Pages

Sunday, February 24, 2019

गर्भ : युद्ध खोडून सकारात्मकतेचे सृजन

आपलं महानगर
दिनांक - २४ फेब्रुवारी २०१९

माझ्या गर्भ नाटकातील वरील संवाद देशातील सद्यस्थितीला पूरक आहेत. कारण एकंदरीतच सध्या देशात युद्धाची खुमखुमी वाढत चालली आहे, असं दृश्य दिसते. युद्ध व्हावे कि नाही या संदर्भातील मतभिन्नतेच्या बाबी देखील आपल्या समोर येत आहेत. राजकीय हेवेदावे, युद्ध नितीबाबत वादविवाद, आरोप प्रत्यारोप या सगळ्या आधी थोडं मागे जाऊन विचार करूयात...




युद्ध युद्ध युद्ध, गिद्ध गिद्ध नोचते हैं जिंदा मांस 
चिल कौंवे तार तार करते हैं जीवन को
युद्ध होता है शांति के नाम पर, सभ्यता के नाम पर,
मानवता को बचाने के नाम पर होता है युद्ध !

आपणा सर्वांनाच युध्दाचा रक्तरंजित इतिहास ठाऊकच आहे, कधी धर्माच्या स्थापनेसाठी युद्ध झालीत तर कधी साम्राज्याच्या विस्तारासाठी तर कधी शत्रूला नमविण्यासाठी युद्ध झाली आहेत. या युद्धाची भीषणता आणि भयाणता काय असते हे देखील आपण ऐकले व वाचले आहे, काहींनी तर अनुभवले ही आहे. सारे काही बेचिराख होऊन कितीतरी पिढ्यांना या युद्धाच्या दाहकतेतून जावे लागते. या युद्धातून विध्वंसापलीकडे काहीच साध्य होत नाही, मग कशासाठी करतो आपण हे युद्ध ?
असे म्हणतात कि, मानवतेला वाचवण्यासाठी युद्ध करतात पण युद्धात मानवतेचाच बळी जातो. पाहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध ! पण या युद्धांतुन निष्पन्न काय झाले, मानवीयतेचा विनाश आणि कधीही न भरून निघणार कालांत! तरीही आपल्याकडे युध्दाच्या वाच्यता होतच आहेत. या परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो की, युद्ध करणे इतकं सोपे आहे का ? युद्धाची संकल्पना देशाची प्रगती करणारी आहे का ? युद्धाचा विचार खरंच मानवीय आहे का ? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत.

युद्धाचा विचार जरी क्षणिक असला तरी त्याचे पडसाद किती तरी काळ उमटत राहतात हेही तितकेच महत्त्वाचे. वर्तमान परिस्थितीत युद्ध व्हावे किंवा नाही याच्या पलीकडे जाऊन, युद्धाची विभिषिका खोडून जीवन आणि जग किती सुंदर आहे, हा भाव निर्माण करणारे रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित नाटक गर्भ !


गर्भ नाटक आजच्या युगात जिथे माणुसकी लोप पावत चालली आहे, जिथे चंगळवाद आणि द्वेषाच्या चढाओढीत मानवतेचा र्‍हास होत चालला आहे, तिथे माणुसकीचा भाव जागवते. माणसाच्या माणूस होण्याच्या संघर्षात, नाटक गर्भ हरवत चाललेल्या मानवीय संवेदनांना स्पर्श करते. माणसाच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंतच्या जीवन प्रवासात माणुसकीचा शोध घेते.
अखंड ब्रम्हांड हे लौकीकतेने संपन्न आहे आणि पृथ्वीची निर्मिती याच लौकीकतेने परिपूर्ण अशा प्राकृतिक तत्वांनी झाली. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वांपासून सृजित माणसाचा सुंदर जन्म ! त्याच्या समोर निसर्गाचे सौंदर्य , अगणित अवकाश आणि असंख्य स्वप्न असतात, पण जस जशी त्याची वाढ होते, हळू – हळू त्याला एका चौकटीत बसवले जाते आणि बेमालूमपणे त्याच्याभोवती भाषा , धर्म , देश , संस्कृती, समाज याचे जाळे तयार केले जाते. थोडक्यात त्याचे कन्डीशनिंग केले जाते.

त्याचा विळखा इतका घट्ट होत जातो की, माणसाचे रूपांतर एका हिंसक पशुमध्ये होते. वर्षानुवर्षे चालत आलेल्या जात , रुढीवादी परंपरा, उदारमतवादी विचार, दहशतवाद, वर्णवाद, धर्मांधता हे देखील या पशू सोबत जन्म घेतात. मानवी मूल्य, मानवी संवेदना यावरच आघात केला जातो आणि तिथून सुरुवात होते अराजकतेची ज्याचा परिणाम आहे द्वेष आणि सूड घेण्याची प्रवृत्ती.

नाटक गर्भ हे माणसाला निसर्गाच्या जवळ नेते. माणूस जेव्हा निसर्गाच्या जवळ जातो, तेव्हा तो निसर्गाच्या प्रत्येक जाणिवेला स्वतःच्या आत पाहतो. जशी प्रकृती बाहेर आहे तशी प्रकृती माणसाच्या आत ही आहे. नाटक गर्भ माणसाच्या आतील प्रकृतीला, प्राकृतिक तत्वांना जिवंत करून विकारी वृत्तीतून बाहेर काढते. नाटक आयुष्यात उतरते याचा अनुभव मी या गर्भ नाटकाच्या प्रक्रियेत घेतला, सर्वात आधी एक माणूस म्हणून स्वतःकडे पाहायला शिकले.या नाट्य प्रक्रियेत विचारांची खोली आणि वैचारिक प्रगल्भता वाढली. गर्भ नाटकाने आम्हा कलाकारां सोबतच प्रेक्षकांना देखील माणूस म्हणून घडवले. समाजाने निर्माण केलेल्या कोषांना भेदून प्रत्येक व्यक्तीला गर्भ नाटकाने उन्मुक्तता प्रदान केली आहे.

