Pages

Monday, May 27, 2019

मनुष्यतेच्या विध्वंसाची शब्दावली आहे कमर्शियल आणि प्रोफेशनल!

वस्तुकरणाच्या या महाकाळातील शोषणकारी शब्दावली आहे कमर्शियल आणि प्रोफेशनल. हे शब्द परमाणू बॉम्बपेक्षाही घातक आहेत. परमाणू बॉम्ब जीवनाला संपवतात; पण कमर्शियल आणि प्रोफेशनल हे शब्द “मानवतेला” नेस्तनाबूत करण्याच्या मार्गावर घेऊन जात आहेत. त्यांचा नेमका अर्थ समजून घ्यायला हवा…




आतापर्यंत मानवाची लढाई होती ‘माणूस’ बनण्याची, ‘माणुसकीला’ पुढे नेण्याची म्हणजे मनुष्य आपल्या ‘पशुतेशी’ संघर्ष करत आला आहे आणि त्यावर मात करत आला आहे. पण 1992 नंतर एक उलट काळ सुरू झाला.

मानवाने जेवढी ‘माणुसकी’ साध्य केली तिला एक ‘प्रोडक्ट’ करून नफा कमावण्याचा काळ सुरू झाला त्याचेच नाव आहे ‘जागतिकीकरण’. जागतिकीकरणाचा अर्थ आहे मानवतेचे ‘वस्तुकरण’. मानवी उत्क्रांतीचा सर्वात विध्वंसक काळ आहे ‘जागतिकीकरण’.


जागतिकीकरणाच्या या धोरणांनी पद्धतशीररित्या जगातील संवाद, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या चौसूत्री मौलिक प्रक्रियेला केवळ व्यापार आणि नफा-तोट्याच्या चौकटीत मर्यादित केले.




खरेदी विक्री हाच यांचा मंत्र आहे. जो विकणार नाही आणि खरेदी करणार नाही, त्याला या काळात जगण्याचा अधिकार नाही. हा मानवाचा पतन काळ आहे, ज्यात मानवाचे रूपांतर वस्तूत होत आहे.



वस्तुकरणाच्या या महाकाळातील शोषणकारी शब्दावली आहे कमर्शियल आणि प्रोफेशनल. हे शब्द परमाणू बॉम्बपेक्षाही घातक आहेत. परमाणू बॉम्ब जीवनाला संपवतात; पण कमर्शियल आणि प्रोफेशनल शब्द “मानवतेला” नेस्तनाबूत करण्याच्या मार्गावर घेऊन जात आहेत. पण कमर्शियल असण्याचा नेमका अर्थ समजून घ्यायला हवा…हा शब्द कुठून आला? कमर्शियल असण्याचा अर्थ आहे लूट. या लुटारू तंत्राला ‘कॉर्पोरेट’ म्हटलं जातं. या कॉर्पोरेटमध्ये मध्यमवर्गीय समूह काम करतो. मध्यमवर्गाचा अर्थच आहे कोणत्याही किमतीवर ‘उपभोग’ वा सुविधांचा उपभोग घेणारा वर्ग. स्वतःच्याच दिवा स्वप्नांच्या अपेक्षेत स्वतःचं शोषण करणारा वर्ग.



1992 च्या आधीदेखील वस्तू खरेदी केल्या व विकल्या जात होत्या; पण त्यामध्ये वस्तू निर्माणामध्ये लागणार्‍या श्रमाचे परिश्रमिक, मोबदला आणि इतर खर्च सामील होते. पण आज फक्त लूट होते आहे. इथे अति सामान्य उदाहरण घेऊया, शेतकर्‍याच्या शेतातून बटाटे 2-3 रुपये किलोने खरेदी करून, मल्टिनॅशनल कंपनी चिप्स तयार करते. हे चिप्स बाजारात 300-1000 रुपयापर्यंत विकले जातात. हीच परिस्थिती कोक,पेप्सी आणि इतर पेय पदार्थांची आहे. कोक आणि चिप्समध्ये काही ‘पौष्टिकता’ असते का? असते निव्वळ ‘चव’. याचा अर्थ ‘चव’ विका आणि पौष्टिकतेला मारा.

पौष्टिकतेचा अर्थ आहे स्वास्थ्य ..स्वास्थ्यचा अर्थ आहे मानसिक ‘स्वास्थ्य’… म्हणजे विचार…


हे ‘कॉर्पोरेटचे’ लूट तंत्र विचारांच्या विरुद्ध आहे. कोणताही विचार जो याच्या लूटमध्ये बाधा होतो, त्याला हे लूट तंत्र नष्ट करते. याची उदाहरणे सोशल मीडियावर पहा…कुठल्याही ‘तार्किक’ आवाजाला फेसबुक ब्लॉक करते. शोषणाच्या, धर्मांधतेच्या, व्यक्तिवादाच्या, सरकारी फसवणुकीला, कुकर्माना उलगडणार्‍या प्रत्येक आवाजाला नष्ट करत आहे जुकरबर्गचे फेसबुक. कारण त्याला विचार नाही नफा हवा आहे. विचारांच्या विनाशावर टिकून आहे, अत्यंत साधा वाटणारा शब्द ‘कमर्शियल’.. दुःखद बाब ही आहे की, संपूर्ण युवा पिढी या विकारवादी नरभक्षी आणि मानवतेच्या विरोधी व्हायरसने ग्रस्त आहे. हानीकारक हे आहे की त्यांना हे समजूनदेखील घ्यायचे नाही आहे, ‘प्रॉफिट’च्या समोर अंध झाले आहेत सगळे.



