Pages

Friday, January 16, 2026

The Other World : विनाशाचे सत्य उलगडणारे ‘द अदर वर्ल्ड’- – सायली पावसकर

 आपलं महानगर , दिनांक 17 जानेवारी 2026

The Other World : विनाशाचे सत्य उलगडणारे ‘द अदर वर्ल्ड’

निसर्गाचं रक्षण म्हणजेच स्वत:चं रक्षण. माणसाच्या या विस्मरणाचा आणि त्यातून निर्माण झालेल्या विनाशाचा तीव्र दस्तऐवज उलगडण्याचे काम थिएटर ऑफ रेलेवन्स करत आहे. रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक ‘द अदर वर्ल्ड’ नाटक याच वास्तवाचा कलात्मक हुंकार आहे. माणसाच्या चेतनेला जागवणारा, त्याला नदीसारख्या प्रवाही विचाराशी जोडणारा. जेव्हा मनुष्याच्या चेतनेत नदी वसते, तेव्हा तो तिला दूषित करत नाही, उलट तिच्या प्रवाहात आपल्या जगण्याला प्रवाहित करतो.

– सायली पावसकर

माणूस विसरून गेला आहे की तोही निसर्गाचा एकात्म भाग आहे. आज जेव्हा एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती समोर येते, तेव्हा राजकारण, समाजकारण, अर्थकारण हे सगळे मुद्दे एका क्षणात बाजूला सरकतात. कारण निसर्ग जेव्हा आपले रौद्र रूप धारण करतो, तेव्हा आपण किती खुजे आहोत हे जाणवते. मग तो कुठलाही प्रगत देश असो वा गरीब गाव. केदारनाथच्या पुरापासून ते वायनाडमधील दुर्घटनेपर्यंत ते आता मराठवाड्यातील पुराची स्थिती अशा प्रत्येक संकटामागे मानवी हस्तक्षेप, निसर्गाची अयोग्य छेडछाड हीच मुख्य कारणे आहेत.

आजचा माणूस स्वत:ला अत्यंत सुज्ञ, प्रगत आणि सक्षम समजतो. त्याच्या हातात तंत्रज्ञान आहे, विज्ञान आहे, सत्ता आणि पैसा आहे. त्याला वाटतं तो आपल्या गरजेनुसार काहीही मिळवू शकतो, खरेदी करू शकतो. पण या खरेदी आणि विक्रीच्या काळात त्याने एक मूलभूत गोष्ट विसरली आहे, प्रकृती विकत घेता येत नाही. आज समाजातील प्रत्येक गोष्ट विक्रीखाली आहे. सत्ता, न्याय, धर्म, नाती, शरीर, शिक्षण, पाणी, हवा, जंगलं, आणि अगदी माणूसही!

खरेदी-विक्री हीच आता विकासाची व्याख्या ठरली आहे. या स्पर्धेच्या बाजारात माणूस नागरिक नाही तर ग्राहक बनला आहे, आणि त्याचं अस्तित्व एक वस्तू झालेले आहे. पूर्वी स्वातंत्र्य आणि हक्कांसाठी लढणारा मनुष्य आज स्वत:ची मतेदेखील विकतो आहे. जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण या स्वप्नाळू शब्दांनी त्याला ‘मुक्ततेचं स्वप्न’ दाखवलं, पण प्रत्यक्षात त्या स्वप्नानेच त्याची गुलामगिरी नव्या स्वरूपात परत आणली. माणूस ‘समान’ झाला नाही, तर तो ‘सामान’ बनला.

विकासाच्या नावाखाली चाललेला हा ‘भोगवादाचा बाजार’ अखेरीस विनाश ठरत आहे. माणसाला वाटलं की विज्ञानाच्या बळावर तो पंचतत्त्वांवर विजय मिळवू शकेल. पण हे पंचतत्त्व वायु, जल, अग्नी, पृथ्वी, आकाश हे फक्त नैसर्गिक घटक नाहीत, ती जीवनाची पायाभूत समतोलरचना आहेत. जेव्हा माणूस या समतोलला हादरवतो, तेव्हा निसर्ग उत्तर देतो. वणव्यांनी, पुरांनी, दुष्काळांनी आणि हवामान बदलाच्या संकटांनी. आज आपण मानवजातीचा ‘अभूतपूर्व वैज्ञानिक विकास’ म्हणून गौरव करतो. प्रगत तंत्रज्ञान, वेगवान संगणक, अंतराळात उड्डाण करणारी रॉकेट्स, पृथ्वीभोवती फिरणारे असंख्य उपग्रह या सर्वांचा आपण अभिमान बाळगतो. पण हा विकास नेमका कुठे घेऊन जातोय, हे प्रश्न आपण स्वत:ला विचारायलाच तयार नाही.

वैज्ञानिक विकासाच्या नावाखाली चाललेला हा अंधभोगवाद, पृथ्वीचे शोषण करणारे विकासाचे मॉडेल आता तुटायला लागले आहे. ही वेळ आहे जगाला नव्याने पाहण्याची, स्वत:ची वाट नव्याने आखण्याची. विकासाचा अर्थ आहे समतोल, संरक्षण आणि सहजीवन, नाही की फक्त उपभोग, विनाश आणि संपत्तीची स्पर्धा. भोगवादी विकासाच्या जाळ्यातून बाहेर येऊन आपण विवेकी ज्ञानाला समजायला हवे. आज थोडं थांबून आपण प्रकृतीचा विचार करूया. आपण जगतो ते नक्की कशासाठी? माती हवी अन्नासाठी, पाणी हवं जगण्यासाठी, हवा हवी श्वासासाठी. पण हे तिन्ही आज दूषित झाले आहेत. पण माणूस अजूनही अंध आहे. त्याला दिसतं फक्त ‘विकासाचं स्वप्न’, पण जाणवत नाही ‘विनाशाचं वास्तव’. आजही जंगलं तोडून तो महामार्ग बांधतो, गावे उद्ध्वस्त करून शहरं उभी करतो, आणि मग त्या शहरांमध्येच श्वास कोंडतो आणि मोकळा श्वास घेण्यासाठी बाजाराने दिलेले एअर प्युरिफायर उभे करतो. आज जगात जे घडतंय युद्धं, महामारी, हवामानबदल समुद्राचा स्तर वाढतोय हे सगळं एका मूलभूत विसरामुळे आहे. माणूस विसरला की तो प्रकृतीचा भाग आहे, मालक नाही. त्याला वाटतं की तो पृथ्वी विकत घेऊ शकतो, पण खरी गोष्ट अशी आहे की पृथ्वीच त्याला जागवते.

