Pages

Tuesday, December 31, 2024

मानवी मूल्यांचा आशावाद - संजय डहाळे

 मानवी मूल्यांचा आशावाद
- संजय डहाळे

मानवी मूल्यांचा आशावाद - संजय डहाळे




गर्भ' या शीर्षकाभोवती एक हिंदी प्रायोगिक नाट्य गुंफण्यात आले असून कल्पक दिग्दर्शक मंजूल भारद्वाज यांनी यात लेखन, दिग्दर्शन यांची बहार उडवून दिली आहे. एक संदेश देण्याचा त्यात प्रामाणिक प्रयत्न असून त्यात एक्सपेरिमेंटल थिएटरचे रंगकर्मी यशस्वी झाले आहेत.

एक्सपेरिमेंटल थिएटरने १९९३ पासून महाराष्ट्रात आणि नंतर जगभरात आपली प्रायोगिक नाटके सादर केली. पथनाट्ये किंवा प्रायोगिक शैलीतली ही नाट्ये. बाबरी पाडल्यानंतर मुंबईत उसळलेल्या दंगलीवर त्यांनी 'दूर से किसी ने आवाज दी'चे सादरीकरण केले. पथनाट्य आणि रंगभूमीवर अशा दोन्ही शैल्यांत याचे आजवर हजारावर प्रयोगही झाले. १९९३ मध्ये 'देखादेखी'ची निर्मिती केली. त्यात एका दुष्टचक्रात अडकत जाणारा मध्यमवर्गीय होता. व्यंगात्मक शैलीत त्यात प्रहार होते. १९९४ साली बालमजुरीवर सत्यस्थिती मांडणारे 'मेरा बचपन'ने सातासमुद्रापार मजल मारली. जर्मनीतही याचे शेकडो प्रयोग झाले, घरगुती गुन्हेगारीवर 'द्वंद' हा दीर्घाक होता. त्याचे एक हजारावर प्रयोग झाले. १९९८ साली राजकीय व सामाजिक व्यंग असणाऱ्या 'नपुंसक' या दीर्घाकानेही रसिकांचे लक्ष वेधले 'मै औरत हूँ 'ही महिलांच्या प्रश्नावर बेतलेली नाटिका. त्याचेही देशभरात स्वागत झाले. विद्या ददाति विनयम, बी-७. धुंध, रेडलाइट, लाडली. विश्व द वर्ल्ड अशा डझनभर निर्मितींमुळे मंजुळ भारद्वाज यांच्याकडे जगभरातल्या नाट्य अभ्यासकांचे, रसिकांचे लक्ष वेधले गेले. सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक प्रश्न हे प्रामुख्याने यात मांडले गेले आहेत. त्याच वाटेवर 'गर्भ' हे नवे नाट्य लक्षवेधी ठरते.

अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, लवेश सुंभे, श्रद्धा मोहित या ताकदीच्या रंगकर्मीची 'टीम' आपल्या अभिनयातून आणि संवादातून 'गर्भ' साकार करते. मंजूल भारद्वाज यांचे लेखन  हे एखाद्या दीर्घकाव्याप्रमाणे आहे आणि रंगकर्मीची 'टीम' त्यांनी संवादाच्या विभागणीतून चांगली हलविली आहे. त्यामुळे लेखकाला जे काही मांडायचे आहे ते नेमकेपणाने पुढे येते. हालचाली आणि गाणी यामुळे नाट्य अधिकच प्रवाही बनते.

मी कुठून आलो? आणि जन्माला आल्यानंतर माझ्या मनाप्रमाणे जगू शकतो काय? प्रश्न हे विचारून त्याभोवती गर्भचे संवाद अक्षरशः घुमत राहतात. ज्याप्रमाणे जन्माला येणे हे आपल्या हाती नसते तसेच पुढच्या आयुष्यातही पदोपदी कुणीतरी काय करायचे ते सांगत असतो. होकार किंवा नकार गर्भातून आलेल्याला नसतो. एकूणच हा गर्भ सुरक्षित नाही. प्रसंगी चक्रव्यूहात अडकले जाते किंवा गर्भातून लाव्हा उफाळून येतो... नाटककार मंजूल भारद्वाज यांनी ओघवत्या शैलीत आपले विचार मांडले आहेत. एक तास वीस मिनिटे कालावधी असणारा हा