दुसरा शब्द आहे ‘प्रोफेशनल’ याचा संबंध तांत्रिकी निपुणतेशी आहे ज्याला बाजाराने ” मानवीय संवेदनांशी” जोडले. तंत्राच्या माध्यमातून मानवीय ‘संवेदनांचा’ उपभोग करणार्‍यांना ‘प्रोफेशनल’ असे म्हटले जाते. म्हणजेच मानवाचे दुःख, वेदना, आनंद यांना अभिव्यक्त करून त्याची सगळी धनसंपदा लुटणे आणि या लुटण्याला बोलतात प्रोफेशनॅलिजम. आजच्या पिढीला या कार्यासाठी प्रशिक्षित केले जाते जेणेकरून ‘लूट’ अनुवंशिक होईल आणि तंत्र कायम स्वरूपी सुरू राहील.



कमर्शियल आणि प्रोफेशनल या शब्दांचा प्रचार ‘मीडियाच्या, कलेच्या’ माध्यमाने केला जात आहे. सगळ्यात पहिले ‘लोकतांत्रिक’ व्यवस्थेचा ‘जन सरोकारी पक्ष म्हणजे पत्रकारितेला’ याचे शिकार बनवले गेले. जेणेकरून जागतिकीकरण या सुंदर शब्दाची कुरूपता दर्शवणारा कोणीही वाचणार नाही आणि मनुष्य वस्तूमध्ये बदलून जाईल.. विकत घेतला आणि विकला जाईल… नफेखोर भांडवलशाही व्यवस्था मानवतेचा विनाश करत राहील..!



कला वस्तू नाही आणि कलाकार वस्तुकरणाचा कारखाना नाही. जागतिकीकरण “कमर्शियल” आणि “प्रोफेशनल” सारख्या शब्दांनी कलेला “प्रोडक्ट” आणि कलाकाराला “फॅक्टरी” बनवू इच्छित आहेत. कलाकारदेखील स्वतःला “कमर्शियल” आणि “प्रोफेशनल” म्हणवून घेण्यात धन्यता मानत आहेत आणि मीडियादेखील दिवस-रात्र कलाकारांवर या शब्दांचा भडीमार करत आहे. कलाकार हे विसरून जातात की स्वतःला कमर्शियल आणि प्रोफेशनल म्हणवून ते एका औपनिवेशिक लुटीचा पाया रचत आहेत.



कला एक शोध आहे … निरंतर शोध … जो कुठेही थांबत नाही… कला जीवनाला निरंतर जीवन आणि माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी प्रतिबद्ध करत असते. जीवन आणि मानवी उद्देशांना स्पष्ट करत माणूस आणि माणुसकीचा बोध निर्माण करत असते… कलाकार साधक आहे… जो आपल्या कला साधनेने ओथंबून निघतो, स्वतः शोधलेल्या एका शरीराच्या अनंत शोधात स्वतःला समर्पित करून, आपल्या कलेने विश्वाला रचनात्मक दृष्टी देऊन प्रेरित करतो.



पेट की आग में जलने की बजाए

– मंजुल भारद्वाज


शोहरत,ताकत, दुनियादारी



भीड़,भेड़ चाल, चकाचौंध



बने बनाएं रास्तों से दूर ,



अनजाने बीहड़ों की खाक़



छानता है, प्रतिकूल मौसम को



अनुकूल बनाता है,



हवाओं के सर्द और गर्म



रुख में अपने को थाम



ऋतू को बदलता है



दूर दूर तक खाली



निर्जन, हवाओं में तपती



धरती की तपन को



आग उगलते सूर्य में



अपने पसीने से शीतल करता है



अपनी परछाई की छावं में



बैठकर अपने को साधता है



अपनी प्यास बुझाने के लिए



गर्म हवाओं में मृग तृष्णा के



पीछे भागने की बजाए



अपनी आँखों की नमी से



सूखे गले को गीला कर



वीरानों से जुझने का हौंसला



पैदा करे



पेट की आग में जलने की बजाए



अपनी ‘कुंडलिनी’ को जगाता है



वही बौद्धिक जमीन को लहलाता है



वही नये चिन्तन का सूत्रपात करता है



अपने चिंतन के चराग से



रोशन करता है दुनिया को



लिखता है इबारत नए इतिहास की



जिसके ‘पदचिन्हों’ पर सदियों तक



सजदा करती हैं ‘पीढियां’



गाती हैं प्रेम गीत



बजता है सरगम



मिलते हैं मनमीत



सजाते हैं मोहब्बत के ‘गुलिस्तां’



गुलज़ार होता है चमन



एक अनंत यात्रा के लिए ..



कलाकार, हा केवळ आपले पोट भरण्यासाठी कलाकार नसून मानवी जीवनाला कलात्मक प्रकृतीच्या लय आणि तालाशी जोडणारा आहे… म्हणूनच जेव्हा या प्रकृतीचा ताल आणि लय बिघडतो तेव्हा मनुष्य विध्वंसक होऊन स्वतःचाच विनाश करून घेतो. आज मानव आपल्या याच विध्वंसक रुपाच्या तोंडाशी बसलेला आहे आणि वर धूर्तपणे त्यालाच विकास म्हणतो आहे…. खरे पाहता चारही बाजूंनी हिंसा आणि हाहा:कार माजला आहे. कला आणि कलाकाराला बाजारू पद्धतीने आपल्या मुठीत पकडून, त्यांना केवळ एक कटपुतली बाहुली बनवून, एखाद्या बाजारी वस्तूच्या रूपात जनमानसात प्रदर्शित केले जात आहे, टाइम पास व उपभोगासाठी.



अशा आव्हानात्मक काळात थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताने कलात्मक चिंतन, कला आणि कलाकारांच्या कलात्मक गरजा, कलात्मक मौलिक प्रक्रियांना समजण्यासाठी आणि त्याच्या मंथनासाठी कलाजगताला उत्प्रेरीत केले आहे.



थिएटर ऑफ रेलेवन्स प्रोफेशनल आणि कमर्शियल या शब्दांना खोडून, निपुण आणि प्रतिबद्ध हे शब्द कलाजगताला प्रदान करत आहे.



