आपलं महानगर
दिनांक - ५ मे २०१९
थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिध्दांतानुसार प्रेक्षक हा सर्वात मोठा आणि सशक्त रंगकर्मी आहे. या नाट्य सिद्धांताने प्रेक्षकांच्या विषयांना, समाजाच्या मुद्यांना, प्रश्नांना घेऊनच नाट्य निर्मिती केली. नाटकाची प्रस्तुती व्यापक आणि समग्र आयमांनी होते, जिथे नाटक जीवनाचा आलेख मांडते, तेव्हाच ते प्रत्येक प्रेक्षकाला आपलेसे वाटते.
समाज नेहमी सत्याच्या शोधात असतो. त्याचे सत्य पोटापासून सुरू होऊन चेतनात्मक मुक्तीपाशी येऊन संपते. मात्र संपूर्ण समाजाचा 97 टक्के भाग या सत्यासाठी ईश्वर आणि सत्तेवर अवलंबून राहतो.
पोट भरण्याच्या आपल्या सत्य संघर्षात जीवन व्यतीत करून आपल्यासारखे निर्माण करून, जगाला निरोप देऊन निघून जातात. समाजातील केवळ 2 टक्के भाग मात्र त्या संसाधनांचा मालक बनून संपूर्ण व्यवस्थेचे संचालन करतो. सार्या सुखसुविधांचा उपभोग घेतो आणि 97 टक्क्यांची व्यवस्था प्रबंधन करतो, पाहतो. समाजातील एक टक्का आहे जो विज्ञान आणि कलेच्या माध्यमातून मनुष्याला मनुष्य बनून राहण्यासाठी उत्प्रेरीत करत असतो आणि मनुष्याच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक विकासाचे सूत्र संचालन करतो.
थोडक्यात एक टक्का भागात जे व्यक्ती आहेत, मग ते वैज्ञानिक असो, जग बदलणारे चिंतक, रंगकर्मी, माणुसकी घडवणारे असोत यांचा संघर्ष केवळ 2 टक्के भागातील लोकांसोबत असतो, जे जगातील सर्व संसाधनांवर कब्जा करून आहेत. या 2 टक्के लोकांकडे संसाधने आहेत; पण एक टक्के लोकांकडे संकल्प आहेत आणि संसाधने संकल्पांच्या जोरावर उभी राहतात. म्हणून 2 टक्के भागासोबत लढण्यासाठी एक टक्का भाग पुरेसा आहे.
97 टक्के समाजाबरोबर हा संघर्ष नसतोच, त्यांचा केवळ सहभाग अपेक्षित असतो.
97 टक्के समाजाबरोबर हा संघर्ष नसतोच, त्यांचा केवळ सहभाग अपेक्षित असतो.
समाज सत्याच्या शोधात निघाला; पण त्यामधील 97 टक्के केवळ आणि केवळ पोट भरण्याच्याच सत्यावर अवलंबून राहिले. म्हणूनच 97 टक्के समाजाचा भाग पोटापुढे नाही जाऊ शकला. यातून हे लक्षात येते की आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर पहा महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, गौतम बुध्द, कार्ल मार्क्स, छत्रपती शिवाजी महाराज अशा व्यक्ती एकच असतात.
1) सृजन करणारे त्यामध्येही बौध्दिक संवर्धन करणारे.
2) बौद्धिक उन्मुक्ततेसाठी सृजन करणारे त्यातही रंगकर्मीं म्हणून सृजन करणारे.
3) विवेकशील चिंतन करणारे मोजकेच असतात. त्यांच्या चिंतनाचा वाटा समाज घेतो. उदा. बाबासाहेब आंबेडकर समाजात बहुसंख्येने नाहीत ना, पण त्यांनी निर्माण केलेल्या संविधानावर देश चालतो. विवेकशील चिंतन नेहमीच समाजाला जोडते.
2) बौद्धिक उन्मुक्ततेसाठी सृजन करणारे त्यातही रंगकर्मीं म्हणून सृजन करणारे.
3) विवेकशील चिंतन करणारे मोजकेच असतात. त्यांच्या चिंतनाचा वाटा समाज घेतो. उदा. बाबासाहेब आंबेडकर समाजात बहुसंख्येने नाहीत ना, पण त्यांनी निर्माण केलेल्या संविधानावर देश चालतो. विवेकशील चिंतन नेहमीच समाजाला जोडते.