जंगलं म्हणजे पृथ्वीची फुफ्फुसे, झाडं तिचा श्वास. आणि आपणच तो श्वास तोडतोय. आज प्रत्येकाचा श्वास कोंडतोय, कारण पृथ्वीचा श्वास कोंडला आहे. विकासाच्या आरीने, बुलडोझरने, जेसीबीने जंगले म्हणजेच आपल्या पृथ्वीची फुफ्फुसे निर्दयपणे छाटली जात आहेत. आणि हे सगळं आपल्या डोळ्यांसमोर घडत आहे. काही काळापूर्वी आपण कोविडचा अनुभव घेतला. त्या वेळेला लोक एका एका श्वासासाठी तडफडत होते, ऑक्सिजनच्या कमतरतेने जीव गमावत होते. जग श्वासाच्या मूल्यावर हादरलं होतं.. पण त्या भीषण अनुभवाचं भान आज कुठे हरवलं? आज जंगलं नष्ट होताहेत, झाडं कोसळताहेत, डोंगरच्या डोंगर विकले जात आहेत. नदीच्या उगमाला, पक्ष्यांच्या आश्रयाला, प्राण्यांच्या घराला आपण विकासाच्या नावाने बळी देतोय. आणि हे करताना आपण विसरतो आहोत की पृथ्वीचा प्रत्येक श्वास हा आपला श्वास आहे. पण प्रश्न असा, जंगलं वाचवण्यासाठी आवाज कोण उठवतंय ?

नद्या शहराला पाणी देतात, भूमीला जीवन देतात, हवामानाला संतुलन देतात. पण आज नदी सुशोभीकरण या नावाखाली तिच्या नैसर्गिक प्रवाहावर सिमेंटचं ओझं टाकलं जातं आहे. नदीला जिवंत ठेवण्याऐवजी, तिला दगडात आणि लोखंडात बंदिस्त केलं जातं आहे. काँक्रीटच्या तटबंदीत नदीचा श्वास अडतो. नदी ही पर्यटन स्थळ नाही. ती जिवंत परिसंस्था आहे. तिच्या प्रत्येक थेंबात जीवन आहे, तिच्या प्रवाहात संतुलन आहे. म्हणून नदी सुशोभीकरणाऐवजी नदी पुनरुज्जीवन हा दृष्टिकोन आजच्या नागरी समाजाची जबाबदारी आहे. नैसर्गिक झाडांची पुनर्लागवड, सांडपाणी शुद्धीकरण, स्थानिक प्रजातींचं संरक्षण आणि नागरिकांची चेतना जागणे, हाच खरा विकास आहे. पर्यावरणाचा प्रश्न हा फक्त झाडं, नद्या आणि हवामानाचा नाही. तो सामाजिक न्यायाचा, मानवी अस्तित्वाचा आणि समतेच्या लढ्याचा प्रश्न आहे. पूर आला की सर्वात आधी वाहून जातं ते गरीबाचं घर, शेतकर्‍याचं पीक, कामगाराचं आयुष्य. शेतकर्‍यांची अवस्था पाहा. बदलते हवामान आणि अनियमित पाऊस या सगळ्यामुळे शेतकर्‍याचे जीवन अनिश्चिततेच्या कडेवरच आहे की.

आदिवासी लोकांची दुरवस्था पाहा, जंगल ही त्यांची संस्कृती. पण आज त्यांची जंगलेच त्यांच्याकडून हिरावली जात आहेत…जे मानव आणि निसर्गाच्या सहजीवनाचे प्राचीन रक्षक होते, ते आजच्याच विकासात ‘अनावश्यक’ ठरत आहेत, ही शोकांतिका आहे. समुद्रकिनार्‍यावरील लोकांना पाहा, मच्छीमारांची अस्थिर उपजीविका, या सगळ्यांनी त्यांचं जगणं एक सततच्या संघर्षात ढकललं आहे. समुद्रावर अवलंबून असलेल्या या समुदायांना पर्यावरणातील प्रत्येक बदल सरळ त्यांच्या पोटापाण्यावर परिणाम करतो. महानगरांमधील रांगणारा विकास पाहा, उद्ध्वस्त गावं आणि बुडालेल्या वस्त्या पाहा. म्हणूनच पर्यावरण हा वर्गसंघर्षाचा मुद्दा आहे. कला ही जीवनाची चेतना आहे. कला माणसाला माणूस करते. ती विवेकाला दिशा देते, आणि अंतर्मनात दृष्टी निर्माण करते. थिएटर ऑफ रेलेवन्स हे याच प्रवाहाचं प्रतीक आहे. कलेतून जीवन जगण्याचे आंदोलन. भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आजचं पाऊल संवेदनशील, विचारपूर्वक आणि निसर्गाभिमुख असायला हवं, नाहीतर उद्या उभं राहण्यासाठी जमीनच उरणार नाही! थिएटर ऑफ रेलेवन्स याच बिंदूवर भूमिका घेतं. माणसाच्या अंतर्मनात एक रोप रोवणं, विवेक जागवणं आणि कृतीला दिशा देणं हे कार्य करतं.

निसर्गाचं रक्षण म्हणजेच स्वत:चं रक्षण. माणसाच्या या विस्मरणाचा आणि त्यातून निर्माण झालेल्या विनाशाचा तीव्र दस्तऐवज उलगडण्याचे काम थिएटर ऑफ रेलेवन्स करत आहे. ‘द अदर वर्ल्ड’ हे नाटक याच वास्तवाचा कलात्मक हुंकार आहे. माणसाच्या चेतनेला जागवणारा, त्याला नदीसारख्या प्रवाही विचाराशी जोडणारा. जेव्हा मनुष्याच्या चेतनेत नदी वसते, तेव्हा तो तिला दूषित करत नाही, उलट तिच्या प्रवाहात आपल्या जगण्याला प्रवाहित करतो.