जेव्हा कलेशी आपण एकरूप होतो, तेव्हा कला आपल्या आतील न्यूनगंड बाहेर काढून कलाकाराला उन्मुक्त करते. प्रेक्षकांना ती उत्तम अदाकारी वाटतेच पण तेव्हा कलाकार कलात्मकता आणि कला साधनेच्या एका उंच शिखरावर असतो. अशी कलाकृती पहिल्या नंतर माणूस , प्रेक्षक जगातील संतापातून बाहेर पडतो . माणसात विकार असले की न्यूनगंड निर्माण होतो, त्यातून द्वेष ,प्रतिशोध या हीन प्रवृत्ती माणसाला वर्चस्ववादी होण्यास प्रवृत्त करतात व माणूस, सत्ताधीश युध्दाकडे वळतो. युद्धात होतो विनाश, विध्वंस,अशाच प्रकारे युद्धात नंतर कितीतरी काळ अंधकार असतो.
अशावेळेस गर्भ नाटकातील ‘खूबसुरत है जिंदगी’ चा सूर आत्मीय मानवी जीवनाचा आशावाद निर्माण करतो व प्रेक्षकांच्या माध्यमातून समाजात माणुसकीला तरंगीत करत राहतो.

नाटक गर्भ ने प्रेक्षकांना हि उन्मुक्त केले आहे. याचे उदाहरण असे – अमेरिकी बंडखोर गायक पीट सीगर हा आयुष्यभर साम्राज्यवादाच्या विरोधात होता, रंगभेद आणि वंशभेदाचा कठोर टीकाकार होता, जगातील सर्वाधिक प्रसिद्ध गाणे ‘वुई शॅल ओव्हरकम वन डे ’च्या अमर रचनाकाराच्या मृत्युच्या शोकांतिकेत एक प्रेक्षक अस्वस्थ होतो.

नाट्यनुभुतीतील स्पंदनं, विचार, प्रश्न, भावना आणि अस्तित्वाचा संघर्ष या सर्व पैलुंना स्पर्श करत प्रेक्षक स्व अवलोकन करत असतो. खरंतर आपल्या स्वप्नांना वास्तविकतेच्या आधारावर आव्हान देणे आणि ते प्रत्यक्षात आणणे हेच खूप मोठे आव्हान आहे. स्वप्नांना पूर्ण करण्याचे प्रोत्साहन, आव्हानांशी लढण्याचे बळ, संघर्षाचा आनंद आणि जिंकल्याचे समाधान या सर्वच स्तरांवर प्रेक्षक स्वतःला पाहतो आणि भावनात्मक तसेच मानसिक स्तरावर उन्मुक्त होतो. एका माणसाच्या मनापासून दुसर्‍या माणसाच्या मनापर्यंत पोहोचण्याचे माध्यम म्हणजे संवाद तर माणसाला माणसाशी जोडणारे तत्व आहे प्रेम, जगात असा कुठलाच मुद्दा नाही, कुठलीच अशी बिकट परिस्थिती नाही जिचे संवाद आणि प्रेमाने निरसन होऊ शकत नाही. गर्भ हे नाटक संवाद आणि प्रेम ही तत्वे रुजवण्याचा प्रयत्न करते. गर्भ एका उत्प्रेरकाची भूमिका निभावते, ज्यातून कलेच्या माध्यमातून सांस्कृतिक क्रांतीचा उदयाचा मार्ग प्रश्न होईल. हे नाटक याच सांस्कृतिक क्रांतीचे दिवास्वप्न आहे.

सायली पावसकर (रंगकर्मी)




स्त्रोत:- http://www.mymahanagar.com/featured/war-eradication-and-creation-of-positivity/70626/?fbclid=IwAR10FxuD7fy-Wxzj96DNRM1xIy-OE-xsNV4LWdBeA2_Ba4TtnXD7q5zCcLo

Sunday, February 17, 2019

थिएटर ऑफ रेलेवन्स रंगप्रशिक्षण

आपलं महानगर

दिनांक - १७ फेब्रुवारी २०१९ 



थिएटर ऑफ रेलेवन्स’ च्या नाट्यकार्यशाळेत सहभागींना मंच, नाटक आणि जीवनाशी संबंध, नाट्य लेखन, अभिनय, दिग्दर्शन, समीक्षा, नेपथ्य, रंगशिल्प, रंगभूषा इत्यादी विभिन्न रंग दृष्टीकोनांवर प्रशिक्षित केले जाते. मागील 26 वर्षात 16 हजारापेक्षा जास्त रंगकर्मींनी 1000 कार्यशाळेत भाग घेतला आहे . भांडवलशाहीला बळी पडलेले कलाकार कधीही आपली कलात्मक सामाजिक जबाबदारी घेत नाहीत त्यामुळेकला ही कलेसाठीया चक्रव्यूहात फसले आहेत आणि भोगवादी कलेच्या संभ्रमात फसून नष्ट होत आहेत.

प्रशिक्षण म्हणजे ज्ञानार्जन. नवीन गोष्टी शिकण्याचं माध्यम. रंग प्रशिक्षण म्हणजे विचारांच्या प्रगल्भतेचे प्रशिक्षण, कलेचे व्यापक रूप. त्याचा मूळ उद्देश आणि नाट्य कलेच्या माध्यमातून वैयक्तिक विकासासह सामाजिक-वैचारिक परिवर्तनाची मुळे रुजवणे.