एकूणच सृजन करणार्या व्यक्तींची संख्या ही उपभोग घेणार्या संख्येएवढी नसणारच. सृजन आणि उपभोग या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. यामधील भेद समजायला हवा. त्यामुळे ही तुलनाच करणे योग्य नाही. संख्यात्मक तुलना करणे म्हणजे विवेकाला डावलल्यासारखे आहे.
माणसाच्या गरजा पूर्ण जरी झाल्या तरी हाव माणसाची पाठ सोडत नाही. हाव आणि लूट जागतिकीकरणाच्या ‘खरेदी आणि विक्री’ सूत्राचे प्राण आहेत. जागतिकीकरण मनुष्याच्या उत्थानाचा आत्मघाती काळ आहे. हा काळ मनुष्यासोबतच नैसर्गिक संसाधनांचा विध्वंस, ध्वनी तरंगांपेक्षाही अधिक वेगाने करत आहे. विध्वंसाचा हा संभ्रम आणि संमोहन काळ समाजाला माणसाऐवजी पशू बनवून आंधळ्या शर्यतीत पळवत आहे. या दुष्कर्माला विज्ञानापासून तयार झालेले तंत्रज्ञान मोठ्या आरामात निकाली लावत आहे. आज समाज मोबाईल फोन, इंटरनेट, टीव्ही आणि अशा सर्वच इलेक्ट्रॉनिक सामुग्रीने भरलेल्या गगनचुंबी इमारतीच्या पाषाण युगात राहत आहे. अशा समयी समाजाला वाचवण्याचे अमोघ शस्त्र आहे, त्याच्या मशीन झालेल्या ‘मानवीय संवेदनांना’ जागृत करून त्यांना मनुष्य असण्याची जाणीव करून देणे. या मनुष्याला मनुष्य बनवते ती ‘कला’. म्हणूनच कलेच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या मनुष्यत्वाची जाणीव करून देणे अनिवार्य आहे. जागतिकीकरणाचे सत्ताधीश ‘कलेच्या’ या स्वरूपाला घाबरतात म्हणूनच कलाकारांना राजश्रय देऊन आपला जयघोष लावून घेतात. अशा समयी सत्तेला प्रश्न विचारणारी कलाकृती विलुप्त होऊन जाते.
या विश्वात अशा अनेक व्यवस्था आहेत, ज्या कलेचा आणि कलाकाराचा आपल्या दरबारात आपल्या सत्तेच्या प्रसार- प्रचारासाठी उपयोग करतात, आजही अनेक ठिकाणी हे होताना दिसते. एकंदर जागतिकीकरणामुळे मानवीय संवेदना हरवत चालली आहे. बाजारामुळे मानवीय कृत्रिमता वाढत आहे.
समाजात कोणत्या न कोणत्या स्तरावर असंतोष हा नेहमी बळावत असतोच. सत्तेच्या पाखंडाला समाज जाणतो; पण पोटाच्या सत्यापुढे बोलायला तयार होत नाही, पोट भरण्याच्या बेडीत अडकलेला असतो. पण मनुष्य होण्याची इच्छा त्याच्या आत उचंबळत असते. जेव्हा एका सात्विक कलाकृतीचा स्पर्श समाजाला होतो, तेव्हा तो पोट भरण्याच्या बेड्यांना तोडून शोषणाविरुद्ध आवाज बुलंद करतो आणि संपूर्ण समाज आपल्या माणूस असण्याचा हुंकार भरतो, आपल्या आतला आवाज ऐकतो.
ही चेतनात्मक आणि सांस्कृतिक क्रांती घडवून आणण्यासाठी कोणतीही गर्दी किंवा सैन्याची आवश्यकता नसते, बस एखाद दुसर्या बंडखोर कलाकारांच्या समूहाची आवश्यकता असते. हा समूह आपले कर्म करीत राहतो, कधी कधी राजश्रीत किंवा बाजारपोशीत कलाकार यांचे अनुकरण करतात. म्हणून जर कोणी समीक्षक असे म्हणत असेल की, सत्तेला प्रश्न विचारणारे नाटक चालत नाही तर त्यांनी हे समजणे अनिवार्य आहे की, अशी नाटके चालविण्यासाठी नाही तर ठिणगी पेटविण्यासाठी असतात.
सांस्कृतिक चेतनेची ठिणगी पेटवणारे कलाकार मूठभरच असतात.