थिएटर ऑफ रेलेवन्स प्रस्तुत रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित द… अदर वर्ल्ड या नाटकाचा प्रयोग शनिवारी 24 जानेवारी 2026 रोजी, सकाळी 11 वाजता, श्री शिवाजी नाट्यमंदिर, दादर, मुंबई येथे प्रस्तुत होणार आहे. आपल्या कलात्मक समर्पणाने या नाटकाला साकार करणारे कलाकार आहेत अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे, नृपाली जोशी, प्रांजल गायकवाड, तनिष्का लोंढे.

REFERENCE- The Other World : विनाशाचे सत्य उलगडणारे ‘द अदर वर्ल्ड’

Sunday, January 4, 2026

दैनिक भास्कर - 5 जनवरी 2026 - जागरूकता • रंगमंच के जरिए प्रकृति-मानव संबंधों पर कलात्मक प्रस्तुति

दैनिक भास्कर - 5 जनवरी 2026

जागरूकता • रंगमंच के जरिए प्रकृति-मानव संबंधों पर कलात्मक प्रस्तुति

नाटकों से जला रहे अलख, देश-विदेश में हजारों लोगों को कर चुके हैं प्रेरित

दुष्यंत मिश्र | मुंबई

रंकर्मी, नाटककार और निर्देशक मंजुल भारद्वाज रंगमंच को केवल मनोरंजन के लिए इस्तेमाल करने में विश्वास नहीं रखते, बल्कि उन्होंने इसे सामाजिक, पर्यावरणीय और मानवीय सरोकारों से जोड़ दिया है। यही वजह है कि उनका चर्चित नाटक 'द... अदर वर्ल्ड' पर्यावरण संरक्षण और प्रकृति-मानव संबंधों पर एक ऐसी सशक्त कलात्मक रचना बन गया है जो पर्यावरण, इकोलॉजी और मानवता के साझा भविष्य को जनमानस से लेकर सत्ता के गलियारों तक पहुंचाता है। इस नाटक का मंचन भारत और यूरोप में हो चुका है। जिसे हजारों लोग देख चुके हैं। भारद्वाज ने बताया कि यूरोप में हुए मंचनों को पांच हजार से ज्यादा बच्चों, युवाओं और प्रौढ़ों ने देखा है। यह इस बात का प्रमाण था कि पर्यावरण और मानवीय सरोकार किसी एक देश या संस्कृति तक सीमित नहीं, बल्कि सार्वभौमिक हैं। महाराष्ट्र में मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पनवेल, बीड़, माजलगांव, उदगीर और जलगांव जैसे शहरों में नाटक का मंचन हो चुका है। भारद्वाज ने कहा कि नाटक देखने के बाद लोगों की जो प्रतिक्रिया मिल रही है वह अद्वितीय है। अच्छी बात यह है कि लोग पैसे खर्च कर टिकट लेकर नाटक देखते हैं और उन्हें सरकार या किसी और संस्था के दान का मोहताज नहीं होना पड़ता।

तपोवन में पेड़ों की कटाई रोकी भारद्वाज ने कहा कि नाटक से उपजी चेतना का प्रत्यक्ष उदाहरण हाल ही में नाशिक में देखने को मिला। जहां कुंभ मेले के लिए तपोवन क्षेत्र में प्रस्तावित वृक्ष कटाई के निर्णय के विरुद्ध जनआंदोलन खड़ा हुआ। इस आंदोलन की अग्रिम पंक्ति में वे दर्शक थे, जिन्होंने 'द... अदर वर्ल्ड को देखा और आत्मसात किया था। परिणामस्वरूप, प्रशासन और महाराष्ट्र सरकार को संबंधित टेंडर रद्द करना पड़ा।

पांच साल पहले हुई शुरुआत : 40 वर्षों से रंगमंच से जुड़े

भारद्वाज ने कहा कि पांच साल पहले 'पर्यावरण' नाम के नाटक के साथ इसकी शुरुआत हुई। इसके बाद कोरोना महामारी आ गई। फिर हमने रिसर्च कर यह नाटक तैयार किया। उन्होंने कहा कि जब कला समाज और प्रकृति के पक्ष में हस्तक्षेप करती है, तब वह केवल मंच तक सीमित नहीं रहती, बल्कि एक आंदोलन का रूप ले लेती है। हमारी कोशिश यही है कि लोग इतने जागरूक हों कि पर्यावरण संरक्षण एक आंदोलन बन जाए। 'द... अदर वर्ल्ड प्रकृति और इकोलॉजी (पारिस्थितिकी) को सहेजने का ऐसा रचनात्मक अभियान है, जो दर्शकों को भीतर तक झकझोरता है और उन्हें सोचने, समझने व हस्तक्षेप करने के लिए प्रेरित करता है। भारद्वाज ने कहा कि हमारा नाट्यदर्शन है थियेटर ऑफ रेलेवंस जो रंगकर्म को सामाजिक सरोकार से जोड़ता है।

Sunday, December 14, 2025

'वृक्ष वाचवा'चा संदेश देणारे 'द अदर वर्ल्ड'

सकाळ ( १४ डिसेंबर २०२५ )

 'वृक्ष वाचवा'चा संदेश देणारे 'द अदर वर्ल्ड'

थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्यसिद्धांतची प्रस्तुती; नाटकाद्वारे पर्यावरणाबाबत जनजागृती

नाशिक, ता. १३ : पंचतत्त्वांच्या उत्पत्तीपासून सजीवसृष्टी आणि मानवनिर्मितीचा चाललेला अखंड प्रवास... हिमयुग-अश्मयुग ओलांडत मानवाने शेती आणि पशुपालनाच्या दिशेने केलेली वाटचाल... प्रवासात त्याने लावलेला अग्नीचा शोध... साधनांची निर्मिती, पाण्याचे नियोजन, बीज साठवण, निवाऱ्याची उभारणी आणि सहजीवनाची संगती, अशी आत्मसात केलेली अनेक मूलभूत कौशल्ये आणि हे सर्व निसर्गाशी सुसंगत करणे याचे प्रतिबिंब म्हणजे 'द अदर वर्ल्ड' नाटक.

