लोकमत, शनिवार, दि. १५ नोव्हेंबर २०२५
विनाशरूपी विकासाचे सत्य 'द... अदर वर्ल्ड' मध्ये उलगडणार
औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलामंदिरात कार्यक्रम
पुणे : पुण्यातील औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलामंदिरात शनिवारी (दि. १५) सायंकाळी साडेपाचला विनाशरूपी विकासाचे सत्य उलगडणारे 'द... अदर वर्ल्ड' हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे, विनाशरूपी विकासाचे सत्य त्यातून उलगडले जाणार आहे.
माणूस विसरून गेला आहे की, तोही निसर्गाचा एकात्म भाग आहे. आज जेव्हा एखादी मोठी नैसर्गिक आपत्तीसमोर येते, तेव्हा राजकारण, समाजकारण, अर्थकारण हे सगळे मुद्दे क्षणात बाजूला सरकतात. कारण निसर्ग जेव्हा आपले रौद्र रूप धारण करतो, तेव्हा आपण किती खुजे आहोत हे जाणवते. केदारनाथच्या
पुरापासून ते वायनाडमधील दुर्घटनेपर्यंत ते आता मराठवाड्यातील पुराची स्थिती अशा प्रत्येक संकटामागे मानवी हस्तक्षेप, निसर्गाची अयोग्य छेडछाड हीच मुख्य कारणे आहेत. 'वसुधैव कुटुंबकम्' हे आपण म्हणतो; पण प्रत्यक्षात आपल्या मातीशीच बेईमानी करतो. जमिनी, नद्या, जंगलं या साऱ्या नैसर्गिक संपत्तींचा अतिरेकी वापर आणि विनाश सुरू आहे. 'झाडे लावा, झाडे जगवा' हे केवळ
माणसाच्या मनाशी संवाद
रंगभूमीच्या चार प्रमुख प्रवाहांपैकी 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' हा सशक्त, मानवकेंद्री आणि परिवर्तनवादी नाट्य सिद्धांत आहे. सत्ता-पोषित रंगभूमी जिथे केवळ नाच-गाणी आणि बाह्यरंजन करते, तिथे 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' माणसाच्या मनाशी संवाद साधते, विवेकाला जागवते.
प्रपोगंडा थिएटर जिथे एका विचारधारेचा प्रचार करतं, तिथे हे समग्र भूमिकेचा पुरस्कार करतं आणि प्रत्येक सत्तेला आरसा दाखवते. बुद्धिजीवी रंगभूमी जिथे केवळ प्रयोग आणि तात्त्विक चर्चा करतात, तिथे 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' सामान्य माणसाच्या संघर्षांचे आवाज बनत माणसाला उन्मुक्त करण्याचे मानवी दर्शन आहे.
घोषवाक्य उरले आहे. निसर्गाविषयीची ही जागृती प्रत्येक स्तरावर आवश्यक आहे. जर्मनीसारख्या युरोपीय देशात गाजलेले 'द... अदर वर्ल्ड' हे नाटक आता भारतातही सादर होत आहे.
'द... अदर वर्ल्ड' हे नाटक आपल्याला हेच आठवण करून देते, की निसर्ग हाच आपला खरा मार्ग आहे. नैसर्गिक होऊन निसर्गाला जपण्याची आशा जागवते आणि बाहेरील प्रकृतीसोबत आपल्या आतील प्रकृतीला वाचवण्याची दृष्टी मांडते. या नाटकात पंचतत्वांच्या उत्पत्तीपासून सजीवसृष्टी आणि मानवनिर्मितीचा अखंड प्रवास उलगडतो. हिमयुग-अश्मयुगांमधून पुढे येताना मानवाने शेती आणि पशुपालनाची दिशा पकडली. या प्रवासात त्याने घेतलेले मूलभूत शोध अग्नीचा उपयोग, साधनांची निर्मिती, पाण्याचे नियोजन, बीजसाठवण, निवाऱ्याच्या उभारणीपासून ते सहजीवनाच्या व्यवस्थांची निर्मिती हे सर्व निसर्गाला पूरक असेच होते.
मानवाचा विकास पृथ्वीच्या चक्राशी जोडलेला, सजीवसृष्टीच्या गरजांना ओळखणारा असा होता. पण कालांतराने संपत्ती आणि मालकीच्या संकल्पनांतून समाजव्यवस्थेचा विस्तार झाला आणि मानव दास्यत्व, गुलामगिरी व सरंजामशाहीच्या अंधारात गुरफटला. औद्योगिक क्रांतीने मोठ्या प्रमाणावर उत्पादनाला वेग दिला, ज्यातून भांडवलशाही आणि साम्यवाद यांसारख्या व्यवस्थांचा उदय झाला. तथाकथित 'विकासाचे' मार्ग पर्यावरण, इकॉलॉजी आणि हवामानाला बाधक ठरत आहेत. आपण विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहोत. पृथ्वी, पर्यावरण, इकॉलॉजी, हवामान आणि मानवता यांचे संरक्षण, जतन व संवर्धन करण्याचा संदेश हे नाटक कलात्मकतेने संवेदनशील भूमिका मांडते

No comments:
Post a Comment