रंगकर्म
-मंजुल भारद्वाज
-मंजुल भारद्वाज
रंगकर्म झूठ होते हुए सच है
जीवन सच होते हुए भी झूठ
सत्ता निष्पक्ष होते हुए पक्षपाती है
रंगकर्म पक्षधर होते हुए निष्पक्ष
सत्ता संवैधानिक होते हुए
चंद लोगों की हिरासत में है
रंगकर्म चंद सिरफिरों का
जुनून होते हुए उन्मुक्त
रंगकर्मियों सावधान
रंगकर्म झूठ है
झूठ में झूठ मिलाओगे
तो वो नुमाइश भर होगा
जनसरोकारों का पैरोकार नहीं
सत्ता के इशारों पर नाचता हुआ
गिरगिटी प्रवृती से लबरेज
जिस्मों का छद्म कर्म होगा
जीवन संघर्ष है
संघर्ष का हथियार रंगकर्म है
लालच जब जरूरतों को ढक ले
तो जीवन आडम्बरों के मुखौटे लगाता है
रंगकर्म मुखौटे उतार
जीवन को सच से रूबरू कराता है
जीवन सत से जन्मा रंगकर्म
सत्य की खोज का
कलात्मक स्वरूप है
स्व यानी आत्म
रूप यानी शरीर
अपने शरीर से बाहर
अपने अंदर देखने की
कला है रंगकर्म
झूठ का आभास लिए
सच का अहसास है रंगकर्म!
थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिध्दांतानुसार प्रेक्षक हा सर्वात मोठा आणि सशक्त रंगकर्मी आहे. या नाट्य सिद्धांताने प्रेक्षकांच्या विषयांना,समाजाच्या मुद्यांना, प्रश्नांना घेऊनच नाट्य निर्मिती केली. नाटकाची प्रस्तुती व्यापक आणि समग्र आयमांनी होते, जिथे नाटक जीवनाचा आलेख मांडते, तेव्हाच ते प्रत्येक प्रेक्षकाला आपलेसे वाटते.
आपण असे म्हणतो की प्रश्नातच उत्तर असते, म्हणून थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिध्दांताने प्रश्न उभे केले. या प्रश्नांची रेडीमेड उत्तरे न देता समाजालाच शोध घेण्यास प्रेरित केले.
समाजातील हरवत चाललेल्या मानवी संवेदना जागरूक करण्यासाठी, माणुसकीचे मूल्य रुजविण्यासाठी आम्ही नाटक निर्माण (तयार) केले. आमचे हे कलात्मक ध्येयं संवाद व संप्रेषणाच्या माध्यमाने प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहचवले. कला उद्योजकतेच्या माध्यमातून कलाकार थेट प्रेक्षकांना जाऊन भेटले, त्यांच्याशी संवाद साधून प्रेक्षकांमधील विचार जागवले. परिवर्तनासाठी त्यांना आव्हान केले आणि जेव्हा माणसाचा माणसाशी संवाद झाला तेव्हा प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले. अनेकांना संकल्पनेतील, विचारातील नावीन्य आवडले, प्रामाणिकपणा भावला, काही जण हे काही वेगळं आहे, म्हणून जोडले गेले. काहींना विचार थेट भिडला, तर काही मार्ग शोधत आले आणि जोडले गेले.
प्रेक्षकांसोबत साधलेल्या संवादांचा परिणाम असा झाला की, अशी वैचारिक नाटकं व्हावीत ही प्रेक्षकांची गरज निर्माण झाली. म्हणून पुढे प्रेक्षकच आयोजक झाले.
नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांना रंगमंचावर बोलावून त्यांच्यासोबत परिसंवाद साधला. नाटक, संकल्पना, दिग्दर्शन, कलाकार याविषयी चर्चा झाली. नाटकातील विचारांवर विचारविनिमय झाले, मत मतांतरे झाली यातूनही विचार पकडून प्रेक्षक आपली स्पष्ट भूमिका घेऊन गेले.
आज एक असा सजग प्रेक्षक वर्ग आम्ही निर्माण केला आहे, जो मराठी रंगभूमीवर नाटक पुढे नेण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन सहयोग करीत आहे.
आम्ही कलाकारांनी कलेतील मानवाला माणूस बनवणार्या या कलात्मक प्रक्रियांना अमलात आणले आहे.
पोटाच्या सत्याला मेंदूच्या सत्यासोबत जोडले आहे आणि हे सिद्ध केले की पोटाऐवजी (मेंदू) बौध्दिकता श्रेष्ठ !
पोटाच्या सत्याला मेंदूच्या सत्यासोबत जोडले आहे आणि हे सिद्ध केले की पोटाऐवजी (मेंदू) बौध्दिकता श्रेष्ठ !
-अश्विनी नांदेडकर, रंगकर्मी


No comments:
Post a Comment