सिंधुदुर्ग जिल्हयात नाट्य क्रांतीचे प्रयोग
तरुण भारत
बुधवार दि. १७ फेब्रुवारी २०१६
थिएटर ऑफ रिलेवंसचे आयोजन : शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न : उद्या होणार पहिला प्रयोग
शेती प्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात शेतकरी आत्महत्या का करतात, याचं नेमकं कारण नाट्यकलाकृतीच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे जनतेसमोर आणण्यासाठी थिएटर ऑफ रिलेवंस या क्रांतीकारी विचारांच्या नाट्य चळवळीने सिंधुदुर्गात क्रांतीची बिजे पेरायला सुरुवात केली आहे. त्याचा पहिला भाग म्हणून कृषी महाविद्यालतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्येवर आधारित एका ज्वलंत नाटकाची निर्मिती केली आहे. या, आगळ्यावेगळ्या नाट्याचा पहिला प्रयोग १८ फेब्रुवारी रोजी ओरोस येथील 'सिंधु अॅग्रो फेस्ट' महोत्सवामध्ये होणार आहे.
नाटक हे करमणुकीचे साधन नसून ते खरे तर क्रांतीचे साधन आहे तो एक सिद्धांत आहे. त्यात प्रेक्षक हा सर्वात सशक्त व पहिला रंगकर्मी आहे. त्यानंतर लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार, अशी
सिंधुदुर्गनगरी : छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नाट्याचे मार्गदर्शन करताना थिएटर ऑफ रिलेवंसचे प्रमुख भारद्वाज व त्यांचे सर्व सहकारी.
विचारधारा मांडणारी मंजुल भारद्वाज यांची 'थिएटर ऑफ रिलेवंस' ही एक चळवळ आहे. १२ ऑगस्ट १९९२ रोजी या चळवळीची स्थापना झाली.
रंगभूमीच्या मनोरंजनाची चौकट मोडून रंगभूमी ही जगण्याचा सक्षम मार्ग आहे, हे तत्व आणि दृष्टिकोन प्रेक्षकांमध्ये रुजविण्याचे कार्य ही चळवळ करते.
'थिएटर ऑफ रिलेवंस' कलेसाठी कला या भांडवलशाहीच्या अवसरवादी आणि पलायनवादी भूमिकेला नाकारून उत्तम आणि सुंदर अशा मानवी विश्वाची रचना करण्यासाठी प्रेरित करते
आतापर्यंत सांप्रदायिक दंगली, बालमजुरी, महिला सबलीकरण, शिक्षण, खासगीकरण यासारख्या सामाजिक विषयांवर आधारित नाट्ये सादर करून लोकांचे जगण्याचे इश्यू सर्व समाजात पेटविण्याचे काम व समाजाला जागृत करण्याचे काम या चळवळीने केले आहे. सिंधु अॅग्रो फेस्ट या कोकणातील कृषी महोत्सवाचे औचित्य साधून या चळवळीने कोकणात पाऊल टाकले आहे. आधुनिक भारतातील शेतकरी आत्महत्या का करतात, याचा शोध घेऊन या आधुनिक भारताचा शेतकरी कसा असेल, त्याच्यासमोर कोणती आव्हाने असतील हा विषय घेत यापुढे शेतकरी मरणार नाही व त्यांच्याकडे
लक्ष नाही दिले तर हाच शेतकरी संपूर्ण देशाची व्यवस्था हाती घेतल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा विद्यामान व्यवस्थेला युवकांच्या माध्यमातून देण्यासाठी या चळवळीने काम करायला सुरुवात केली आहे.
नामवंत कलाकारांचा समावेश दी एक्स्स्रीमेंटल थिएटर फाऊंडेशन
यांची ही थिएटर ऑफ रिलेवंस चळवळ असून यामध्ये सुप्रसिद्ध रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्यासोबत त्यांच्या सहकारी अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर व तुषार मसके नामवंत कलावंत मंडळी देखील सिंधुदुर्गात युवकांना नाट्य मार्गदर्शन करण्यासाठी आली आहेत. या नाट्य निर्मितीसाठी घेण्यात येणाऱ्या कार्यशाळेत सहभागी मुलं स्वतः नाटक लिहून त्याचे दिग्दर्शन स्वतः करीत स्वतःच अॅक्टींग करणार आहे. या नाटकाचे सादरीकरण १८ रोजी अॅग्रो फेस्टीव्हलमध्ये होणार आहे