थिएटर ऑफ रेलेवन्स 

नाट्यसिद्धांत प्रस्तुत 'द अदर वर्ल्ड' हे । नाटक शुक्रवारी (ता. १२) महाकवी कालिदास कलामंदिर येथे सादर करण्यात आले. पृथ्वी, पर्यावरण आणि मानवतेचे रक्षण, संवर्धन करण्याचा वसा घेतलेल्यांच्या जाणिवा मांडणारे हे नाटक होते. औद्योगिक क्रांतीने मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाला वेग दिला आणि त्यातून भांडवलशाही, साम्यवाद अशा व्यवस्थांचा उदय झाला. तथाकथित 'विकासा'च्या या वाटा पर्यावरण, पर्यावरणशास्त्र (इकॉलॉजी) आणि हवामानाच्या संतुलनाला बाधा पोहोचवू लागल्या. त्यामुळे आज मनुष्य मानवी नाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे, हे नाटकातून मांडण्यात आले. पात्रांच्या माध्यमातून उभी करण्यात आलेली झाडे, वन्यपशू, झाडांखाली वावरण्याचा अभिनय, प्राण्यांचा हिंस्त्रपणा हे सारे वाखाणण्याजोगे होते.

नाटकात अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे, तनिष्का लोंढे, नृपाली जोशी, प्रांजल गायकवाड आणि आरोही बाविस्कर यांनी भूमिका केल्या. लेखन व दिग्दर्शन मंजूल भारद्वाज यांचे होते. हे नाटक कोणतेही अनुदान, देणगी किंवा स्पॉन्सरशिप न घेता, निर्मात्याशिवाय केवळ प्रेक्षकांच्या सहभागाने नाटक प्रस्तुत करण्यात आले, हे विशेष!

Saturday, November 15, 2025

विनाशरूपी विकासाचे सत्य 'द... अदर वर्ल्ड' मध्ये उलगडणार

लोकमत,  शनिवार, दि. १५ नोव्हेंबर २०२५ 

 विनाशरूपी विकासाचे सत्य 'द... अदर वर्ल्ड' मध्ये उलगडणार 

औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलामंदिरात कार्यक्रम

पुणे : पुण्यातील औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलामंदिरात शनिवारी (दि. १५) सायंकाळी साडेपाचला विनाशरूपी विकासाचे सत्य उलगडणारे 'द... अदर वर्ल्ड' हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे, विनाशरूपी विकासाचे सत्य त्यातून उलगडले जाणार आहे.

माणूस विसरून गेला आहे की, तोही निसर्गाचा एकात्म भाग आहे. आज जेव्हा एखादी मोठी नैसर्गिक आपत्तीसमोर येते, तेव्हा राजकारण, समाजकारण, अर्थकारण हे सगळे मुद्दे क्षणात बाजूला सरकतात. कारण निसर्ग जेव्हा आपले रौद्र रूप धारण करतो, तेव्हा आपण किती खुजे आहोत हे जाणवते. केदारनाथच्या

पुरापासून ते वायनाडमधील दुर्घटनेपर्यंत ते आता मराठवाड्यातील पुराची स्थिती अशा प्रत्येक संकटामागे मानवी हस्तक्षेप, निसर्गाची अयोग्य छेडछाड हीच मुख्य कारणे आहेत. 'वसुधैव कुटुंबकम्' हे आपण म्हणतो; पण प्रत्यक्षात आपल्या मातीशीच बेईमानी करतो. जमिनी, नद्या, जंगलं या साऱ्या नैसर्गिक संपत्तींचा अतिरेकी वापर आणि विनाश सुरू आहे. 'झाडे लावा, झाडे जगवा' हे केवळ

माणसाच्या मनाशी संवाद

रंगभूमीच्या चार प्रमुख प्रवाहांपैकी 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' हा सशक्त, मानवकेंद्री आणि परिवर्तनवादी नाट्य सिद्धांत आहे. सत्ता-पोषित रंगभूमी जिथे केवळ नाच-गाणी आणि बाह्यरंजन करते, तिथे 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' माणसाच्या मनाशी संवाद साधते, विवेकाला जागवते.

प्रपोगंडा थिएटर जिथे एका विचारधारेचा प्रचार करतं, तिथे हे समग्र भूमिकेचा पुरस्कार करतं आणि प्रत्येक सत्तेला आरसा दाखवते. बुद्धिजीवी रंगभूमी जिथे केवळ प्रयोग आणि तात्त्विक चर्चा करतात, तिथे 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' सामान्य माणसाच्या संघर्षांचे आवाज बनत माणसाला उन्मुक्त करण्याचे मानवी दर्शन आहे.

घोषवाक्य उरले आहे. निसर्गाविषयीची ही जागृती प्रत्येक स्तरावर आवश्यक आहे. जर्मनीसारख्या युरोपीय देशात गाजलेले 'द... अदर वर्ल्ड' हे नाटक आता भारतातही सादर होत आहे.

'द... अदर वर्ल्ड' हे नाटक आपल्याला हेच आठवण करून देते, की निसर्ग हाच आपला खरा मार्ग आहे. नैसर्गिक होऊन निसर्गाला जपण्याची आशा जागवते आणि बाहेरील प्रकृतीसोबत आपल्या आतील प्रकृतीला वाचवण्याची दृष्टी मांडते. या नाटकात पंचतत्वांच्या उत्पत्तीपासून सजीवसृष्टी आणि मानवनिर्मितीचा अखंड प्रवास उलगडतो. हिमयुग-अश्मयुगांमधून पुढे येताना मानवाने शेती आणि पशुपालनाची दिशा पकडली. या प्रवासात त्याने घेतलेले मूलभूत शोध अग्नीचा उपयोग, साधनांची निर्मिती, पाण्याचे नियोजन, बीजसाठवण, निवाऱ्याच्या उभारणीपासून ते सहजीवनाच्या व्यवस्थांची निर्मिती हे सर्व निसर्गाला पूरक असेच होते.