भारतीय संस्कृतीमध्ये नाटकाला अनन्य साधारण महत्त्व आहे. नाटक आपल्या सामाजिक व्यवस्था, संस्कृती यांचा आरसा दर्शवते. विशेषतः मराठी रंगभूमी आणि बंगाली रंगभूमीला विशेष दर्शक संस्कार आहेत. आपल्याकडे अशी बरीच उदाहरणे आहेत की नाटकामुळे व्यक्तिगत बदल घडले. महात्मा गांधीनी राजा हरिश्चंद्र हे नाटक पाहून जीवनभर सत्य बोलण्याचा धडा घेतला.

म्हणून नाटक हे सतत जिवंत राहणे आवश्यक आहे आणि काळाची गरज आहे. नाट्याभिनय करणे ही बहुतांश व्यक्तींची सुप्त इच्छा असते. अभिनय हा अभिजात असतो आणि त्याला मार्गदर्शनाची ही गरज असते. नाटक हे आपले पूर्वापार चालत आलेले प्रसारासाठीचे संवादाचे माध्यम आहे, म्हणून आज भारतात वेगवेगळ्या संस्था समूह नाट्य प्रशिक्षण देतात. पण या नाट्य प्रशिक्षणामधून नाटक खरंच जिवंत राहते का? भारतातील ज्या मोठमोठ्या नावाजलेल्या नाट्य प्रशिक्षण संस्था आहेत, ज्या राष्ट्रीय सांस्कृतिक संवर्धनाच्या नावावर काम करतात तिथे नाटक पेरले तर जाते, पण नाटक उगवते का ?
नाट्य क्षेत्रात जेव्हा मी आले, तेव्हा कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण नव्हते घेतले, पण ऐकीव आणि मित्रमैत्रिणींच्या अनुभवातून दिसून येत होते, कळून येत होते. या प्रशिक्षण पद्धतीत तुम्ही स्वतःला सतत कसे presentable, प्रदर्शन स्वरूप दिसाल याकडे जास्त कल होता, म्हणजे प्रदर्शनात्मक वस्तू व्हा, कलेचे मूळ सत्व राहते बाजूला ! मुळात नाटक म्हणजे मेंदूचे कार्य, विचारांचे कार्य त्याला केवळ वरवरचा चंदेरी मुलामा चढवून कसे चालेल, खोलवर काम व्हायला हवे असे सतत वाटत होते. अशाच शोधात चाचपडत असताना TOR रंगसिध्दांताची ओळख झाली.



या रंग सिद्धांताच्या नाटकांमध्ये काम करत असताना माझे खरे रंगप्रशिक्षण सुरू झाले.

थिएटर ऑफ रेलेवन्सचे नाट्य प्रशिक्षण केवळ व्यक्तिचित्रण आणि मनोरंजन इतकेच सीमित राहता सक्षमीकरणावर भर देते. कलाकार म्हणून घडता घडता आधी एक माणूस म्हणून घडण्याची सुरुवात होते. भाव-अभिनय-नाट्यसौंदर्य यासोबत वैचारिक पाया भक्कम करण्यासाठी थिएटर ऑफ रेलेवन्समध्ये कलाकार हा विचार लिहिण्यासाठी, मांडण्यासाठी, प्रस्तुत करण्यासाठी प्रेरित होतो.

थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य प्रशिक्षणामध्ये सर्वप्रथम unlearn केले जाते. ज्याप्रमाणे शेतकरी आधीचे पीक कापून पुन्हा शेत नांगरतो जेणे करून नवीन विचारांचे बियाणे रुजवता येतील. शेतकरीदेखील जशी आहे तशी जमीन स्वीकारत नाही. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या बौद्धिक सुपिकतेसाठी वैचारिक नांगरणी येथे केली जाते.

थिएटर ऑफ रेलेवन्सच्या नाट्यकार्यशाळेत सहभागींना मंच, नाटक आणि जीवनाशी संबंध, नाट्य लेखन, अभिनय, दिग्दर्शन, समीक्षा, नेपथ्य, रंगशिल्प, रंगभूषा इत्यादी विभिन्न रंग दृष्टीकोनांवर प्रशिक्षित केले जाते. मागील 26 वर्षात 16 हजारापेक्षा जास्त रंगकर्मींनी 1000 कार्यशाळेत भाग घेतला आहे . भांडवलशाहीला बळी पडलेले कलाकार कधीही आपली कलात्मक सामाजिक जबाबदारी घेत नाहीत त्यामुळेकला ही कलेसाठीया चक्रव्यूहात फसले आहेत आणि भोगवादी कलेच्या संभ्रमात फसून नष्ट होत आहेत.” थिएटर ऑफ रेलेवन्सनेकलेसाठी कलाअसणा-या साम्राज्यवादी आणि भांडवलशाही विचारांच्या चक्रव्यूहाला आपली तत्त्व आणि सार्थक प्रयोगांनी तोडले आहे आणि कैक संकल्पनांना रुजवले आहे अभिव्यक्त केले आहे.

थिएटर ऑफ रेलेवन्स रंग सिद्धांतानुसार रंगकर्म दिग्दर्शक आणि अभिनेता केंद्रित होण्याऐवजीलेखक आणि प्रेक्षक केंद्रित असावं, कारण प्रेक्षक हाच सर्वात मोठा आणि शक्तिशाली रंगकर्मी आहे. परफॉर्मर आणि दर्शक ही आमची मूलभूत आणि पायाभूत आवश्यकता आहे. प्रेक्षकांच्या मुद्यांना आणि त्यांच्या समस्यांनाच या नाट्य सिद्धांताने आपले मिशन बनवले.

