'द अदर वर्ल्ड' नाटकाचा रविवारी जळगावात प्रयोग
पर्यावरण संवर्धन संकल्पनेवर आधारित
निसर्ग असा तांडव का करत आहे? काही सेकंदात गावेच्या गावे का गिळंकृत होत आहेत ? राज्येच्या राज्ये का बुडत आहेत ? दुष्काळ, पूर, आग, अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत ! महानगरे त्रस्त आहेत! जनतेला
जळगाव, ता. ६ : पर्यावरण संवर्धनासह जैवविविधतेचे रक्षण करणे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे.. पण, हे कर्तव्यच आपण विसरुन गेल्याने सर्वत्र पर्यावरणीय समस्या उद्भवत आहेत. त्यासंबंधी जनजागृतीचा संदेश देणारे मंजुल भारद्वाज लिखित 'द.. अदर वर्ल्ड' हे नाटक रविवारी १२ ऑक्टोबरला जळगावात सादर होणार आहे. ही आपत्ती माहीत आहे, पण ती दोन दिवसांत विसरून जाते. विकासाने मनुष्याची दृष्टी इतकी भ्रष्ट केली आहे की तो आपल्याच पंचतत्त्वांशी युद्ध करीत आहे. कला जीवन वाचवते. कला मानवी चेतना जागृत करते. कला माणसाला माणूस बनवते. त्यातूनच 'थिएटर ऑफ रेलेवंस' जीवन वाचवण्यासाठी कटिबद्ध आहे. पर्यावरण आणि इकोलॉजीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी लोकजागृती करणे अनिवार्य आहे..
त्याचाच भाग म्हणून 'थिएटर ऑफ रेलेवंस' प्रस्तुत "द... अदर वर्ल्ड" या नाटकाचा प्रयोग १२ ऑक्टोबरला सायंकाळी ५:३० वाजता ला.ना. विद्यालयाच्या गंधे सभागृहात सादर होणार आहे. #पर्यावरण #मराठी #दअदरवर्ल्ड #जलगांव #ecology