 मानवाचा विकास पृथ्वीच्या चक्राशी जोडलेला, सजीवसृष्टीच्या गरजांना ओळखणारा असा होता. पण कालांतराने संपत्ती आणि मालकीच्या संकल्पनांतून समाजव्यवस्थेचा विस्तार झाला आणि मानव दास्यत्व, गुलामगिरी व सरंजामशाहीच्या अंधारात गुरफटला. औद्योगिक क्रांतीने मोठ्या प्रमाणावर उत्पादनाला वेग दिला, ज्यातून भांडवलशाही आणि साम्यवाद यांसारख्या व्यवस्थांचा उदय झाला. तथाकथित 'विकासाचे' मार्ग पर्यावरण, इकॉलॉजी आणि हवामानाला बाधक ठरत आहेत. आपण विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहोत. पृथ्वी, पर्यावरण, इकॉलॉजी, हवामान आणि मानवता यांचे संरक्षण, जतन व संवर्धन करण्याचा संदेश हे नाटक कलात्मकतेने संवेदनशील भूमिका मांडते

Monday, October 6, 2025

'द अदर वर्ल्ड' नाटकाचा रविवारी जळगावात प्रयोग

'द अदर वर्ल्ड' नाटकाचा रविवारी जळगावात प्रयोग

पर्यावरण संवर्धन संकल्पनेवर आधारित

'द अदर वर्ल्ड' नाटकाचा रविवारी जळगावात प्रयोग  पर्यावरण संवर्धन संकल्पनेवर आधारित  निसर्ग असा तांडव का करत आहे? काही सेकंदात गावेच्या गावे का गिळंकृत होत आहेत ? राज्येच्या राज्ये का बुडत आहेत ? दुष्काळ, पूर, आग, अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत ! महानगरे त्रस्त आहेत! जनतेला  जळगाव, ता. ६ : पर्यावरण संवर्धनासह जैवविविधतेचे रक्षण करणे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे.. पण, हे कर्तव्यच आपण विसरुन गेल्याने सर्वत्र पर्यावरणीय समस्या उद्भवत आहेत. त्यासंबंधी जनजागृतीचा संदेश देणारे मंजुल भारद्वाज लिखित 'द.. अदर वर्ल्ड' हे नाटक रविवारी १२ ऑक्टोबरला जळगावात सादर होणार आहे. ही आपत्ती माहीत आहे, पण ती दोन दिवसांत विसरून जाते. विकासाने मनुष्याची दृष्टी इतकी भ्रष्ट केली आहे की तो आपल्याच पंचतत्त्वांशी युद्ध करीत आहे. कला जीवन वाचवते. कला मानवी चेतना जागृत करते. कला माणसाला माणूस बनवते. त्यातूनच 'थिएटर ऑफ रेलेवंस' जीवन वाचवण्यासाठी कटिबद्ध आहे. पर्यावरण आणि इकोलॉजीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी लोकजागृती करणे अनिवार्य आहे.. त्याचाच भाग म्हणून 'थिएटर ऑफ रेलेवंस' प्रस्तुत "द... अदर वर्ल्ड" या नाटकाचा प्रयोग १२ ऑक्टोबरला सायंकाळी ५:३० वाजता ला.ना. विद्यालयाच्या गंधे सभागृहात सादर होणार आहे. #पर्यावरण #मराठी #दअदरवर्ल्ड #जलगांव #ecology

निसर्ग असा तांडव का करत आहे? काही सेकंदात गावेच्या गावे का गिळंकृत होत आहेत ? राज्येच्या राज्ये का बुडत आहेत ? दुष्काळ, पूर, आग, अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत ! महानगरे त्रस्त आहेत! जनतेला

जळगाव, ता. ६ : पर्यावरण संवर्धनासह जैवविविधतेचे रक्षण करणे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे.. पण, हे कर्तव्यच आपण विसरुन गेल्याने सर्वत्र पर्यावरणीय समस्या उद्भवत आहेत. त्यासंबंधी जनजागृतीचा संदेश देणारे मंजुल भारद्वाज लिखित 'द.. अदर वर्ल्ड' हे नाटक रविवारी १२ ऑक्टोबरला जळगावात सादर होणार आहे. ही आपत्ती माहीत आहे, पण ती दोन दिवसांत विसरून जाते. विकासाने मनुष्याची दृष्टी इतकी भ्रष्ट केली आहे की तो आपल्याच पंचतत्त्वांशी युद्ध करीत आहे. कला जीवन वाचवते. कला मानवी चेतना जागृत करते. कला माणसाला माणूस बनवते. त्यातूनच 'थिएटर ऑफ रेलेवंस' जीवन वाचवण्यासाठी कटिबद्ध आहे. पर्यावरण आणि इकोलॉजीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी लोकजागृती करणे अनिवार्य आहे.. 

त्याचाच भाग म्हणून 'थिएटर ऑफ रेलेवंस' प्रस्तुत "द... अदर वर्ल्ड" या नाटकाचा प्रयोग १२ ऑक्टोबरला सायंकाळी ५:३० वाजता ला.ना. विद्यालयाच्या गंधे सभागृहात सादर होणार आहे. #पर्यावरण #मराठी #दअदरवर्ल्ड #जलगांव #ecology

Friday, August 22, 2025

थिएटर ऑफ रेलेवन्स - सत्यपथावरील 33 वर्षाचा उत्सव आणि वैचारिक मंथन

 बहुजन सौरभ

शनिवार २३ ऑगस्ट २०२५

थिएटर ऑफ रेलेवन्स - सत्यपथावरील 33 वर्षाचा उत्सव आणि वैचारिक मंथन

पुणे : आज सायंकाळी 6 वाजता, पुण्यातील गांधी भवन, कोथरूड येथे महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि थिएटर ऑफ रेलेवन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'कला सत्वाचा सत्यपथावरील 33 वर्षाचा प्रवास' या चर्चासत्राने रंगकर्म आणि सत्य यांचा अनोखा संगम अनुभवला. हा कार्यक्रम थिएटर ऑफ रेलेवन्सच्या 33 वर्षांच्या सृजनशील प्रवासाचा उत्सव ठरला, ज्याने कला ही केवळ करमणूक नसून सत्याचा शोध आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले. गांधी भवनात आयोजित या चर्चासत्राला रंगकर्मी, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि सामान्य प्रेक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमाची सुरुवात मंजुल भारद्वाज, थिएटर ऑफ रेलेवन्सचे संस्थापक, यांच्या प्रेरक उद्बोधनाने झाली. त्यांनी TOR च्या 33 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेताना सांगितले की, 'कला ही सत्याशी संनाद करणारी प्रक्रिया आहे. थिएटर ऑफ रेलेवन्सने सत्याग्रह आणि प्रतिरोधाच्या भावनेतून समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि लाखो लोकांना स्वतःच्या अस्तित्वाचा बोध घडवला.' हे सांगताना त्यांनी त्यांच्या या प्रक्रियेत आलेले प्रत्यक्ष अनुभव कथन केलेत. सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतीक विषयावर समाजाची सद्यःस्थिती काय आहे यावर सखोल विवेचन केले. या चर्चासत्रात TOR च्या नाट्य सिद्धांतावर सखोल विचारमंथन झाले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे डॉ. कुमार सप्तर्षी यांचे सहकारी अन्वर राजन, तेजस भालेराव तसेच मंजुळ भारद्वाज यांचे सहकारी कलावंत अश्विनी नांदेडकर, कोमल खामकर, सायली पावसकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे हे सहभागी होते. सहभागी वक्तत्यांनी TOR च्या 'स्वराजशाला' उपक्रमाचे कौतुक केले, ज्याने राजकारणाला सात्विक आणि पवित्र धारा मानून सामाजिक जागृती घडवली. थिएटर ऑफ रेलेवन्सचा हा 33 वर्षांचा प्रवास सत्य आणि मानवतेच्या शोधाचा उत्सव आहे. पुण्यातील या चर्चासत्राने हे पुन्हा एकदा सिद्ध केले की, कला ही समाजाला बदलण्याची ताकद आहे. आता ही चळवळ प्रत्येक गावात, शहरात पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