कारण, कला ही उत्पाद आणि कलाकार हा उत्पादक नाही आणि जीवन नफ्यातोट्याची बॅलेन्सशीट नाही. यासाठी हा नाट्य सिद्धांत कला आणि कलाकाराला उत्पाद आणि उत्पादीकरणातून उन्मुक्त करत, त्यांना सकारात्मक, सृजनात्मक आणि कलात्मक ऊर्जेने उत्तम व सुंदर विश्वनिर्मिती करण्यासाठी प्रेरित आणि प्रतिबद्ध करते.




-मंजुल भारद्वाज (रंगचिंतक व तत्वज्ञ)



Sunday, May 19, 2019

अभिनय म्हणजे चेतनेचे वैश्विक तरंग…


कच्च्या मातीला आकार देतो तो शिल्पकार. अभिनयासाठी तीच कच्ची माती होणे आणि अभिनेता अभिनेत्रीचा संकल्प असणे ही दोन सूत्रे आहेत अभिनयाच्या परकाष्ठेला पुढे नेण्यासाठी. मी अभिनय का करते हे अभिनेत्याच्या आणि अभिनेत्रींच्या डोक्यात असणे गरजेचे आहे.


तिसरी घंटा होते आणि पडदा उघडतो. रंगमंचावर नेपथ्य दिसते. नेपथ्यानंतर यांत्रिक ध्वनींचा चढउतार. अति भावुकता ते अति शून्यात जाणे. नाटकात ठराविक वेळेनंतर हास्य, एका निश्चित वेळेनंतर भावनिकता किंवा अश्रू, ठराविक वेळेनंतर टाळ्यांचा गडगडाट, तंत्रज्ञानाचे संमोहन या सगळ्यामुळे प्रेक्षक म्हणजे रसिक खुश होतात. नाटकाची समीक्षा आणि प्रसिद्धी होतेहे सारे पहिल्या अनुभवल्यानंतर माझ्या समोर प्रश्न पडतो की अभिनय म्हणजे नेमके काय? आदीकाळापासून लिहून ठेवलेल्या शास्त्रामध्ये दिलेले सूत्र किंवा काही जणांनी केलेले स्वतःवरचे प्रयोग किंवा आधुनिकतेच्या नावाखाली यांत्रिक होऊन जाणे म्हणजे अभिनय का? किंवा अभिनय म्हणजे तंत्रज्ञान आहे का? की अभिनय हा स्वतःचा शोध आहे.

स्वतःचा असा शोध जो चरित्र म्हणजेच पात्र आणि नाटकाचे मूळ ध्येय स्वराला साधतांना मंचावर जिवंत होतो आणि केवळ मुखवटा राहता नाटकाच्या आत्म्याला प्रेक्षकांशी जोडतो आणि हेच अभिनयाचे तत्वएक कलाकार एका तत्वाला अभिव्यक्त करतो .. अभिनयाच्या माध्यमातून आपल्या भावना, विचार प्रकट करतोकलाकाराचे मुक्त उन्मुक्त भाव अभिनयाला उंची देतातमी अभिनयाला सुरुवात केली त्यावेळी एक ठोकताळे मनात होतेदिग्दर्शकाने ठरवलेल्या जागा, आणि लेखकाचे शब्द या चौकटीत अभिनय करायचाआणि भावनात्मक पक्ष साकारायचाचरित्र साकारण्यासाठी चरित्राला साजेशी वेशभूषा हवीच हे मानसिक जडत्व होते ….अभिनय आतून यायला हवा म्हणजे नेमके काय ? याची ओळख नव्हतीरंगभूमीवर अभिनय करताना entry exit, पाठ दाखवणे, हातवारे करणे या स्किल develop होत होत्याअभिनय हा कोणत्याही चौकटीत अडकणारा आविष्कार आहेछेडछाड क्यों या नाटकाच्या माध्यमातून अभिनयाची नव्याने जाणीव झालीपहिलीच जाणीव म्हणजे अभिनयासाठी आवश्यक असते ते निरीक्षणनिरीक्षण आजूबाजूचे, व्यवहाराचे, सामाजिक व्यवस्थेचे, प्रसंगांचे, मानसिकतेचे, स्वभावाचे, विविध मानवीय पैलूंचे….

एक उदाहरण असे आठवते कीछेडछाड क्योंया नाटकात माझी एक भूमिका आई म्हणून होती यासाठी मी साडी नेसली कारण हाच समज होता की चरित्राला आवश्यक वेशभूषा हवीपण थिएटर ऑफ रेलेवन्स प्रक्रियेने जाणवले की वेशभूषेपेक्षा त्या चरित्राची मानसिकता, वैचारिकता परिधान करणे जास्त आवश्यक आहे

गर्भ या नाटकाने माझ्यातील अभिनयाला एक नवीन उंची मिळाली ..गर्भ नाटक संपूर्ण आहे, ब्रह्मांड आहे. त्यामध्ये सगळे राजनैतिक वाद आहेत, पर्यावरण आहे, पृथ्वीचा गर्भापासून मानवीय गर्भापर्यंतचा प्रवास आहेगर्भ नाटकापासून आतून अभिनय येण्याची जाणीव व्हायला लागलीमुळात अभिनय म्हणजे केवळ शब्द नाहीत तर त्या शब्दांचा अर्थ, संदर्भ, दृश्य, अदृश्य साकार करणेया नाटकात असलेल्या वेगवेगळ्या छटा आणि सुराने माझ्यातील आवाजाला एक नवी दिशा दिली .. मुळात नाटक हे खोटे असते जे अभिनयाने आपण खरे करतो यात आवाजाचा मोठा वाटा असतो. आधी हे शिकवले गेले होते की, आवाज मोठा असावा, त्याचा throw शेवटच्या ओळीत बसणार्‍या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा. पण थिएटर ऑफ रेलेवन्सने त्या आवाजाने विश्वास कसा निर्माण करावा याचे सूत्र दिले आणि आवाजाला सखोलता दिली. आपल्या आवाजात असलेला वरवरचेपणा विश्वास निर्माण नाही करत, तर माझ्या पोटातला आवाज आणि त्याला असलेली वैचारिक जोड विश्वास निर्माण करते. कच्च्या मातीला आकार देतो तो शिल्पकार. अभिनयासाठी तीच कच्ची माती होणे आणि अभिनेता अभिनेत्रीचा संकल्प असणे ही दोन सूत्रे आहेत अभिनयाच्या परकाष्ठेला पुढे नेण्यासाठी. मी अभिनय का करते हे अभिनेत्याच्या आणि अभिनेत्रींच्या डोक्यात असणे गरजेचे आहे. अभिनय म्हणजे वेळ. अभिनय म्हणजे जागा. अभिनय मानवीय चेतनेचे वैश्विक तरंग आहेअभिनयाला भाषेची, काळाची, क्षेत्रवादाची मर्यादा नसते

