहे हा मध्यम वर्ग. प्रत्येक प्रकारची ठोकर सहन करण्यात तरबेज आहे हा मध्यम वर्ग. पण खिन्नता हीच की हा मध्यम वर्ग, ‘थोडा है, थोडे की जरूरत है’ च्या चक्रव्यूहाला तोडू शकत नाही आणि आपल्याच दिखावटी स्वप्नांच्या जाळ्यात फसून सोसत राहतो आणि विकासाचे भजन गात राहतो. या शोषण चक्रापासून या मध्यम वर्गाला मुक्ती देतो आणि देऊ शकतो तो आहे ‘कलाकार’.

मात्र हा मध्यम वर्ग पुंजीवादी व्यवस्थेच्या षडयंत्र सूत्रानुसार ‘केवळ मनोरंजनासाठी कला’ असणार्‍या कलेचा भक्त आहे. या भक्तीभावानुरूप तो एका अशा कलाकारांच्या समूहाला प्रोत्साहित करतो जो कलेच्या भोगवादी पक्षाच्या प्रसार प्रचारात तरबेज असेल. अशा कलाकारांना हा मध्यम वर्ग आपल्या एसएमएसद्वारे चुटकीसरशी सुपरस्टार बनवतो आणि प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन बसवतो. मात्र कलेच्या चेतनात्मक पक्षाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे ‘मध्यम वर्ग’!
विकासाच्या महानगरीय ‘विनाशी’ बेटांवर ‘मनोरंजनासाठी कला’ मानणार्‍या कलाकारांची गर्दी आहे. जी मध्यमवर्गाच्या इशार्‍यावर नाचते आणि ‘मध्यमवर्गा’ प्रमाणे कुठेच पोहचत नाही. बस स्वतःच्या भ्रमजाळात फिरत राहते आणि शोषणवादी सत्तेचा राजपाट ह्याच मध्यमवर्गाच्या भ्रांतीय चाकावर उभा आहे आणि चालतो आहे.
कलाकाराचे ध्येय केवळ पोट भरणे नाही. याचा अर्थ असा नाही की कलाकाराला जीवनाच्या मूलभूत गरजांची आवश्यकता नाही. जो कलावंत आहे त्याला जीवन जगण्याची कलादेखील येते आणि जो रोजगाराच्या गर्दीत गुंतलेला आहे त्याची गोष्टच निराळी!
कलाकाराला कलेचा उद्देश्य समजणे गरजेचे आहे, विकासाच्या नावावर ‘विनाशाच्या’ षडयंत्राला समजून घेणे गरजेचे आहे. सत्तेचे षडयंत्र समजून घेण्याची गरज आहे, सत्तेच्या अनुदानीत तुकड्यांपलीकडे जाऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. समाजातील ‘चेतनेच्या’ जडत्वाला तोडण्याची आवश्यकता आहे.
कलाकारांमध्ये केवळ नाचण्या-गाण्या पुरते कौशल्य मर्यादित नसून कलाकार हा जनकार्यकारी व्यक्तित्व असतो. जो प्रत्येक क्षणी ‘मध्यमवर्ग आणि सत्तेच्या’ शोषणवादी चक्रव्यूहाला आपल्या कलेने भेदतो. कारण कलाच मानवाला ‘मानव’ बनवते.

– मंजुल भारद्वाज (रंगचिंतक)-(लेखक थिएटर ऑफ रिलेवन्स या नाट्य चळवळीचे जनक आहेत)

Sunday, March 17, 2019

‘राजगति’ दाखवते राजकारणातील सकारात्मकता

आपलं महानगर
दिनांक - १७ मार्च   २०१९

‘राजगति’ हे नाटक केवळ प्रश्न निर्माण करून थांबत नाही तर प्रश्नाच्या मुळाशी घेऊन जातं आणि विचार करण्यास प्रेरित करतं. या नाटकाचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे राजकीय व्यवस्था बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या घटकांना हे नाटक प्रेक्षकांसमोर आणते. राजकारणाला बदलण्यासाठी राजकारण समजून घेणे आवश्यक आहे.

नाटक आणि राजकीय भूमिका याचा काय संबंध हा प्रश्न निर्माण होतोच. कारण, रंगभूमीवर काम करणारे असे कमी कलाकार आहेत जे मानतात की माझी सामाजिक जबाबदारी आहे व सामाजिक भूमिकेबरोबर राजकीय भूमिकाही आहे. कारण, राजकारण म्हटल्यानंतर गजकरण बोलण्याची पद्धत प्रत्येकाच्याच मनात आहे. मुख्यत्वे कलाकार त्यांची राजकीय भूमिका समजत नाहीत आणि ज्यावेळी कलाकार आपली राजकीय भूमिका समजतो त्यावेळी, तो समाजाचा एक मजबूत आधारस्तंभ होतो. रंगचिंतक मंजुल भारद्वाज नेहमी सांगतात, सरकारी अनुदानावर जगणारे कलाकार आपली भूमिका स्पष्टपणे मांडू शकत नाहीत. कारण, ते आश्रित असतात. जो शासनाच्या अनुदानावर रंगकर्म करतो, तो कलाकार विद्रोह कधीच करू शकत नाही.कारण,त्याला भीती असते आपल्या पोटापाण्याची. मग,अशा वेळी रंगकर्म बाजूला राहते आणि त्यांच्यासमोर सरकारचे गोडवे गाण्याची वेळ येते. सरकारच्या फक्त चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात. परंतु त्यांची भूमिका शासनाला प्रश्न विचारण्याची आहे हे ते विसरून जातात.

मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित ‘राजगति’ हे नाटक राजकारणाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी देते. राजकारण घाणेरडे आहे, राजकारणाचा आणि माझा काय संबंध ? पासून राजकारणाचा वैचारिकतेपर्यंतचा प्रवास या नाटकाच्या माध्यमातून मांडला आहे. नाटकामध्ये रंगकर्मींची असणारी भूमिका ही क्षणात विचारांप्रमाणे बदलणारी दिसते. नाटकातील एक-एक दृश्य विचार म्हणून आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. खरं तर हे नाटक प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करते. त्याचबरोबर, जाणीव करून देते ‘माझ्या भूमिकेची’. नाटक ‘राजगति’ने राजनीतिकडे पाहण्याचा माझ्यात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला.

या नाटकाचे सौंदर्य म्हणजे नाटकामधील दृश्य रचना, लेखकाच्या सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेची जाणीव करून देते. त्याचबरोबर प्रेक्षकांना आपल्या उत्कृष्ट लेखन शैलीने नाटकाच्या सुरुवातीपासून विचार करण्यासाठी प्रेरित करते. नाटकामध्ये गांधी, भगत सिंग, आंबेडकर, कार्ल मार्क्स यांच्या तत्वांना बखुबीने मांडले आहे. कलाकारांचा अभिनय हा लेखकाच्या रचनेला एका उंचीवर घेऊन जातो. नाटकामध्ये अवतरीत झालेले युगपुरुष प्रेक्षकांना त्या त्या काळामध्ये घेऊन जातात. जाणीव करून देतात इतिहासाची, घडलेल्या घटनेची आणि त्यांच्या तत्वांची.

एका बाजूला देशात विचारांचा चिखल झालेला असताना व्यक्तींच्या मनातील नकारात्मकता, नैराश्य यांचा निचरा करून नवीन पद्धतीने सार्वभौमिक विचार करण्यासाठी ‘राजगति’ हे नाटक प्रेरित करते. विकारवादी शक्ती बहुमताने जिंकून येते. देशाच्या जनतेला त्यांच्या हितासाठी विकासाचे गाजर दाखवते. अशात, भारतीय जनमानस विकास या शब्दानेच प्रभावित होऊन आपल्या नैतिक जबाबदारीपासून पळ काढतो आणि देशाची अधोगती होत राहते.

नाटकामधील महत्त्वाचा गाभा म्हणजे विचार आणि विकार यांचे लेखकाने केलेले विश्लेषण, प्रेक्षकांना सद्य:स्थितीत सुरू असणार्‍या राजकारणाची जाणीव करून देते. त्याचबरोबर ह्या विकारातून मुक्त होण्यासाठीचा मार्ग या नाटकात मांडला आहे…रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्या लेखनशैलीचं हे एक वैशिष्ठ्य आहे. ते आपल्या संहितेमध्ये प्रश्न विचारतात. त्याचबरोबर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या संहितेमध्ये असतात. जेणे करून प्रेक्षकांच्या मनातील गोंधळ थांबतो आणि नाटकाच्या शेवटपर्यंत मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे नाटकांमधूनच प्रेक्षकांना मिळतात.

या नाटकाचे प्रत्येक दृश्य प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करून जाते, की आता पुढे काय होणार आहे? नाटकामध्ये ‘मंडल-कमंडल आणि भूमंडल’ हे दृश्य प्रेक्षकांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरे देते …घडत असणार्‍या सद्य:स्थितीचे दर्शन या नाटकात मांडले आहे… त्यामुळे, हे दृश्य पाहून प्रेक्षक संवादात प्रेक्षकांनी मत मांडले की, समाजातील जळजळीत वास्तव ‘राजगति’ नाटकात दाखवले आहे !

‘राजगति’ हे नाटक केवळ प्रश्न निर्माण करून थांबत नाही तर प्रश्नाच्या मुळाशी घेऊन जातं आणि विचार करण्यास प्रेरित करतं. या नाटकाचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे राजकीय व्यवस्था बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या घटकांना हे नाटक प्रेक्षकांसमोर आणते. राजकारणाला बदलण्यासाठी राजकारण समजून घेणे आवश्यक आहे. त्याच्यासाठी ‘राजगति’चे चार मुख्य बिंदू आहेत ..१) सत्ता २)व्यवस्था ३) राजनैतिक चरित्र ४) राजनीति … राजनीतिमध्ये असणार्‍या व्यक्तीचं चरित्र हे खराब असू शकतं… आणि त्या खराब चरित्राचा दोष आपण राजकारणाला देतो…