थिएटर ऑफ रेलेवन्सचे सिद्धांत
. असा रंगकर्म ज्याची सर्जनशीलता विश्वाला मानवीय आणि सुंदर बनवण्यासाठी प्रतिबद्ध आहे.
.कला कलेसाठी राहता समाजाच्याप्रति आपल्या जबाबदारीचे पालन करेल आणि लोकांच्या जीवनाचा हिस्सा बनेल .
. जे मानवीय गरजांना पूर्ण करेल आणि स्वतःला अभिव्यक्ती माध्यमाच्या स्वरूपात व्यक्त करेल.
. जो स्वतःला परिवर्तनाच्या माध्यम स्वरुपात स्वतःला शोधेल आणि रचनात्मक बदलावाची प्रक्रिया पुढे नेईल.
. असे रंगकर्म जे मनोरंजनाची सीमा तोडून जीवन जगण्याचे स्त्रोत किंवा पद्धती बनेल.

थिएटर ऑफ रेलेवन्स मधले रंगप्रशिक्षण हे केवळ चार भिंतीत अडकून राहता नैसर्गिक ठिकाणी होते. जिथे निसर्गाच्या माध्यमातून मानवी तत्वांची ओळख होते. आत्मशुद्धीकरण प्रक्रियेला सुरुवात होते आणि एक उत्कृष्ट कलाकारासोबत एक सर्व संपन्न व्यक्तीही घडते. वर्षानुवर्षं चालत आलेला तोच तो अभ्यासक्रम आणि तेच ते विषय, यांच्यापासून वेगळे, व्यापक आणि नाविन्यपूर्ण विषयांवर मंथन होते.
इतर नाट्य प्रशिक्षणात शिकवले जाते, म्हणून तिथे एक शिक्षक आणि बाकी विद्यार्थी असतात, पण थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य पद्धतीमध्ये खुद से सीखो, एक दुसरे से सीखो, मिलकर सीखो ही प्रक्रिया अवलंबली जाते.
थिएटर ऑफ रेलेवन्सच्या प्रशिक्षणाचे वैशिष्ठ्य म्हणजे इथे प्रत्येक मुद्रा, कृती, भाव याला विचारांशी आणि उद्देश्याशी जोडले जाते. म्हणून आपण कुठलीही मुद्रा किंवा कृती का करत आहोत याचे उत्तर कलाकाराला माहीत असते.

Stylization ला इतर नाट्य प्रशिक्षणात खूप महत्व दिले जाते, ज्यात कलाकाराची कलात्मकता संपते, थिएटर ऑफ रेलेवन्स stylization ला खोडते व्यक्तीच्या कलात्मक संवेदनांना प्राधान्य देते.

थिएटर ऑफ रेलेवन्स हे सामान्य प्रशिक्षण नाही, माणसातील कलात्मकता, स्पंदन, विचार, दृष्टी, सकारात्मक भाव या सगळ्या आयामांनी कलाकाराला उन्मुक्त करते आणि सुंदर आयुष्य जगण्यास प्रेरित करते.


उदाहरणार्थ-थिएटर ऑफ रेलेवन्सच्या कार्यशाळेत निसर्गाच्या सान्निध्यात असताना उत्प्रेरक मंजुल भारद्वाज यांनी आम्हा कलाकारांना निदर्शनास आणून दिले की-पाण्याचे बाष्पात रूपांतर होत असताना कितीसा वेळ लागतो? त्याचप्रमाणे बदलाचा विचार येण्यासाठी एक क्षणच पुरेसा असतो, ही शिकवण प्रत्यक्ष निसर्गाने आम्हाला दिली. असे प्रत्यक्ष प्रशिक्षण पाठ्यपुस्तकीय ज्ञानातून मिळत नाही. म्हणूनच थिएटर ऑफ रेलेवन्सचे प्रशिक्षण वैशिष्ठ्यपूर्ण ठरते.

थिएटर ऑफ रेलेवन्समध्ये खोट्या stardom पेक्षा जमिनीशी connected राहण्याचे प्रशिक्षण मिळते.



थिएटर ऑफ रेलेवन्समधल्या प्रत्येक नाटकातून मिळणारारचनात्मक-कलात्मक बोधप्रत्यक्ष आयुष्यात उतरवला जातो, इथे नाटक रंगमंचावर केले जाते प्रत्यक्ष जीवनात नाही. म्हणूनच थिएटर ऑफ रेलेवन्स प्रशिक्षणामध्ये आधी माणूस होण्याच्या प्रक्रियेला महत्त्व दिले जाते. कारण माणूस जितका खरा तितकी त्याची कला खरी !

थिएटर ऑफ रेलेवन्स ने जीवनाला नाटकाशी जोडून कलात्मक चेतनेचा उदय करून त्याला प्रेक्षकांशी जोडले आहे. थिएटर ऑफ रेलेवन्सच्या कलात्मक प्रस्तुती कुठल्याच विशेष, प्रतिष्ठित रंगमंचापर्यंत मर्यादित नाही किंवा अशा रंगमंचाच्या चौकटीत अडकत नाहीत, कुठल्याच सरकारी, गैरसरकारी, देशी, विदेशी संस्थानांवर वित्त पोषित नाही. या नाट्य सिद्धांताचे मूळधनआहे ह्याचे उद्देश्य आणि मूळसंसाधनआहेत. ‘प्रेक्षक’, ज्यांच्या सहयोग आणि सहभागीतेने हे नाट्य तत्व परिस्थितीच्या विरोधात जाऊनमाणुसकी/मानवतेचाआवाज बनून, राष्ट्रीय आणि वैश्विक स्थरावर आपले तत्व आणि सकारात्मक प्रयोगांमधून एक उत्कृष्ट, सुंदर आणि मानवीय विश्वाची निर्मिती करत आहे. ‘थिएटर ऑफ रेलेवन्सनाट्य सिद्धांत सांस्कृतिक चेतनेचा निर्माण करून सांस्कृतिक क्रांती आणण्यासाठी प्रतिबद्ध आहे !


