- मंगल खिवंसरा - ९४३७४१२१२
४ एप्रिल २०२६ रोजी औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) मध्ये लेखक, दिग्दर्शक, रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांचे 'लोक-शास्त्र-सावित्री" हे नाटक सादर केले आहे.
२ तासांचे सलग नाटक इतर नाटकाप्रमाणे पडदा नाही, मध्यंतर नाही, लाईटस् प्रसंगानुरूप लाल, पिवळे आणि इतर फोकस पण पात्रांवर हे नाटक म्हणजे प्रेक्षकांवर झालेला 'अण्त्तस्त्रविरहीत' प्रश्नांचा भडीमार का? हा प्रश्न सतत विचारल जात होता.
नाटक पाहण्यासाठी आलेल्यांवर होणारा प्रश्नांचा भडीमार, प्रसंग आणि त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता यामुळे सभागृह विचारात बुडालेले. सभागृह फुल्ल भरलेले पण सगळ्यांच डोक्यात काहूर माजविणारे प्रश्न आणि आता पुढे काय? म्हणेपर्यंत नवीन प्रश्न समोर येत होता. खरं तर हे संगळे प्रश्न सगळ्यांचा आयुष्यात थोड्याफार फरकाने असतात. पण आम्ही कधी गांभीयाने घेत नाही. 'तुला काय कळते? काय समजते, गप्प बस." हे तर बायका नेहमीच ऐकतात पण कां प्रश्न कधी विचारत नाहीत. नाटक पाहणारी आमची मैत्रिण आता गप्प बसणार नाही. घर, समाजात आणि जिथे कुठे प्रश्न विचारायचे तिथे ती शंभर टक्के विचारणार.नाटकाची सुरूवात आणि त्यातील प्रसंग हुंबडाबळी तिच्या चितेवरील राख सगळ्यांना वाटून समाजमनाला प्रश्न विचारणारा प्रसंग मन हेलावून टाकतो. आजही हुंड्याचा प्रश्न गंभीर आहे. सी.आर. बी.च्या आकडेवारीनुसार दर तासाला एक महिला हुंड्यासाठी बळी पडते. आजही ९५% लग्नामध्ये हुंडा दिला जातो आम्हाला का हा प्रश्न पडत नाही. तो प्रश्न 'हुंडाबळी गेल्याल्या बहिणीची मुलीची राख वाटून करणे आणि आलेल्या सुजाण प्रेक्षकांना विचार करायला लावणे यातून आम्ही खरंच शिकलं पाहिजे. (म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो)
नारी मुक्तीची सापसीडी आणि परत परत सापाने खाणे यातून एक दृष्टी मिळते. या नाटकात अनेक प्रश्न विचारले गेले. मुलीचे शिक्षण महत्वाचे की घरकाम येणे, लग्नाला नवरा जे म्हणेल ते की आपण माणूस म्हणून आपल्या काय वाटते
आपल्यातही मन, भावना, मत आहे. तरी गप्प का बसायचं? नवऱ्याचा मार खायचा की प्रत्युत्तर द्यायचे? का मारतोस म्हणून त्याचा हात आम्ही वरच्यावर धरणार आहोत का? घटस्फोटासारखा मुद्दाही आपण कधी विचारात घेणार का?
सासर, माहेर आणि मालमत्ता. खरं तर संविधानाने संपत्तीवरील समान मालकी दिली आहे. या प्रश्नावरील संविधानिक मूल्यांना घेऊन केलेली मांडणी आणि प्रसंग सुन्न करणारी होती. प्रत्येक ठिकाणी शोषणाच्या बळी आम्हीच का? सहन किती करायचे? माणूस म्हणून आम्ही कधी जगण्याचा विचार करणार की नाही? आपल्यासाठी कुणी तरी येईल, न्याय मिळवून देईल. माझ्या प्रश्नांसाठी कुणीतरी बोलेल आता याची वाट बघत न बसता 'मीच सावित्री" बनणार आणि प्रश्न विचारणा आणि प्रश्नही सोडविणार.
खचाखच भरलेले सभागृह खूप दिवसांनी बघितले. टाळ्यांचा कडकडाट कमी झाला कारण प्रश्न, प्रसंग आणि मांडणी डोकं सुन्न करणारे होते. एकामागून एक येणारे प्रश्न खुर्चीतही हलू देत नव्हते. नाटक पाहण्यासाठी आलेल्यांना स्टेजवर बोलावणे आणि मत विचारणे हे मी आजवर बघितले नाही.
खरं तर आपण आता नाटक पाहायला जावू तेव्हा स्टेजवर जावून कलाकारांना आपली मते सांगितली पाहिजेत हा संदेशही चांगलाच भावला.
आपल्याकडे प्रश्नांचे गाठोडे आणि तेही बायकांच्या खूप मोठे आहे. वेगवेगळे प्रश्न, मांडणी आणि ते मांडण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगळा. कुणी मोर्चे काढतो. कुणी आंदोलन करतो कुणी रस्ता रोको, कुणी घेराव घालतो, कुणी मूक पद्धतीने मोर्चा, उपोषण करून प्रश्न मांडतात. आपण जो मार्ग निवडला आहे तो केवळ 'नाटक दाखविणे' नाही तर समोर असलेल्यांना या माध्यमातून एक नवी दृष्टी देण्याचा आपला प्रयत्न नक्कीच सफल झाला आहे.
म्हणून बहिणाबाईंची आठवण झाली. "माणसा माणसा कधी व्हशील माणूस" तो माणूस नाही झाला तरी आम्ही सगळ्याजणी सावित्री होवू शकतो. म्हणून सन्मानाने जगू शकतो. म्हणून आपण विचारलेला प्रश्न "आपण कधी सावित्री होणार? याचेही प्रत्यक्ष फुले-शाहू-आंबेडकरांच्या राज्यात बघायला मिळो. त्यासाठी मुलीने आधी सावित्री झाले पाहिजे हे प्रत्येक बाईने ठरवावे लागेल.
'हम है' साथ मिलके चलेंगे, माणूस म्हणून जगू या..
जय भीम...!
https://www.torfoundationindia.org/