अभिनय
मंजुल भारद्वाज
अमूर्त मूर्त का खेल है
मूर्त अमूर्त का मेल है
जिस्म रूहानी है
रूहानी जिस्म है
भाव विभोर, भाव शून्य
शून्य में तरंगित शून्य
तरंग से तरंगित शून्य
सच झूठ का रहस्य
रहस्य का झूठासच
जीवन का रंग
रंगों का जीवन
जीवन का रंगमंच
रंगमंच में जीवन
सत्ता का विद्रोह
विद्रोह की सत्ता
मौत, जीवन, मोक्ष
जन्म,मृत्य का खेला
है जीवन लीला
लीला का रंग
कल्पना का साया
समय की पाबंदी
काल की पकड़
कला का आयाम
नयनाभिराम, सौन्दर्य का अस्त्र
सौन्दर्य शास्त्र, मोहक पर सचेत
मुखौटे से अभिव्यक्त होती रूह की
सम्प्रेषणीय चैतन्य अवस्था अभिनय है !

अभिनेत्री किंवा अभिनेत्यासमोर संवाद येणे ते रंगमंचावर सादर करणे यामध्ये जी प्रक्रिया घडते तो म्हणजे अभिनय. कारण या प्रक्रियेत कलाकार अभिनयासाठी स्वतः मधल्या व्यक्तीला आवाहन करतो. मानसिक, भावनिक, शारीरिक आणि आध्यात्मिक पायर्‍यांशी स्वतःला जोडतो. गर्भ नाटकाच्या परफॉर्मन्स नंतर समीक्षकांनी दाद दिली की नऊ रसांच्या पलीकडे दहावा रस या नाटकात, अभिनयात दिसून येतो त्यावेळी जाणवले की अभिनय नऊ रसांच्या पलीकडे जाऊ शकतो. अभिनय म्हणजे एकीकडे प्रवाही होणे, पण त्याच बरोबर संतुलित असणे. अभिनय म्हणजे vibrations कलाकार अभिनय करतो आणि त्या अभिनयातील vibrations च्या स्पर्शाने प्रेक्षकांच्या मेंदूतील तरंगांना छेडतो. हा vibrational स्पर्श मानसिक जडत्वाला छेदतो. कलाकार रंगमंचावर परफॉर्म करतो त्याचवेळी तो स्वतःला प्रेक्षकांमध्ये बसून पाहतो हा क्षण अभिनयाला उच्चतम पातळी देतो आणि हा अनुभव मी या प्रक्रियेत घेतला. गर्भची अभिनय साधना साध्य करून मी थेट परदेशात भरारी घेतली. ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर या नाटकामध्ये गायन, वादन, नृत्य आणि संवाद हे अभिनयाचे समग्र आयाम घेऊन या नाटकाचे 26 प्रयोग युरोपमध्ये प्रस्तुत केले. युरोपियन अभिनय शैलीपलिकडे भारतीय नाट्यदर्शन थिएटर ऑफ रेलेवन्सच्या तत्वानुसार अभिनयाची वेगळी प्रतिमा युरोपियन प्रेक्षकांच्या मेंदूत रुजवून आलो.
मंजुल भारद्वाज लिखित दिग्दर्शित नाटक अनहद नाद unheard sounds of universe मध्ये तत्वांचा अभिनय केला. यात संघर्ष होता की तत्व कसे परफॉर्म करायचे कारण पारंपरिक पद्धतीत तत्व परफॉर्म करताना बाहेरील गोष्टींवर भर दिला जातो जसे अचानक वीज चमकते, पाऊस पडतो, निसर्गाचे चक्र बदलते. पण तत्वाला आकार नसते, रूप नसते अशावेळी तत्वाला अभिनयाच्या माध्यमातून अभिनेता अभिनेत्रीने सादर करणे हाच अभिनयाचा कलात्मक गाभा आहे. अभिनयात तत्वाची मांडणी व्यवहारिकतेने करतो आणि त्यातून तत्वाचे प्रमाण मिळते. प्रमाणातून तत्वाचे सत्व मिळते त्यावेळी तो अभिनय संपूर्ण होतो.. अभिनेता, अभिनेत्री आपल्या अभिनयाच्या जोरावर नाटकाच्या संहितेला जिवंत करतो. अभिनय करण्यासाठी संहितेचा अभ्यास, विचार, मंथन, मन करणे आवश्यक ठरते. गौतम बुद्धांचे आत्मदिपोभव म्हणजे गौतम बुद्धांच्या नाभीत ज्योत तेवताना दिसते, पण थिएटर ऑफ रेलेवन्सच्या नाटकामध्ये नाभी, कंठ आणि मेंदूमध्ये दीप प्रज्वलित होतो आणि समग्र प्रकिया माझ्यातल्या अभिनेत्रीच्या अभिनयाला एक व्यक्तीसोबत एक कलाकार म्हणून समृद्ध करते .. उन्मुक्त करते. हा अभिनयाचा प्रवास आम्हाला साधनेकडून सिद्धीकडे नेतो. या सिद्धीला आम्ही न्यायसंगत संविधानिक, लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी राजगती नाटकात सत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र आणि राजनीति ला एका सूत्रात बांधून राजनीति चे लोककल्याणकारी स्वरूप प्रेक्षकांत रुजवले.. आणि प्रेक्षक देशाचे मालक होऊन जागे झाले आणि प्रेक्षकांचे हे जागृत होणे माझ्या आतल्या कलाकाराची खरी उन्मुक्तता आणि सार्थकता आहे .. कलात्मक साधना आहे.