-अश्विनी नांदेडकर (रंगकर्मी)

 



Sunday, February 10, 2019

माणसाला माणूस बनवते ती कला !

आपलं महानगर 
दिनांक - १० फेब्रुवारी २०१९ 



माझ्यातील व्यक्तिमत्वाला निर्माण करण्यासाठी या प्रक्रियेतील नाटकाने माझ्यातील माणुसकीचे मूल्य जागृत केले. कलाकार तर कधीही होता येऊ शकते; पण एक चांगला माणूस निर्माण होणे, हे मला महत्त्वाचे वाटू लागले. थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांतामध्ये असणारी नाटके ही व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी प्रेरित करतात. खरं तर ह्या नाटकांच्या प्रक्रियेत असताना मला जाणीव होऊ लागली माझ्यातील नीती मूल्यांची तसेच नाटकगर्भ” , ” अनहद नादअनहर्ड साउंड्स ऑफ युनिव्हर्स ” , “राजगतीया क्लासिक नाटकांमुळे माझ्यातीलकलाकारप्रगल्भ झाला, त्याचबरोबर मला सामाजिक भूमिकेची जाणीव या नाटकांनी करून दिली.
माणसाला माणूस बनवते ती कलाहा बोधथिएटर ऑफ रेलेवन्सनाट्य सिद्धांत माणसामध्ये निर्माण करतो. माझ्या आत एक माणूस आहे, नक्की हा माणूस प्रत्येकात जिवंत असतो का ? की फक्त चालतो, बोलतो आणि अंधाधुंद जीवन जगतो? असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. कारण, सर्वसामान्य जीवन तर प्राणीही जगतात. मग माझ्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये काय फरक आहे, हाही प्रश्न त्यानंतर निर्माण होतो. त्याच्यासाठी उत्तर आहे कीहो, मी माणूस आहे कारण, मी विचार करतो. विचार करणं हे मला प्राण्यापेक्षा वेगळं करते. ही माणूस असण्याची ओळख आहे”. इथे व्यक्तिगत अनुभवात लक्षात येते की, जन्माला आल्यापासूनच चेतना, संवेदना, जाणिवा त्या बालवयातच जागृत होतात. पण संस्कार संस्कृतीच्या नावाखाली समाज मलामाणसाचा’ “मर्द (पुरुष)” करीत होता, पुरुषार्थाच्या नावाखाली संवेदनहीन होऊन जगण्यास सांगत होता.
सर्वसामान्यपणे बहुतांश पुरुषांबरोबर हे घडते. कारण, समाज सांगतोमर्द को दर्द नहीं होता”. व्यसनाधीन म्हणजे मर्द, ताकदवान असून इतरांचे शोषण करणारा म्हणजे मर्द .. मुलगी म्हणजे एक वस्तू आहे, हा पितृसत्ताक विचार पुढे नेणारा म्हणजे मर्द. स्त्री ही आपल्यासारखीच एक माणूस आहे, ही जाणीव फार कमी जणांना असते. जसा मला जगण्याचा, वागण्याचा, वावरण्याचा अधिकार आहे तसा तो स्त्रियांना ही आहे.. आजच्या समाजातील पुरुषांत ही संवेदनशीलता असणे अत्यंत आवश्यक आहे. हे मी सांगतोय ह्याचा अर्थ मी दुसर्‍या कोणाबद्दल बोलत नाही, मी स्वतःबद्दल बोलत आहे. अशीच माझीदेखील मानसिकता होती. माझ्यामध्ये असणारी ही पितृसत्ताक मानसिकता बदलण्यासाठी मला मार्ग दाखवलाथिएटर ऑफ रेलेवन्सनाट्य तत्वज्ञानाने आणि मला माझ्या वागण्याची जाणीव करून दिली की, नक्की मी वागतोय तो कसा वागतोय? या प्रक्रियेतून जाणीव निर्माण होऊ लागली. जाणीव निर्माण होताना माझ्या आत माणूस जन्म घेऊ लागला आणि माणुसकी निर्माण होऊ लागली.

माझ्यातील व्यक्तिमत्वाला निर्माण करण्यासाठी या प्रक्रियेतील नाटकाने माझ्यातील माणुसकीचे मूल्य जागृत केले. कलाकार तर कधीही होता येऊ शकते, पण एक चांगला माणूस निर्माण होणे, हे मला महत्त्वाचे वाटू लागले. थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांतामध्ये असणारी नाटके ही व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी प्रेरित करतात. खरं तर ह्या नाटकांच्या प्रक्रियेत असताना मला जाणीव होऊ लागली माझ्यातील नीती मूल्यांची तसेच नाटकगर्भ” , ” अनहद नादअनहर्ड साउंड्स ऑफ युनिव्हर्स ” , “राजगतीया क्लासिक नाटकांमुळे माझ्यातीलकलाकारप्रगल्भ झाला, त्याचबरोबर मला सामाजिक भूमिकेची जाणीव या नाटकांनी करून दिली. कला आणि कलाकार वस्तू नाही याची जाणीव करून देणारे नाटक – “अनहद नाद” , माझ्यातील माणसाचा शोध घेणारे नाटकगर्भरंगचिंतक मंजुल भारद्वाज ह्यांनी लिहिलेल्या या नाटकांनी माझ्यातील न्यूनगंड नष्ट करून, मला एक सक्षम व्यक्ती म्हणून माझ्या जीवनात उभे केले.
थिएटर ऑफ रेलेवन्सनाट्य सिद्धांत हे एकमेव तत्व आहे जे मनोरंजनाची भिंत तोडून परिवर्तनाची दिशा देत आहे आणि ते परिवर्तन मी माझ्या आत अनुभवत आहे. माझ्या सह-कलाकारांनी थिएटर ऑफ रेलेवन्स रंग प्रशिक्षण पद्धतीद्वारे मला रंगमंचावर उभे राहण्यास खूप मदत केली.
नाट्य प्रक्रियेत आल्यापासून माझीदृष्टीबदलून गेली. व्यक्तीकडे पाहत असताना मी एका माणसाच्या नजरेतून पाहू लागलो. रंगमंचावर उभं राहण्यापासून प्रवेश घेईपर्यंत रंगप्रशिक्षणामध्ये माझ्या सहकलाकारांनी मला मोठ्या प्रमाणात मदत केली. त्यामध्ये, रंगकर्मी अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर आणि कोमल खामकर यांचा समावेश आहे.