‘राजगति’ हे नाटक एक ग्रंथ आहे… जे राजनीति किती शुद्ध आहे ते सांगतं,व्यवस्था बदलण्यासाठी राजनैतिक चरित्र स्वच्छ असणे किती महत्त्वाचं आहे ते सांगतं,त्याचबरोबर व्यवस्था चालवण्यासाठी असणारी नीति किती महत्त्वाची आहे याची जाणीव करून देते…

नाटक ‘राजगति’ हे नाटक सर्वात आधी राजकीय मंडळींनी पाहणे अत्यंत आवश्यक आहे.
हे परिवर्तनवादी नाटक सादर करणारे कलाकार : अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, प्रियंका कांबळी, सचिन गाडेकर, सिद्धांत साळवी, मनीष घाग, सुरेखा साळुंखे, स्वाती वाघ आणि तुषार म्हस्के आहेत.
राजगति नाटकाच्या प्रक्रियेमुळे माझी दृष्टी स्पष्ट झाली. राजकारणाला शिव्या देण्यात काहीच अर्थ नाही. राजकारणामध्ये बदल आणण्यासाठी माझी भूमिका काय आहे? आणि मला माझी भूमिका कशा पद्धतीने बदलता येईल, निभावता येईल हे मला समजले.

नाटक ‘राजगति’ने माझ्यातील राजकारणाविषयी असणार्‍या संवेदना जागृत केल्या. बदलाची अपेक्षा नेहमी कोणीतरी दुसरा करणार आणि त्यानंतर मी बदल करणार, हीच माझीही मानसिकता होती. ‘राजगति’ नाटकामुळे जाणीव झाली की, हा देश माझा आहे . त्यात, माझी एक भूमिका आहे. सत्तेत असणारा एक व्यक्ती निर्णय घेतो आणि दुसर्‍या दिवशी जनता रांगेत उभी राहते. याचाच अर्थ माझा राजकारणाशी थेट संबंध आहे. मग, मी माझ्या आसपासची परिस्थिती पाहू लागलो. माझ्या लक्षात आले, इथे फक्त विकासाचा नगारा वाजतोय. पण माझ्या जीवन व्यवहारात असणार्‍या गोष्टी अजूनही बदललेल्या नाहीत. त्या क्षणापासूनच थेट सत्तेत असणार्‍या व्यक्तीला प्रश्न विचारण्याची हिंमत माझ्यात आली. मी स्थानिक नगरसेवकांपासून सुरुवात केली, त्यांनी मी निर्माण केलेल्या प्रश्नांची नोंद घेतली आणि त्यात बदल केला.

राजकारणाविषयी नकारात्मकता ही सर्वांमध्ये आहे. राजकारण घाणेरडे आहे,यामध्ये असणारी माणसे वाईट असतात. असं प्रत्येक सामान्य व्यक्ती बोलत असते. राजकारणाची सकारात्मक बाजू जनतेसमोर मांडण्यासाठी ‘थिएटर ऑफ रेलेवन्स राजनैतिक चिंतन रैली’ मी मालाडमध्ये २१ जानेवारी २०१८ ला सकाळी ७. ३० वाजता अप्पा पाडा रिक्षा स्टॅन्डपासून ते मालाड रेल्वे स्थानकापर्यंत काढली. यामध्ये, ३५ ते ४० जण सहभागी झाले होते. रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित ‘राजनीति’च्या पवित्र व्याख्येचं वाचन करत चाललो होतो, सकाळची वेळ आणि रस्त्याने चालणारी माणसे कुतूहलाने पाहत होती. त्यांच्यापर्यंत राजनीतिची पवित्र व्याख्या जशी पोहचत होती, तसा त्यांच्याकडून येणारा रिस्पॉन्स हा सकारात्मक जाणवत होता. सहभागी झालेल्या ३५ ते ४० जणांचा रिस्पॉन्स हा होता की, आतापर्यंत राजकारणाला मी वाईट समजत होतो, परंतु ४० ते ४५ मिनिटे ही व्याख्या वाचत आल्यानंतर जाणवले राजकारण वाईट नाही. ही मानसिकता बदलण्याचे काम ह्या राजनैतिक चिंतन रैलीमधून झाले.

राजगति नाटकामुळे माझ्या आत जळत असणार्‍या आगीला आता योग्य दिशा मिळत आहे. राजकीय निर्णय, त्यांचा थेट होणारा परिणाम, राजकीय मंडळींची जुमलेबाजी आणि राजकीय घडामोडी यांच्यावर लिहिण्याची योग्यता राजगति नाटकाच्या प्रक्रियेतून माझ्या आत निर्माण झाली आहे.

-तुषार म्हस्के ( रंंगकर्मी )

स्त्रोत:- 
http://www.mymahanagar.com/featured/rajgiti-shows-the-positivity-of-politics/77050/?fbclid=IwAR2y4baImrQnI-zBNiUrOtW6m4ATNnbo2EzuUdeEsvUox6T3QLSG0-IEHyg

‘राजगति’ दाखवते राजकारणातील सकारात्मकता - -तुषार म्हस्के ( रंंगकर्मी )

Reference- राजगति’ दाखवते राजकारणातील सकारात्मकता - -तुषार म्हस्के ( रंंगकर्मी )