– अश्विनी नांदेडकर, रंगकर्मी


Sunday, May 12, 2019

चौकटी बाहेरचे सृजन


आपलं महानगर 

दिनांक - १२ मे  २०१९



आमचा हा दृढ विश्वास आहे की, परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता कलाकारांमध्ये असते. म्हणून आम्ही कलाकारांनी विद्रोह केला आणि नाटकाची ठरलेली चौकट मोडली, ज्यात पारंपरिक कोणत्याही गोष्टी नाहीत, उलटथिएटर ऑफ रेलेवन्सनाट्य सिद्धांताअंतर्गत कलात्मक प्रस्तुतींच्या माध्यमातून, नाटकाचे चिंतन प्रेक्षकांच्या मनात रुजवले आणि प्रेक्षकांना व्यक्त होण्याचा मंच प्रदान केला.

आपली मराठी रंगभूमी संपूर्ण भारतात नावाजली जाते. मराठी रंगभूमीवर एक नाट्य परंपरा आहे आणि तिला दर्शक संस्कार आहेत असेही म्हटले जाते. हौशी पातळीवरच्या राज्य नाट्य स्पर्धांतून रंगभूमीवर नवीन रंगकर्मी पदार्पण करतात.

या रंगकर्मींचा आपल्या मराठी रंगभूमीवरील नाट्य परंपरेनुसार प्रवास असा आहे की, आधी कॉलेजमधून एकांकिका करणे आणि मग हौशी नाटकांतून, राज्य नाट्य स्पर्धांमध्ये सहभाग घेणे, त्यानंतर तिथून व्यावसायिक रंगभूमीवर काम करायचे मग मालिका आणि मालिकांनंतर चित्रपट.इथे एक बाजू अशी दिसते की, हे कलाकार परंपरा पाळतात, परंपरेला जिवंत ठेवतात; पण ते कलात्मक सृजन करतात का? आपण असे समजूया की एकंदरीत 10 हौशी स्पर्धात्मक नाटकं वर्षभरात होतात. या 10 नाटकात 100 कलाकार काम करतात असं समजून चालूया, यातील 50 राज्य नाट्य व्यावसायिक नाटकात दिसतात, पाच मालिकांतून पुढे येतात आणि एखाद्यालाच चित्रपट मिळतो. रंगभूमी कलाकार घडवते मग बाकी 45 जातात कुठे? त्यांची जबाबदारी कोण घेतंम्हणजे परंपरा कायम ठेवण्यासाठी 45 कलाकारांचा बळी जातो असे नाही का वाटत ….मराठी नाटक हे केवळ परंपरा चालविण्यासाठी आहे का? आणि जर समृद्ध परंपरा आहे तर, आपली रंगभूमी सृजन का करीत नाही.

अशावेळी आपली मराठी रंगभूमी पुरोगामी प्रयोगशीलतेसाठी प्रतिबद्ध आहे का? हा प्रश्न माझ्यासमोर निर्माण होतो. परंपरा म्हणजे पूर्वनिर्धारीत मार्ग, जो रटाळ असतो, ज्याच्यात नावीन्य नसते, innovation नसते, शोध नसतो, परंपरा समाज आणि कलेला संपवते. जो सतत नवीन सृजन करतो तोच कलेमध्ये टिकतो. म्हणजे शैली किंवा परंपरा पाळण्याऐवजी नवीन सृजन करणे आपल्या कलाकारांची आणि रंगभूमीची गरज आहे आणि ती गरज कलाकारांची योग्यता विकसित करून त्यांना उन्मुक करते, तेव्हा कलाकार नवीन सृजन करतात. जसे पारंपरिक नाट्य शैलीत शिकवले जाते, ठसवले जाते की 1 अधिक 1 म्हणजे 2, म्हणजे ज्याचे उत्तर या ठरलेल्या ढाच्यात फिट बसेल तो सर्वश्रेष्ठ. पण मुळात जीवन 1 अधिक 1 असे नसतेच, आयुष्याची आव्हाने वेगळी असतात आणि तिथे हा ठरलेला ढाचा योग्य उत्तर देईलच असं नाही. प्रत्येकाची आव्हाने वेगळी, संघर्ष वेगळा, मार्ग वेगळा आणि समाधानही वेगळे. उत्तर काही येवो पण त्याचे बौध्दिक विश्लेषण करणे आवश्यक आहे. जीवनातील अनुभवातून कला निर्माण होते. जीवन जगताना आलेले अनुभव, प्रसंग, घटना, शिकवण या नाटकांतून थेट भिडणार्‍या असाव्यात. आपल्या रंगभूमीसाठी कार्य करत असताना आमचं हे मूल्य असतं, की मनोरंजन हा नाटकाचा एक भाग असावाच, पण त्याचे प्रमाण मात्र जेवणातील मिठाएवढे असावे, बाकी संपूर्ण आहार हा पौष्टीक असावा. नाटकाच्या माध्यमातून मेंदूचे बौद्धिक पोषण करण्यासाठी आम्ही कलाकार प्रतिबद्ध आहोत.