बहुजन सौरभ शनिवार २३ ऑगस्ट २०२५ थिएटर ऑफ रेलेवन्स - सत्यपथावरील 33 वर्षाचा उत्सव आणि वैचारिक मंथन पुणे : आज सायंकाळी 6 वाजता, पुण्यातील गांधी भवन, कोथरूड येथे महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि थिएटर ऑफ रेलेवन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'कला सत्वाचा सत्यपथावरील 33 वर्षाचा प्रवास' या चर्चासत्राने रंगकर्म आणि सत्य यांचा अनोखा संगम अनुभवला. हा कार्यक्रम थिएटर ऑफ रेलेवन्सच्या 33 वर्षांच्या सृजनशील प्रवासाचा उत्सव ठरला, ज्याने कला ही केवळ करमणूक नसून सत्याचा शोध आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले. गांधी भवनात आयोजित या चर्चासत्राला रंगकर्मी, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि सामान्य प्रेक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमाची सुरुवात मंजुल भारद्वाज, थिएटर ऑफ रेलेवन्सचे संस्थापक, यांच्या प्रेरक उद्बोधनाने झाली. त्यांनी TOR च्या 33 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेताना सांगितले की, 'कला ही सत्याशी संनाद करणारी प्रक्रिया आहे. थिएटर ऑफ रेलेवन्सने सत्याग्रह आणि प्रतिरोधाच्या भावनेतून समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि लाखो लोकांना स्वतःच्या अस्तित्वाचा बोध घडवला.' हे सांगताना त्यांनी त्यांच्या या प्रक्रियेत आलेले प्रत्यक्ष अनुभव कथन केलेत. सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतीक विषयावर समाजाची सद्यःस्थिती काय आहे यावर सखोल विवेचन केले. या चर्चासत्रात TOR च्या नाट्य सिद्धांतावर सखोल विचारमंथन झाले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे डॉ. कुमार सप्तर्षी यांचे सहकारी अन्वर राजन, तेजस भालेराव तसेच मंजुळ भारद्वाज यांचे सहकारी कलावंत अश्विनी नांदेडकर, कोमल खामकर, सायली पावसकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे हे सहभागी होते. सहभागी वक्तत्यांनी TOR च्या 'स्वराजशाला' उपक्रमाचे कौतुक केले, ज्याने राजकारणाला सात्विक आणि पवित्र धारा मानून सामाजिक जागृती घडवली. थिएटर ऑफ रेलेवन्सचा हा 33 वर्षांचा प्रवास सत्य आणि मानवतेच्या शोधाचा उत्सव आहे. पुण्यातील या चर्चासत्राने हे पुन्हा एकदा सिद्ध केले की, कला ही समाजाला बदलण्याची ताकद आहे. आता ही चळवळ प्रत्येक गावात, शहरात पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

Wednesday, February 5, 2025

सत्याचा शोध घेणारं नाटक! 'द... अदर वर्ल्ड ' सौंदर्यपूर्ण पंचतत्वाचा रंगमंचीय अनुभव - प्रवीण गांगुर्डे

The ... Other World :  'द... अदर वर्ल्ड' नाटकाचे कथानक पंचतत्त्व अर्थात माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांच्या महत्त्वावर आधारलेले आहे. 

सत्याचा शोध घेणारं नाटका 'द... अदर वर्ल्ड' सौंदर्यपूर्ण पंचतत्वाचा रंगमंचीय अनुभव 

 'द... अदर वर्ल्ड' हे रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक आहे. हे नाटक पंचतत्त्वांशी माती, पाणी, अग्नी, वायू, आकाश यांच्या सोबत आपली नव्याने ओळख करून देते आणि आपल्या पर्यावरण, पृथ्वी आणि मानवतेच्या रक्षणासाठी प्रत्येकाला सज्ज होण्याचे आवाहन करते. या सृजनशील कलाकृती मध्ये सौंदर्याचा बोध पाहायला मिळतो. निसर्ग आपल्या सर्वाना कुशीत घेतो आणि सृष्टीतून माणसाला सभोवताली पाहण्याची दृष्टी देतो. नदी, नाले, ओढे, झरे, समुद्र, पक्ष्याचे विविध आवाज त्यांचा किलबिलाट, वाढत्या शहरीकरणामुळे याच्या सगळ्यावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. म्हणून या नाटकाच्या विषयानुसार पर्यावरण आणि मानवतेच्या मुद्द्यांवर विचार करण्यास प्रवृत्त करणारा संदेश या नाटकातून देण्यात आला आहे.

"द... अदर वर्ल्ड" हे मंजुळ भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक जे मानवी अस्तित्व, निसर्ग आणि पंचतत्त्वांच्या परस्परसंबंधांवर प्रकाश टाकते. हे नाटक पारंपरिक कथाकथनापलीकडे जाऊन, प्रेक्षकांना या अनुभवात सहभागी करून घेतं. नाटकाचे कथानक पंचतत्त्व अर्थात माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांच्या महत्त्वावर आधारलेले आहे. आदी मानव ते आधुनिक कृत्रिम बुद्धिमात्तेच्या जगातील आजच्या मानवापर्यंत नाटक प्रेक्षकांना प्रवास करवते. मानवी जीवन आणि निसर्ग यांच्यातील असमतोल, आधुनिक जीवनशैलीमुळे पर्यावरणाला होणारे नुकसान, तसेच आपल्या जगाची सद्यस्थिती या सर्व बाबींची जाणीव करून देण्यासाठी हे नाटक एक प्रभावी माध्यम ठरते. हे नाटक केवळ गोष्ट सांगणारी कलाकृती नसून, ती आपल्याला अंतर्मुख करते. आपण ज्या निसर्गाचा भाग आहोत, त्याच्याशी आपले नाते काय आहे? आपण पुढील पिढ्यांसाठी कोणती दुनिया तयार करत आहोत? या मूलभूत प्रश्नांवर नाटक भाष्य करते. आणि प्रेक्षकांना अंतर्मुख करते. 

