Pages

Sunday, April 28, 2019

पाणी मानवाचा नैसर्गिक अधिकार


आपलं महानगर 
दिनांक - २८ एप्रिल २०१९ 



भारतातून
सुरू झालेला पाण्याचा प्रवास युरोपपर्यंत संपन्न झाला.. ‘ड्रॉप बाय ड्रॉप वॉटरपाण्याच्या खाजगीकरणाचा विरोध करणार्‍या या नाटकाचे युरोपमधील चार देशात 26 प्रयोग झाले आणि या नाटकाच्याच प्रक्रियेच्या माध्यमातून आम्ही युरोपियन मुलांसोबतयुवारंगाकर्मींसोबत, तिथल्या शिक्षकांसोबत 29 नाट्यशिबिरे घेतली. ६६ दिवस युरोपच्या रंगभूमीवर सादर झालेले हे नाटक मानवी जीवनात पाण्याचे महत्व पटवून देतच सोबत अनेक राजकीय मुद्यांवर प्रहार करते.

पाणी हेच जीवन आहे.
मानवाच्या निर्मितीपासूनच पाणी हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे

आईच्या गर्भातही पाणी असतेआणि मृत्यूनंतरही मोक्षासाठी अस्थीविसर्जनही याच पाण्यात होते

मानवी सभ्यतेच्या उत्क्रांती काळात पाणी हे मानवाच्या प्रगतीचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे.. म्हणून आपण मानवी सभ्यतेचा इतिहास पाहिला तर लक्षात येते की, मानवी संस्कृती ही नदीकाठी वसलेली आढळते..युफ्रेटीस, नाईल आणि सिंधू ही त्याची उदाहरणे आहेत..
एकूणच भारतीय वैश्विक स्तरावरील संस्कृतीत पाण्याचा प्रवाह आणि प्रवास सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आयमांनी घडत गेलेला उलगडत जाणारा आहे.

भारतातही पाणी आणि संस्कृतीचे नाते जवळचे आहे. आपण भारतीय आजही घरी आलेल्या पाहुण्यांना पहिले पाणी देतो..हॉटेलमधील उदाहरण घ्या. टेबलावर बसल्याक्षणी पाणी येते.. कुठेही घोटभर कोणी पाणी मागितलं तर शक्यतो कोणी नाही म्हणत नाही..ही आहे आपली भारतीय संस्कृती. आपल्या आजीआजोबांच्या काळात थोडं मागे जाऊन पाहिले की तुम्हाला आठवेल आपल्याकडे पूर्वी जागोजागी पाणपोई होत्या. ज्यात स्वच्छ-शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळायचे.. आज ही स्थिती काही ठिकाणी गावी गेल्यावर पाहायला मिळते की, बाहेर पाण्याचे माठ ठेवलेले असतातपण शहरांत हेच पाणी 20 रुपये बॉटलमध्ये विकत मिळते..विचार करा, पाणी जे काहीही शुल्क देता मिळत होते त्याच्यासाठी आज पैसे मोजावे लागतातहे खाजगीकरण आले कुठून ? याचा कधी विचार केला..

हल्ली एक संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत आहेकी दक्षिण आफ्रिकेतील एका शहरात तेथील सरकारने थेट नागरिकांना सांगितले की, आम्ही पाणीपुरवठा करू शकणार नाही..आता यात किती तथ्य आहे माहीत नाही, पण समजा अशी स्थिती खरंच उभी ठाकली तर ?
पाण्याविना पृथ्वीवर मानव जीवनाची कल्पनाही करवत नाही..आज आपण चंद्रापासून ते मंगळापर्यंत त्या ग्रहांवर पाण्याचा साठा आहे किंवा नाही याचा शोध घेत आहोत. पाणी हा आपला नैसर्गिक हक्क आणि गरज आहे. त्याचे खाजगीकरण होत आहे, हे सर्व आता जाणलं नाही तर भविष्यात पाणी या विषयावर युद्ध होईल.

पाणी हा आपला नैसर्गिक आणि जन्मसिद्ध अधिकार आहे. जगभरात पाण्याच्या खासगीकरणाचे धोरण सुरू आहे आणि सामाजिक आणि राजकीय धोरणांमुळे सामान्य व्यक्ती पाण्यापासून वंचित आहे.
रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखितदिग्दर्शितड्रॉप बाय ड्रॉप वॉटर (इंग्रजी नाटक)” या नाटकात वरील विषयांना थेट मांडले आहे.
नाटक हेच दाखवीत पाणीबचत, सुरक्षा जलसंवर्धन ही मूल्य मानवी संस्कृतीमध्ये रुजवत आहे. पाण्याची उत्पत्ती, उत्सव आणि विध्वंस असा प्रवास या नाटकाचा आहे .