मराठी रंगभूमीने आता पारंपरिक पद्धतीऐवजी नवीन बदलाना स्वीकारण्याची सुरुवात केली आहे. थिएटरची दुरवस्था आणि नव्या सजग नाटकांची कमतरता रंगभूमीला नेहमीच जाणवते. त्यात मराठी रंगभूमीवर सातत्याने नवनवीन प्रयोग होत आहेत म्हणून आशा पल्लवित होत असतानाच रंगभूमी पुन्हा त्याच मानसिकतेत अडकलेली दिसते. भांडवलदारांनीदेखील कलेची समाजाप्रती काही जबाबदारी आहे, हे संपवलेच. कला म्हणजे फक्त मनोरंजन आणि उपभोगाची वस्तू. कलाकाराला नुसतं या नावावर भ्रमित केले की, “तुम्हाला पैसा आणि प्रसिद्धी मिळेल”. त्यामुळे कलाकार कलेतील तत्वांचा दुरुपयोग करतात. सत्तेला थेट भिडत नाही, जाब विचारत नाही. कारण मुळात सत्ता कलेला घाबरते, सत्तेची जिथे चालत नाही, सत्तेची जिथे पोहोच नाही तिथे कलाकार असतो.आता कलाकारांची ही जबाबदारी आहे की केवळ स्वतः स्थापित होण्यासाठी जागतिकीकरणाच्या षड्यंत्रात अडकून नाटक आणि रंगभूमीचा केवळ उपयोग करण्यापेक्षा, कलेला आणि आपल्या रंगभूमीला समृद्ध करण्यासाठी, कलेमध्ये नवीन सृजन करण्यासाठी आत्मशोध करणे अनिवार्य आहे. कारण आत्मशोध आणि कलेचा थेट संबंध आहे. आत्मशोध म्हणजे स्वतःशी connection,आत्म अध्ययन.

तशीच कला आहे, कला म्हणजे स्वतःचे स्वतःशी connection होऊन मग त्याचे सादरीकरण करणे. म्हणजे जीवनाचा सार, एक खोटी घटना घेऊन त्याला पुनः सत्यात जागृत करणे. तर कलाकार होण्यासाठी आत्मशोध किती आवश्यक आहे. पण कला केवळ व्यवहारासाठी असणे म्हणजे अस्तित्व हरवलेली प्रक्रिया. आत्मशोधातून स्वतःची जाणीव निर्माण होते . त्यासाठीचे कौशल्य स्वतःची ओळख, अस्तित्व काय, स्वतःची ऐकण्याची, बोलण्याची क्षमता काय, मेंदू काय, स्वतःचा space सोबत काय संबंध आहे, स्वतःचे आयुष्यातील ध्येय काय? – हे कलाकाराला स्पष्ट होते. कलाकार जेव्हा आत्म (स्वयं) सोबत जोडला जातो तेव्हा त्याला प्रसिद्धी मिळतेच. कारण प्रसिद्धी हे कलेचे अभिन्न अंग आहे.

आमचा हा दृढ विश्वास आहे की, परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता कलाकारांमध्ये असते. म्हणून आम्ही कलाकारांनी विद्रोह केला आणि नाटकाची ठरलेली चौकट मोडली, ज्यात पारंपरिक कोणत्याही गोष्टी नाहीत, उलटथिएटर ऑफ रेलेवन्सनाट्य सिद्धांताअंतर्गत कलात्मक प्रस्तुतींच्या माध्यमातून, नाटकाचे चिंतन प्रेक्षकांच्या मनात रुजवले आणि प्रेक्षकांना व्यक्त होण्याचा मंच प्रदान केला. म्हणजे कलाकारांच्या उन्मुक्ततेसोबत प्रेक्षक आणि रंगभूमीलाही उन्मुक्त केले. आमच्या सात्विक कलाकृतीने आपल्या मराठी रंगभूमीवर नवीन मापदंड प्रस्थापित केले जेणे रंगभूमीला मानसिक समाधान प्राप्त झाले. आमचे हे तत्व आहे की, कला निव्वळ कलेसाठी नाही. जिचे जीवनाशी काही घेणेदेणे नाही ती कला कशी असू शकते. कारण कलेचे मुख्य तत्व आहे आयुष्याला व्यवहारिकतेच्या जडत्वापासून मुक्त करणे. कला तीच आहे जी व्यवस्थेचे शुद्धीकरण करते. कला तीच आहे जी सत्तेला भिडते, जी माणसात माणुसकीचा भाव जागवते.

मराठी रंगभूमीचा हा इतिहास आहे की, ती नेहमी सामाजिक आणि राजकीय चळवळींसाठी तत्पर असायची; पण दरम्यानच्या काळात, प्रामुख्याने मध्यमवर्गीय, उच्चवर्णीय इतपत मर्यादित झाली आहे. आम्हा रंगकर्मींची ही मनीषा आहे की, आता पारंपरिक मर्यादा ओलांडून सर्वसामान्यांचा आवाज होण्याची अपेक्षा आपल्या मराठी रंगभूमीकडून आहे, आणि पुन्हा नव्याने व्यक्तिगत आणि व्यवस्थागत परिवर्तनासाठी उभं राहण्याची आवश्यकता आहे. ज्याने खर्‍या अर्थाने आपली मराठी रंगभूमी आधुनिक आणि पुरोगामी विचारांचा, जीवनदृष्टींचा विकास करेल आणि विश्वभरात कलात्मक क्रांतीसाठी नावाजली जाईल.

सायली पावसकर रंगकर्मी )



Sunday, May 5, 2019

नाटक म्हणजे चेतनेची ठिणगी


आपलं महानगर 

दिनांक - मे  २०१९ 



थिएटर
ऑफ रेलेवन्स नाट्य सिध्दांतानुसार प्रेक्षक हा सर्वात मोठा आणि सशक्त रंगकर्मी आहे. या नाट्य सिद्धांताने प्रेक्षकांच्या विषयांना, समाजाच्या मुद्यांना, प्रश्नांना घेऊनच नाट्य निर्मिती केली. नाटकाची प्रस्तुती व्यापक आणि समग्र आयमांनी होते, जिथे नाटक जीवनाचा आलेख मांडते, तेव्हाच ते प्रत्येक प्रेक्षकाला आपलेसे वाटते.