रंग प्रशिक्षणाच्या माध्यमाने लिहणे वाचणे, समूहात वारंवार होणार्‍या तात्विक, वैचारिक चर्चा यामुळे विचारांची बैठक निर्माण झाली. माझ्या आयुष्यात कोणत्याही नाटकात मी कधीही काम केले नव्हते. त्यामुळे माझं बोलणं, वागणं, रंगमंचावर सहज होत नव्हतं. म्हणजे बोलायला काहीच हरकत नाही शून्यापासून माझी सुरुवात झाली. त्यामध्ये, सातत्य, शिकण्याचा भाव, जिद्द ठेवून मला हे करायचं आहे ह्या उद्देशाने, मी ते समजून घेत होतो, थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताच्या रंगकर्मींची विशेषता म्हणजेकधीही हा भाव निर्माण होत नाही की, ह्याला तर काहीच येत नाही, मी का सांगूत्या ठिकाणी समजूतदारपणा आणि शिकवण्याचा भाव होता. त्यातून, माझ्यात होणार्‍या छोट्या छोट्या बदलांना त्यांनी स्वीकारले आणि रंगमंचावर मी उभा राहिलो.
नाटकाच्या प्रक्रियेमुळे माझ्या घर परिवारात ही परिवर्तन झाले.
हो खरं आहे, नाटकामध्ये असणारे संवाद आणि माझी भूमिका, नाटकातील विचार यामुळे जाणीव झाली. माझ्या भूमिकेची! जसं, घरातील काम हे फक्त महिलेचे, हे आतापर्यंत आपण पाहत आलोय, अनुभवत आलोय. पण, घरामध्ये एक पुरुष म्हणून मीदेखील काम करू शकतो, हा दृष्टीकोन नाटकाने दिला. सामाजिक स्तरावर स्त्री पुरुषांमध्ये आजही कामाच्या आधारे भेदभाव होत आहेत. घरात काम करणारी महिला मोफत काम करते. पण, ज्यावेळी पैशाची गोष्ट येते त्यावेळी, पुरुष बाहेेर जाऊन तेच काम करतो आणि त्याचा मोबदला घेतो. उदा. ज्यावेळी घरात महिला जेवणाचं काम करते त्यावेळी, तिचा संबंध कर्तव्य, परंपरा अशा बाबींंशी लावला जातो.
पण जेव्हा हेच काम पुरुष बाहेर हॉटेलमध्ये जाऊन करतो त्यावेळी तो पैसे घेतो. तिकडेच गोष्ट थांबत नाही पण, ज्यावेळी तोच पुरुष घरी येतो, घरात काम करायची वेळ येते, त्यावेळी त्याला लाज वाटते, असं का होतं? नाटकसंवाद एक पहलमध्ये असणारी वैचारिक दृश्य रचना माझ्यातील कामाबद्दल असणार्‍या न्यूनगंडाला बाहेर काढून त्या ठिकाणी मला माझ्या वागण्याची जाणीव करून देत होती. त्यानंतर माझ्या घरामधील कामाबद्दल असणारा भेद मी संपवला. मला जाणीव आहे की हे माझं घर आहे त्यामुळे, मला माझ्या घराची निर्मिती एक समान तत्वाने करायची आहे. त्यानुसार, मी माझ्यामध्ये बदल करून माझ्या घरात असणार्‍या सकारात्मकतेला अनुभवत आहे. माझे हे आपणास आवाहन आहे की, स्त्री-पुरुष म्हणून नाही तर माणूसम्हणून जगूया !
-रंगकर्मी 
-
तुषार म्हस्के




Sunday, February 3, 2019

परिवर्तनाचा कलात्मक प्रवास


आपलं महानगर 
दिनांक - १० फेब्रुवारी २०१९ 


परिवर्तन आकस्मिक असते, कल्पनेच्या पलीकडचे असते. कारण परिवर्तन हे तर्कसंगत वास्तववादी असते. विचार परिवर्तन ही एक स्व-परिवर्तनाची प्रक्रिया आहे. आपल्याकडे, स्वतःच्या विचारांकडे तटस्थपणे पाहण्याची सुरुवात म्हणजे परिवर्तन.

स्वपरिवर्तनाच्या मार्गावर मी 6 वर्षांपूर्वी निघालेथिएटर ऑफ रेलेवन्सया तत्वज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये मी सुरुवात एक अभिनेत्री म्हणून केली. सुरुवातीला मला केवळ नाटक करायचे, अभिनय करायचा हेच ध्येय होते; पण ध्येयापलीकडे ध्येय असते हे इथे आल्यावर कळाले. खरंच आपण काम करतो, पण ते का करतो, कशासाठी करतो याचे अवलोकन करतो का? माझेही असेच काहीसे होते. नाटक तर करायचे पण ते रंगमंचावर आणि आधी जीवनातील नाटक बंद करायचे, ही विचारांची दृष्टी मला या स्वपरिवर्तनाच्या मार्गावर मिळाली. विचारांची ताकद, चिंतनाची सर्वव्यापकता आणि कलेची सात्विकता मला मिळाली.
जमिनीवर बसून आकाशात उंच भरारी घेण्याचे स्वप्नथिएटर ऑफ रेलेवन्समध्ये साकार झाले. एकदा दोनदा नव्हे तर अनेकदा. आकाशात उंच ढगांवर स्वार होऊन प्रवास करण्याचा आनंद वेगळाचस्वतःचा उदय करून, सूर्योदय पाहण्याचा अनुभव वेगळाच..