दिग्दर्शन आणि सादरीकरण 

मंजुल भारद्वाज यांच्या दिग्दर्शनशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे ते नाटकाला केवळ मनोरंजनाच्या चौकटीत मर्यादित ठेवत नाहीत, तर ते प्रेक्षकांना विचार करायला लावतात. नाटकात रंगमंचाचा वापर अत्यंत कल्पकतेने केला आहे. प्रकाशयोजना, नैसर्गिक ध्वनी निर्मित संगीत आणि सकस अभिनय या सर्व घटकांचा प्रभावी संगम पाहायला मिळतो. नाटकात संवादांपेक्षा दृश्यात्मक संकल्पनांना अधिक महत्त्व दिलेले आहे. कलाकारांचे शरीराभिनय, नैसर्गिक शरीराच्या सर्वच अवयवांची हालचालींचा अत्यंत प्रभावीपणे केलेला वापर, अभिनय कौशल्य आणि प्रभावी दिग्दर्शन यामुळे प्रेक्षकांना हा एक अविस्मरणीय वेगळा अनुभव मिळतो. 

कलाकारांच्या अभिनयाविषयी 

कलाकारांनी आपल्या भूमिकांमध्ये अत्यंत ताकदीने प्राण ओतले आहेत. नाटकात कोमल खामकर, अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे, नृपाली जोशी, तनिष्का लोंढे प्रांजल, समर, प्राणम्य या कलाकारांनी उत्तम अभिनयची कला सादर केली आहे. विशेषतः पंचतत्त्वांचे सादरीकरण करताना त्यांनी आपल्या देहबोलीद्वारे आणि हावभावांद्वारे या संकल्पनांना प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडले आहे. स्वच्छ आणि तरल अभिनय करण्यासाठी कलाकारांनी भरपूर मेहनत घेतली आहे. यात सादर केलेला प्रत्येक संवाद कलाकार प्रत्यक्ष आदिवासी पाड्यात जाऊन राहून प्रत्यक्ष जगले आहेत, म्हणूनच त्यांच्या अभिनयातून वास्तविक परिस्तिथीचे दृश्य प्रेक्षकांपर्यंत परिणामकरकपणे पोहचवण्यात कलाकार यशस्वी झाले आहेत. संवादांची संख्या मर्यादित असली, तरीही कलाकारांच्या सशक्त अभिनयामुळे संवादांची कमतरता भासत नाही. त्यांच्या वेशभूषा, संवादफेक, आणि शरीरभाषा यामुळे संपूर्ण नाटकाचा परिणाम अधिक परिणामकारक वाटतो. 

संगीत ठरतेय अधिक प्रभावी ! 

या नाटकात वापरलेले पार्श्वसंगीत हे पारंपरिक वाद्यातून आणि अभिनेत्यांनी स्वतःच्या तोंडातून निर्माण केलेल्या ध्वनीतून, वेगवेगळ्या पक्षांचे आवाज, किलबिलाट, हवेचा आणि पाण्याचा ध्वनी फारच परिणाम करून गेला आणि कलाकारांनी आवश्यकतेनुसार निर्माण केलेले ध्वनी परिणाम वातावरणनिर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. काही प्रसंगी अभिनय, ध्वनी आणि प्रकाशाच्या साहाय्याने निर्माण होणारे दृश्य प्रभाव प्रेक्षकांना खरोखरच दुसऱ्या जगात घेऊन जातात. 

"द... अदर वर्ल्ड" हे केवळ रंगभूमीवरील प्रयोग नाही, तर हा एक अनुभव आहे. नाटकानंतर प्रेक्षक आपल्या भोवतालचा, पर्यावरणाचा आणि मानवी अस्तित्वाच्या नैतिकतेचा पुनर्विचार करू लागतात. माणूस जोडून वैचारिक रित्या एकत्र करून माणुसकीला वाचवण्यासाठी या नाटकाच्या माध्यमातून यश येत आहे. नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने कलाकार आणि प्रेक्षकांच्या संवादाच्या माध्यमातून माणूस जोडला जातो आहे. आत्म विकास करण्यासाठी सर्व एकत्र येण्याची प्रक्रिया या निमित्ताने पूर्ण झाली. ते केवळ एक कथा सांगत नाही, तर आपल्याला जबाबदार नागरिक म्हणून कृती करण्यास उद्युक्त करते. 