समाज नेहमी सत्याच्या शोधात असतो. त्याचे सत्य पोटापासून सुरू होऊन चेतनात्मक मुक्तीपाशी येऊन संपते. मात्र संपूर्ण समाजाचा 97 टक्के भाग या सत्यासाठी ईश्वर आणि सत्तेवर अवलंबून राहतो.
पोट भरण्याच्या आपल्या सत्य संघर्षात जीवन व्यतीत करून आपल्यासारखे निर्माण करून, जगाला निरोप देऊन निघून जातात. समाजातील केवळ 2 टक्के भाग मात्र त्या संसाधनांचा मालक बनून संपूर्ण व्यवस्थेचे संचालन करतो. सार्‍या सुखसुविधांचा उपभोग घेतो आणि 97 टक्क्यांची व्यवस्था प्रबंधन करतो, पाहतो. समाजातील एक टक्का आहे जो विज्ञान आणि कलेच्या माध्यमातून मनुष्याला मनुष्य बनून राहण्यासाठी उत्प्रेरीत करत असतो आणि मनुष्याच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक विकासाचे सूत्र संचालन करतो.

थोडक्यात एक टक्का भागात जे व्यक्ती आहेत, मग ते वैज्ञानिक असो, जग बदलणारे चिंतक, रंगकर्मी, माणुसकी घडवणारे असोत यांचा संघर्ष केवळ 2 टक्के भागातील लोकांसोबत असतो, जे जगातील सर्व संसाधनांवर कब्जा करून आहेत. या 2 टक्के लोकांकडे संसाधने आहेत; पण एक टक्के लोकांकडे संकल्प आहेत आणि संसाधने संकल्पांच्या जोरावर उभी राहतात. म्हणून 2 टक्के भागासोबत लढण्यासाठी एक टक्का भाग पुरेसा आहे.
97
टक्के समाजाबरोबर हा संघर्ष नसतोच, त्यांचा केवळ सहभाग अपेक्षित असतो.
समाज सत्याच्या शोधात निघाला; पण त्यामधील 97 टक्के केवळ आणि केवळ पोट भरण्याच्याच सत्यावर अवलंबून राहिले. म्हणूनच 97 टक्के समाजाचा भाग पोटापुढे नाही जाऊ शकला. यातून हे लक्षात येते की आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर पहा महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, गौतम बुध्द, कार्ल मार्क्स, छत्रपती शिवाजी महाराज अशा व्यक्ती एकच असतात.

1) सृजन करणारे त्यामध्येही बौध्दिक संवर्धन करणारे.
2)
बौद्धिक उन्मुक्ततेसाठी सृजन करणारे त्यातही रंगकर्मीं म्हणून सृजन करणारे.
3)
विवेकशील चिंतन करणारे मोजकेच असतात. त्यांच्या चिंतनाचा वाटा समाज घेतो. उदा. बाबासाहेब आंबेडकर समाजात बहुसंख्येने नाहीत ना, पण त्यांनी निर्माण केलेल्या संविधानावर देश चालतो. विवेकशील चिंतन नेहमीच समाजाला जोडते.
एकूणच सृजन करणार्‍या व्यक्तींची संख्या ही उपभोग घेणार्‍या संख्येएवढी नसणारच. सृजन आणि उपभोग या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. यामधील भेद समजायला हवा. त्यामुळे ही तुलनाच करणे योग्य नाही. संख्यात्मक तुलना करणे म्हणजे विवेकाला डावलल्यासारखे आहे.

माणसाच्या गरजा पूर्ण जरी झाल्या तरी हाव माणसाची पाठ सोडत नाही. हाव आणि लूट जागतिकीकरणाच्याखरेदी आणि विक्रीसूत्राचे प्राण आहेत. जागतिकीकरण मनुष्याच्या उत्थानाचा आत्मघाती काळ आहे. हा काळ मनुष्यासोबतच नैसर्गिक संसाधनांचा विध्वंस, ध्वनी तरंगांपेक्षाही अधिक वेगाने करत आहे. विध्वंसाचा हा संभ्रम आणि संमोहन काळ समाजाला माणसाऐवजी पशू बनवून आंधळ्या शर्यतीत पळवत आहे. या दुष्कर्माला विज्ञानापासून तयार झालेले तंत्रज्ञान मोठ्या आरामात निकाली लावत आहे. आज समाज मोबाईल फोन, इंटरनेट, टीव्ही आणि अशा सर्वच इलेक्ट्रॉनिक सामुग्रीने भरलेल्या गगनचुंबी इमारतीच्या पाषाण युगात राहत आहे. अशा समयी समाजाला वाचवण्याचे अमोघ शस्त्र आहे, त्याच्या मशीन झालेल्यामानवीय संवेदनांनाजागृत करून त्यांना मनुष्य असण्याची जाणीव करून देणे. या मनुष्याला मनुष्य बनवते तीकला’. म्हणूनच कलेच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या मनुष्यत्वाची जाणीव करून देणे अनिवार्य आहे. जागतिकीकरणाचे सत्ताधीशकलेच्याया स्वरूपाला घाबरतात म्हणूनच कलाकारांना राजश्रय देऊन आपला जयघोष लावून घेतात. अशा समयी सत्तेला प्रश्न विचारणारी कलाकृती विलुप्त होऊन जाते.

या विश्वात अशा अनेक व्यवस्था आहेत, ज्या कलेचा आणि कलाकाराचा आपल्या दरबारात आपल्या सत्तेच्या प्रसार- प्रचारासाठी उपयोग करतात, आजही अनेक ठिकाणी हे होताना दिसते. एकंदर जागतिकीकरणामुळे मानवीय संवेदना हरवत चालली आहे. बाजारामुळे मानवीय कृत्रिमता वाढत आहे.
समाजात कोणत्या कोणत्या स्तरावर असंतोष हा नेहमी बळावत असतोच. सत्तेच्या पाखंडाला समाज जाणतो; पण पोटाच्या सत्यापुढे बोलायला तयार होत नाही, पोट भरण्याच्या बेडीत अडकलेला असतो. पण मनुष्य होण्याची इच्छा त्याच्या आत उचंबळत असते. जेव्हा एका सात्विक कलाकृतीचा स्पर्श समाजाला होतो, तेव्हा तो पोट भरण्याच्या बेड्यांना तोडून शोषणाविरुद्ध आवाज बुलंद करतो आणि संपूर्ण समाज आपल्या माणूस असण्याचा हुंकार भरतो, आपल्या आतला आवाज ऐकतो.