करण्यासाठी सज्ज आहे. आईच्या गर्भात अभिमन्यूप्रमाणे भूमिका करणारा सर्वश्रेष्ठ ठरतो. कारण तो गर्भातच चक्रव्यूहाचा भेद करण्याची कला शिकून येतो. त्यामुळे बाहेर पडल्यावर उभ्या दुनियेशी दोन हात करण्यासाठी तो सज्ज ठरतो असे विचार यात आहेत. संगीताची बाजू नीला भागवत यांनी सांभाळली आहे. त्यामुळे एकेक प्रसंग बहारदार होतो. अशा नाट्याला नेपथ्य व संगीत याचा वापर आवश्यक दीर्घाक आहे. त्यातील शीर्षकगीतही वातावरण निर्मिती चांगली करते. गर्भ हे प्रतीकात्मक नाट्य आहे. 'गर्भ' हे एक माध्यम बनवून त्यातून आपले मुद्दे मुद्द लेखकाने मांडले आहेत. त्यातील कल्पकताही नजरेत भरते.

गर्भात आज खरे सुरक्षित कोण आहे? तर जो गर्भ खऱ्या अर्थाने विकसित होत आहे. जो ठरावीक कालखंडात बाहेरच्या दुनियेत पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. आईच्या गर्भात अभिमन्यूप्रमाणे भूमिका करणारा सर्वश्रेष्ठ ठरतो. कारण तो गर्भातच चक्रव्यूहाचा भेद करण्याची कला शिकून येतो. त्यामुळे बाहेर पडल्यावर उभ्या दुनियेशी दोन हात करण्यासाठी तो सज्ज ठरतो असे विचार यात आहेत. संगीताची बाजू नीला भागवत यांनी सांभाळली आहे. त्यामुळे एकेक प्रसंग बहारदार होतो. अशा नाट्याला नेपथ्य व संगीत याचा वापर आवश्यक असतोच असे नाही. तरीही नाट्य मांडण्यासाठी त्याचा थोडाबहुत आधार घेतला आहे.

लेखक भारद्वाज यांनी छेडछाड क्यो? यात एकेठिकाणी म्हटले होते. हम युवती हैं. हम युवक हैं स्वयं निर्माण, समाज निर्माण देश निर्माण का जज्बा हममें है और समाज में अपने कार्य से एक मिसाल बनकर

बदलाव की मशाल बने !

आजच्या वेगवान युगात माणूस हा एका दुष्टचक्रात अडकत चालला आहे. जन्मापासून तो भरकटल्यागत जगतोय ही वस्तुस्थिती असली तरीही मानवी मूल्यांचा आशावाद 'गर्भ'मध्ये दिसतोय. हा सकारात्मक विचारही लाखमोलाचा आहे. हिंदी प्रायोगिक रंगभूमीवर नवनवीन 'प्रयोग' होताना दिसत असून जाणिवांच्या प्रगल्भता पुढे येत आहेत. हे प्रयोग मुंबईची संस्था आहे म्हणून फक्त मुंबईपुरते होत नसून सातासमुद्रापारही होत आहेत. त्याची व्यापकता ही नजरेत भरणारी. एक्सपेरिमेंटल थिएटर नवनवीन विषय मांडून उभ्या समाजाला जागं करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. 'गर्भ'च्या मागला आविष्कार हा सून करून सोडणारा आहे. त्याला काळ, वेळ, स्थळ याची कुठलीही बंधने नाहीत. भारद्वाज आणि त्यांची रंगकर्मी टीम एका दिशेने झपाटल्यागत आपल्याला काय मांडायचय, हे ठामपणे रंगभूमीच्या माध्यमातून मांडताहेत. त्याला असणारी हिंदुस्थानप्रेमाची झालर अन् सामाजिक परिवर्तनाचा ध्यास हा नोंद घेण्याजोगा.

sanjay.dahale@ymail.com