एक असे दिवास्वप्न जे कधीच पाहिलं नव्हतं, हे स्वप्न पूर्ण झाले आणि माझ्या कलेच्या जोरावर मी चार देशाचे भ्रमण केले. हा अनुभव आहे युरोप दौर्‍याचा! पाण्याच्या खाजगीकरणाच्या विषयावरील नाटक (ड्रॉप बाय ड्रॉप वॉटरलेखन दिग्दर्शन मंजुल भारद्वाज) घेऊन आम्ही युरोप खंडातील चार देशात गेलो, तिथे 66 दिवस राहिलो. युरोपमधील प्रत्येक शहरात, खेड्यापाड्यात मी नाटकातून माझी गोष्ट सांगत होते, माझ्या देशाची भारताची गोष्ट सांगत होते आणि सोबत अखंड जगाची ही गोष्ट सांगत होते. कारण खाजगीकरण हा अख्ख्या जगाचा मुद्दा आहे आणि तो मुद्दा आम्ही आमच्या नाटकातून मांडत होतो. युरोपमध्ये नाटकाच्या प्रयोगासाठी, कार्यशाळांसाठी भ्रमण केले.
एक असते की परदेशी जाऊन आपण तेथील हॉटेलमध्ये राहतो; पण ते किती वरवरचे असते, आपण ना नीट त्या जागेला अनुभवत, ना तेथील जीवनशैली समजत, तिथलं आयुष्य अनुभवतच नाही. पण आम्ही युरोपमध्ये तेथील स्थानिक लोकांच्या घरी राहिलो. त्यामुळे ते कसे राहतात, त्यांची संस्कृती काय, हे खूप जवळून अनुभवता आले, त्यांच्यासोबत संवाद करता आला आणि आपली भारतीय संस्कृती, आपले जीवन, आपली कला यांच्या गोष्टी त्यांच्यासोबत share ही करता आल्या. तेथील संस्कृती, जीवनशैली, वास्तुकला म्हणजे तेथील लाल रंगांची कौलारू घरे, घरासमोरील फळा-फुलांनी बहरलेल्या बागा, नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली शेती पाहिली आणि हे जाणवले की युरोपमधील गावे शहरांपेक्षा खूप समृद्ध आहेत. तेव्हा मला प्रकर्षाने जाणवले की आपण भारत इतक्या जवळून कधी अनुभवला नाहीच, भारताची राज्य, छोटी छोटी खेडी तेथील जीवन आपण पाहायला हवे. म्हणजे भारत भ्रमण करायला हवे ही इच्छा जागृत झाली. आपला देश किती विविध आहे आणि सर्व संपन्न आहे हे युरोपात जाणवले.
आणि पुन्हा प्रवास सुरू झाला भारताचा !
भारत भ्रमण केवळ फिरायला जाणे म्हणून नाही तर स्वतःच्या कामासाठी भ्रमण. नाटकांच्या प्रयोगांसाठी, कार्यशाळांसाठी आम्ही संपूर्ण भारतभर प्रवास केला. एखाद्या पुस्तकाच्या पानाप्रमाणे एक पान उलटावे आणि एक अनुभव मिळावा असा प्रवास. भारताचे विशाल रूप या राष्ट्रीय कार्यशाळांमधून-प्रयोगांमुळे पहावयास मिळाले.
जेव्हा पालमपूर हिमाचल प्रदेश येथेराजनैतिक दृष्टी संपन्नताकार्यशाळा एका राजकीय पक्षाने आयोजिली होती, तेव्हा तिथे 16 राज्यांतून युवक-युवती आले होते. प्रत्येकाची भाषा वेगळी तरीही ध्येयं एक. इथला अनुभव हिमालयातील बर्फासारखा शीतल आणि प्रगल्भ होता. Learning process एक आणि अनुभव अनेक होते. इथे मी असे युवा पाहिले जे राजनैतिक प्रक्रियेला समजून देशाच्या व्यवस्थेबद्दल मनन आणि चिंतन करत आहेतदेशात घडत असणार्‍या आणि घडलेल्या घटनांना उलगडून त्यांच्या मुळापर्यंत जाण्याचा विचार करत आहेत. या कार्यशाळेत युवांनी राजनैतिक आत्मबोध प्रक्रियेत आधी स्वतः वैचारिक मंथन केले आणि आधी स्व-परिवर्तन मग देश परिवर्तन हा मार्ग अवलंबला.
नंतर देशाची राजधानीपासून अखंड भारत पाहिला आम्ही. मग भारतातील छोट्या खेड्यात-गावात आम्ही गेलो, प्रत्येक गावाची रचना वेगळी, भाषा वेगळी, चव वेगळी एवढी भिन्नता असूनही आपुलकी आणि सहवास तोच भारतीय. वास्तुशिल्प तर इतके सुंदर आणि विलोभनीय की काय सांगावं.
असाच एक अनुभव आम्ही हरियाणा रेवाडी येथे एका राजकीय पक्षाच्या कॅडर ट्रेनिंग workshop साठी गेलो होतो तेव्हा घेतला. तिथे आमची राहण्याची व्यवस्था एका भल्या मोठ्या हवेलीत केली होती. नजरेतही सामावणार नाही एवढी मोठी हवेली, पण ओसाड.”एका जुन्या हवेलीमध्ये workshop आहे.. हे आम्ही ऐकले आणि माझ्या मनात हिंदी movie मधल्या हवेल्या समोर यायला लागल्या, पण असे प्रत्यक्षात किती जण अनुभवतो. आपण tour ला जातो. शहरे किंवा त्या शहरातील विशेषता बघतो, पण त्या गावात असणार्‍या जीवन चक्राशी नाते नाही जोडत. हरियाणामधील रेवाडी जिल्ह्यात पिथडावास गावातील ही एक हवेली. आपल्या भारतात तळागाळात अशी कित्येक घरं असतील जी आपल्या भारतीय तत्वाचे दर्शन घडवतात. आपण किती वंचित असतो यांना जाणून घेण्यास, पण थिएटर ऑफ रेलेवन्सच्या माध्यमातून आम्ही इथे पोहोचलो आणि या प्रक्रियेने ही दृष्टी दिली.