- प्रवीण गांगुर्डे

सत्याचा शोध घेणारं नाटक! 'द... अदर वर्ल्ड ' सौंदर्यपूर्ण पंचतत्वाचा रंगमंचीय अनुभव   The ... Other World :  'द... अदर वर्ल्ड' नाटकाचे कथानक पंचतत्त्व अर्थात माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांच्या महत्त्वावर आधारलेले आहे.   सत्याचा शोध घेणारं नाटका 'द... अदर वर्ल्ड' सौंदर्यपूर्ण पंचतत्वाचा रंगमंचीय अनुभव    'द... अदर वर्ल्ड' हे रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक आहे. हे नाटक पंचतत्त्वांशी माती, पाणी, अग्नी, वायू, आकाश यांच्या सोबत आपली नव्याने ओळख करून देते आणि आपल्या पर्यावरण, पृथ्वी आणि मानवतेच्या रक्षणासाठी प्रत्येकाला सज्ज होण्याचे आवाहन करते. या सृजनशील कलाकृती मध्ये सौंदर्याचा बोध पाहायला मिळतो. निसर्ग आपल्या सर्वाना कुशीत घेतो आणि सृष्टीतून माणसाला सभोवताली पाहण्याची दृष्टी देतो. नदी, नाले, ओढे, झरे, समुद्र, पक्ष्याचे विविध आवाज त्यांचा किलबिलाट, वाढत्या शहरीकरणामुळे याच्या सगळ्यावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. म्हणून या नाटकाच्या विषयानुसार पर्यावरण आणि मानवतेच्या मुद्द्यांवर विचार करण्यास प्रवृत्त करणारा संदेश या नाटकातून देण्यात आला आहे.  "द... अदर वर्ल्ड" हे मंजुळ भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक जे मानवी अस्तित्व, निसर्ग आणि पंचतत्त्वांच्या परस्परसंबंधांवर प्रकाश टाकते. हे नाटक पारंपरिक कथाकथनापलीकडे जाऊन, प्रेक्षकांना या अनुभवात सहभागी करून घेतं. नाटकाचे कथानक पंचतत्त्व अर्थात माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांच्या महत्त्वावर आधारलेले आहे. आदी मानव ते आधुनिक कृत्रिम बुद्धिमात्तेच्या जगातील आजच्या मानवापर्यंत नाटक प्रेक्षकांना प्रवास करवते. मानवी जीवन आणि निसर्ग यांच्यातील असमतोल, आधुनिक जीवनशैलीमुळे पर्यावरणाला होणारे नुकसान, तसेच आपल्या जगाची सद्यस्थिती या सर्व बाबींची जाणीव करून देण्यासाठी हे नाटक एक प्रभावी माध्यम ठरते. हे नाटक केवळ गोष्ट सांगणारी कलाकृती नसून, ती आपल्याला अंतर्मुख करते. आपण ज्या निसर्गाचा भाग आहोत, त्याच्याशी आपले नाते काय आहे? आपण पुढील पिढ्यांसाठी कोणती दुनिया तयार करत आहोत? या मूलभूत प्रश्नांवर नाटक भाष्य करते. आणि प्रेक्षकांना अंतर्मुख करते.   दिग्दर्शन आणि सादरीकरण   मंजुल भारद्वाज यांच्या दिग्दर्शनशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे ते नाटकाला केवळ मनोरंजनाच्या चौकटीत मर्यादित ठेवत नाहीत, तर ते प्रेक्षकांना विचार करायला लावतात. नाटकात रंगमंचाचा वापर अत्यंत कल्पकतेने केला आहे. प्रकाशयोजना, नैसर्गिक ध्वनी निर्मित संगीत आणि सकस अभिनय या सर्व घटकांचा प्रभावी संगम पाहायला मिळतो. नाटकात संवादांपेक्षा दृश्यात्मक संकल्पनांना अधिक महत्त्व दिलेले आहे. कलाकारांचे शरीराभिनय, नैसर्गिक शरीराच्या सर्वच अवयवांची हालचालींचा अत्यंत प्रभावीपणे केलेला वापर, अभिनय कौशल्य आणि प्रभावी दिग्दर्शन यामुळे प्रेक्षकांना हा एक अविस्मरणीय वेगळा अनुभव मिळतो.   कलाकारांच्या अभिनयाविषयी   कलाकारांनी आपल्या भूमिकांमध्ये अत्यंत ताकदीने प्राण ओतले आहेत. नाटकात कोमल खामकर, अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे, नृपाली जोशी, तनिष्का लोंढे प्रांजल, समर, प्राणम्य या कलाकारांनी उत्तम अभिनयची कला सादर केली आहे. विशेषतः पंचतत्त्वांचे सादरीकरण करताना त्यांनी आपल्या देहबोलीद्वारे आणि हावभावांद्वारे या संकल्पनांना प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडले आहे. स्वच्छ आणि तरल अभिनय करण्यासाठी कलाकारांनी भरपूर मेहनत घेतली आहे. यात सादर केलेला प्रत्येक संवाद कलाकार प्रत्यक्ष आदिवासी पाड्यात जाऊन राहून प्रत्यक्ष जगले आहेत, म्हणूनच त्यांच्या अभिनयातून वास्तविक परिस्तिथीचे दृश्य प्रेक्षकांपर्यंत परिणामकरकपणे पोहचवण्यात कलाकार यशस्वी झाले आहेत. संवादांची संख्या मर्यादित असली, तरीही कलाकारांच्या सशक्त अभिनयामुळे संवादांची कमतरता भासत नाही. त्यांच्या वेशभूषा, संवादफेक, आणि शरीरभाषा यामुळे संपूर्ण नाटकाचा परिणाम अधिक परिणामकारक वाटतो.   संगीत ठरतेय अधिक प्रभावी !   या नाटकात वापरलेले पार्श्वसंगीत हे पारंपरिक वाद्यातून आणि अभिनेत्यांनी स्वतःच्या तोंडातून निर्माण केलेल्या ध्वनीतून, वेगवेगळ्या पक्षांचे आवाज, किलबिलाट, हवेचा आणि पाण्याचा ध्वनी फारच परिणाम करून गेला आणि कलाकारांनी आवश्यकतेनुसार निर्माण केलेले ध्वनी परिणाम वातावरणनिर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. काही प्रसंगी अभिनय, ध्वनी आणि प्रकाशाच्या साहाय्याने निर्माण होणारे दृश्य प्रभाव प्रेक्षकांना खरोखरच दुसऱ्या जगात घेऊन जातात.   "द... अदर वर्ल्ड" हे केवळ रंगभूमीवरील प्रयोग नाही, तर हा एक अनुभव आहे. नाटकानंतर प्रेक्षक आपल्या भोवतालचा, पर्यावरणाचा आणि मानवी अस्तित्वाच्या नैतिकतेचा पुनर्विचार करू लागतात. माणूस जोडून वैचारिक रित्या एकत्र करून माणुसकीला वाचवण्यासाठी या नाटकाच्या माध्यमातून यश येत आहे. नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने कलाकार आणि प्रेक्षकांच्या संवादाच्या माध्यमातून माणूस जोडला जातो आहे. आत्म विकास करण्यासाठी सर्व एकत्र येण्याची प्रक्रिया या निमित्ताने पूर्ण झाली. ते केवळ एक कथा सांगत नाही, तर आपल्याला जबाबदार नागरिक म्हणून कृती करण्यास उद्युक्त करते.   - प्रवीण गांगुर्डे

Reference:- https://marathi.hindustantimes.com/entertainment/the-other-world-theater-play-review-in-marathi-must-read-141738834627195.html