भारतातून सुरू झालेला पाण्याचा हा प्रवास युरोपपर्यंत संपन्न झाला.. ‘ड्रॉप बाय ड्रॉप वॉटरपाण्याच्या खाजगीकरणाचा विरोध करणार्‍या या नाटकाचे युरोपमधील चार देशात 26 प्रयोग झाले आणि या नाटकाच्याच प्रक्रियेच्या माध्यमातून आम्ही युरोपियन मुलांसोबतयुवारंगाकर्मींसोबत, तिथल्या शिक्षकांसोबत 29 नाट्यशिबिरे घेतली.
६६ दिवस युरोपच्या रंगभूमीवर सादर झालेले हे नाटक मानवी जीवनात पाण्याचे महत्व पटवून देतच सोबत अनेक राजकीय मुद्यांवर प्रहार करते.

जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले आणि पैसा हा जागतिक व्यवहाराच्या केंद्रस्थानी आला.

पाण्याच्या खाजगीकरणासाठी जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि मल्टीनॅशनल कंपन्या या सगळ्या आग्रही आहेत. त्यांनी पाणी या नैसर्गिक अधिकारावर कब्जा केला आहे. विकासाच्या नावाखालीपुनर्वसनाचे आश्वासन देऊन यांनी नद्यांच्या नद्या विकत घेतल्या, हे विकत घेतलेले पाणी मुंबई सारख्या शहरांना पुरवले गेले, पण तिथल्या स्थानिक लोकांना त्या नद्यांचे पाणी घेण्यासाठी पाबंदी घातली. विकासाच्या नावाखाली अंधाधुंधीकरण होते आहे, त्यामुळे गावे नष्ट होत आहेत, नद्या नष्ट होत आहेतआणि शहरांमध्ये राहणारे लोक साधा हा देखील विचार करत नाहीत की, आपला विकास दुस-यांच्या शोषणातून तर होत नाही ना ?

विकासाच्या नावाने उद्योग धंदे, इंडस्ट्री सुरू झाल्याआपल्याकडच्या समुद्र, नद्यांची, सरोवरांची स्थिती आपण पाहतोच, जगभरातही ती तशीच आहे. पाणीसाठे झपाट्याने कमी होताहेत. वाढणार्‍या तापमानामुळे वाफ होण्याचे प्रमाण वाढले आहे. जे काय पाणी शिल्लक आहे ते औद्योगिक, घरगुती तसेच रासायनिक उत्सर्जनामुळे प्रदूषित होत आहे.

जमिनीखाली पाणी आहे, पण भांडवलदारांनी जमिनीखालचे पाणी शोषून घेतले आणि पेप्सी, कोकाकोला यांसारखे पेय तयार करण्यासाठी फॅक्टरी उभ्या केल्या आणि पेय विकली जातात गावांच्या जीवावर उभ्या राहिलेल्या शहरांमध्ये.
भूजलाचा दर घसरला आहेपाणी कमी त्यामुळे माती उपजाऊ, सुपीक नाही एकूणच निसर्गाचे चक्रच बिघडले..केवळ स्वतःच्या नफ्या आणि फायद्यासाठी या भांडवलदारांनी संपूर्ण पृथ्वीला वेठीस धरले आहे.
आपली भारतीय संस्कृती किती विविधतेने नटलेली आहे. आपण हा विचार करायला हवा की विकासाच्या नावाखाली ती उत्पादित तर बनत नाही ना !
आपल्यासाठी म्हणजे मानवासाठी पृथ्वी हे एकमेव ठिकाण आहे जिथे आपण राहू शकतो.

आपलं मानवी शरीर अग्नी, वायू, माती, आकाश आणि पाणी पंचतत्वाने निर्माण झाले. बाकीची चार तत्वे तर ब्रह्मांडामधील सर्व ग्रहांवर आहेत. पाणी फक्त पृथ्वीवर आहेआपल्या पृथ्वीवरील या अमूल्य ठेव्याचे आपण काय केले..अमूल्य अशा पाण्याचे महत्त्व आपण जाणतो का ? याचा विचार करूया !

थेंबाथेंबात जीवन आहेम्हणून थेंब थेंब वाचवूया !

पाणी हा जन्मसिद्ध नैसर्गिक अधिकार आहे, म्हणून पाण्याचे खाजगीकरण थांबवूया !

सायली पावसकर (रंगकर्मी)




No comments:

Post a Comment