ह्या हवेलीत कधी काळी पाय ठेवायला जागा नाही एवढ्या व्यक्ती वावरत होत्या. एक भला मोठा परिवार नांदत होता, पण आज ही रिकामी आहे. सगळे शहरात गेले आहेत का ? एवढी भली मोठी जागा रिकामी ठेऊन शहरातील कोंदटपणाला आपलेसे केलंय. इथल्या मोकळेपणाला सोडून पिंजर्‍याची कोंडी जवळ केलीये.. इथल्या शुद्ध हवेचा त्याग करून प्रदूषणाच्या विळख्यात बसले आहेत.. आजारपणाच्या कुशीत आहेत सगळे का ? हा प्रश्न सतत मला भेडसावत राहिला. या हवेलीला असंख्य दारे,खिडक्या आहेत,जे दर्शवतात मोकळेपणाची मानसिकता. गाय गुरांसाठी असलेली वेगळी जागा, झाडांच्या सान्निध्यात या घराला सतत विसावा मिळतो. आजची आपली भारताची स्थिती दर्शवत आहे ही हवेली ! हिच्या ओसाडपणाशी भारताचे भविष्य जोडले आहे. अशा हवेल्या जेवढ्या ओसाड बनत जातील तेवढे भारताचे भविष्य धोक्यामध्ये आहे हे जाणवते. कारण ही हवेली, ही गावं भारताचा पाया आहेत. या गावाच्या जोरावर आपण आर्थिक मंदीतही तग धरला होता, कारण आपली गावं स्वयंभू आहेत. पण आज या गावांच्या स्थितीने भारताचा पाया डळमळीत होतोय.
जागतिकीकरणाच्या विकासाच्या खोट्या आश्वासनात भारताचा कणा मोडून पडतोय. शहराच्या खोट्या चमकधमकमध्ये खर्‍या सुखाची आपण वेस ओलांडतोयहे या प्रवासात अनुभवले.
या राष्ट्रीय कार्यशाळांमध्ये एखादा विषय अजून सखोलतेने शिकवायचा असेल तर तो विषय आम्ही नाटकाच्या माध्यमातून सहभागींसमोर प्रस्तुत करायचो आणि मग त्याचे विश्लेषण व्हायचे. असाच एक अनुभव ‘Gender Sensetisation’ या विषयाला अनुसरून आम्ही मंजुल भारद्वाज लिखितमैं औरत हूँ या नाटकाची प्रस्तुती करायचो. हे नाटककलाकार आणि प्रेक्षकांसाठी आत्ममुक्ततेचं माध्यम आहे. नाटकात अभिनय करतानाजेंडर समानताच्या संवेदनशीलतेशी कलाकार एकरूप होतात आणि नाटक बघतानाप्रेक्षक’ ‘जेंडर बायसया अविर्भावापासून मुक्त होतात. एकदा झाले असे की, नाटकाच्या प्रयोगानंतर दाढी मिशी असलेले पुरुष सहभागी या नाटकाच्या प्रस्तुती नंतर ओक्साबोक्शी रडले. त्यांचे मनोगत त्यांनी व्यक्त केले की, “आतापर्यंत आम्ही स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली. अगदी बाहेर समाजकार्य करून घरातील स्त्रीची कुचंबणा केलीपण आताच्या क्षणापासून आम्ही पितृसत्तात्मक भारतीय समाजाची मानसिकता नाकारतो.
राजनैतिक दृष्टी संपन्नता हा विषय असल्यामुळे विचारधारा आणि राजनीतीची पवित्र बाजू मांडण्यासाठी आम्हीराजगतीया नाटकातील छोटे छोटे अंश प्रस्तुत करायचो. या नाट्य प्रस्तुतीतून आम्ही त्यांच्यासमोर विचार तर मांडायचो, पण त्याही पलीकडे एक महिला म्हणून जिथे स्त्रीकडे पाहण्याची एक कट्टर मानसिकता आहे अशा गावांमध्ये आम्ही एक माणूस म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. प्रत्येक स्त्रीचा एक संघर्ष आहे की तिला तिच्या शरीरापलीकडे एक व्यक्ती, एक माणूस म्हणून पाहावे आणि आम्ही माणूस आहोत ही स्पंदने सहभागींना जाणवली ही पावती आम्हाला या कार्यशाळांमध्ये मिळाली.

प्रवासाने आपण अधिकाधिक समृद्ध होत असतो. जेवढा प्रवास आपण बाहेर कैक मैल सर करून करतो तेवढाच प्रवास आपल्या बुद्धीचा होत असतो आणि आपण प्रगल्भ होत असतो. TOR रंगदर्शनच्या या नाट्य कारकिर्दीत मी अगदी खेड्यापाड्यांपासून शहरापर्यंत , मुंबईपासून विश्वंभरात माझ्या नाट्य कार्यासाठी प्रवास केला आणि या प्रवासाने मला व्यापक दृष्टिकोन दिला मी कलात्मकतेसाठीपरिवर्तनासाठी जगणार हा निश्चय कायम केला.
-सायली पावसकर.