ही चेतनात्मक आणि सांस्कृतिक क्रांती घडवून आणण्यासाठी कोणतीही गर्दी किंवा सैन्याची आवश्यकता नसते, बस एखाद दुसर्‍या बंडखोर कलाकारांच्या समूहाची आवश्यकता असते. हा समूह आपले कर्म करीत राहतो, कधी कधी राजश्रीत किंवा बाजारपोशीत कलाकार यांचे अनुकरण करतात. म्हणून जर कोणी समीक्षक असे म्हणत असेल की, सत्तेला प्रश्न विचारणारे नाटक चालत नाही तर त्यांनी हे समजणे अनिवार्य आहे की, अशी नाटके चालविण्यासाठी नाही तर ठिणगी पेटविण्यासाठी असतात.
सांस्कृतिक चेतनेची ठिणगी पेटवणारे कलाकार मूठभरच असतात.

रंगकर्म 
-
मंजुल भारद्वाज
रंगकर्म झूठ होते हुए सच है
जीवन सच होते हुए भी झूठ
सत्ता निष्पक्ष होते हुए पक्षपाती है
रंगकर्म पक्षधर होते हुए निष्पक्ष
सत्ता संवैधानिक होते हुए
चंद लोगों की हिरासत में है
रंगकर्म चंद सिरफिरों का
जुनून होते हुए उन्मुक्त
रंगकर्मियों सावधान
रंगकर्म झूठ है
झूठ में झूठ मिलाओगे
तो वो नुमाइश भर होगा
जनसरोकारों का पैरोकार नहीं
सत्ता के इशारों पर नाचता हुआ
गिरगिटी प्रवृती से लबरेज
जिस्मों का छद्म कर्म होगा
जीवन संघर्ष है
संघर्ष का हथियार रंगकर्म है
लालच जब जरूरतों को ढक ले
तो जीवन आडम्बरों के मुखौटे लगाता है
रंगकर्म मुखौटे उतार
जीवन को सच से रूबरू कराता है
जीवन सत से जन्मा रंगकर्म
सत्य की खोज का
कलात्मक स्वरूप है
स्व यानी आत्म
रूप यानी शरीर
अपने शरीर से बाहर
अपने अंदर देखने की
कला है रंगकर्म
झूठ का आभास लिए
सच का अहसास है रंगकर्म!

थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिध्दांतानुसार प्रेक्षक हा सर्वात मोठा आणि सशक्त रंगकर्मी आहे. या नाट्य सिद्धांताने प्रेक्षकांच्या विषयांना,समाजाच्या मुद्यांना, प्रश्नांना घेऊनच नाट्य निर्मिती केली. नाटकाची प्रस्तुती व्यापक आणि समग्र आयमांनी होते, जिथे नाटक जीवनाचा आलेख मांडते, तेव्हाच ते प्रत्येक प्रेक्षकाला आपलेसे वाटते.
आपण असे म्हणतो की प्रश्नातच उत्तर असते, म्हणून थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिध्दांताने प्रश्न उभे केले. या प्रश्नांची रेडीमेड उत्तरे देता समाजालाच शोध घेण्यास प्रेरित केले.

समाजातील हरवत चाललेल्या मानवी संवेदना जागरूक करण्यासाठी, माणुसकीचे मूल्य रुजविण्यासाठी आम्ही नाटक निर्माण (तयार) केले. आमचे हे कलात्मक ध्येयं संवाद संप्रेषणाच्या माध्यमाने प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहचवले. कला उद्योजकतेच्या माध्यमातून कलाकार थेट प्रेक्षकांना जाऊन भेटले, त्यांच्याशी संवाद साधून प्रेक्षकांमधील विचार जागवले. परिवर्तनासाठी त्यांना आव्हान केले आणि जेव्हा माणसाचा माणसाशी संवाद झाला तेव्हा प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले. अनेकांना संकल्पनेतील, विचारातील नावीन्य आवडले, प्रामाणिकपणा भावला, काही जण हे काही वेगळं आहे, म्हणून जोडले गेले. काहींना विचार थेट भिडला, तर काही मार्ग शोधत आले आणि जोडले गेले.
प्रेक्षकांसोबत साधलेल्या संवादांचा परिणाम असा झाला की, अशी वैचारिक नाटकं व्हावीत ही प्रेक्षकांची गरज निर्माण झाली. म्हणून पुढे प्रेक्षकच आयोजक झाले.

नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांना रंगमंचावर बोलावून त्यांच्यासोबत परिसंवाद साधला. नाटक, संकल्पना, दिग्दर्शन, कलाकार याविषयी चर्चा झाली. नाटकातील विचारांवर विचारविनिमय झाले, मत मतांतरे झाली यातूनही विचार पकडून प्रेक्षक आपली स्पष्ट भूमिका घेऊन गेले.
आज एक असा सजग प्रेक्षक वर्ग आम्ही निर्माण केला आहे, जो मराठी रंगभूमीवर नाटक पुढे नेण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन सहयोग करीत आहे.

आम्ही कलाकारांनी कलेतील मानवाला माणूस बनवणार्‍या या कलात्मक प्रक्रियांना अमलात आणले आहे.
पोटाच्या सत्याला मेंदूच्या सत्यासोबत जोडले आहे आणि हे सिद्ध केले की पोटाऐवजी (मेंदू) बौध्दिकता श्रेष्ठ !

-अश्विनी नांदेडकर, रंगकर्मी