Pages

Sunday, March 24, 2019

मानवतेचा कलात्मक हुंकार


सामना 

दिनांक - २४ मार्च  २०१९ 








>> मंजुल भारद्वाज
थिएटरच्या पारंपरिक चौकटी मोडून गेली 27 वर्षे थिएटर ऑफ रिलेव्हन्सहे अभियान मंचीय आविष्कार सादर करीत आहे. रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी थिएटरला थेट सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडलं. त्यांच्या नाटकांनी माणसांना अस्वस्थ केलं. आपलं जीवन आणि आपला समाज याची स्वत: समीक्षा करायला शिकवली. 27 मार्च रोजी जागतिक रंगमंच दिनाच्या पार्श्वभूमीवर थिएटर ऑफ रिलेव्हन्सचे प्रणेते मंजुल भारद्वाज यांनी व्यक्त केलेले विचार

नाटक म्हटलं की एक हसरा आणि एक रडका असे दोन मुखवटे सादर केले जातात. ‘थिएटर ऑफ रिलेव्हन्समुखवटे घालत नाही तर काढते. अनमास्क करते. दुसऱया महायुद्धानंतर जागतिकीकरणाच्या झपाटय़ात माणसाचे वस्तूकरण झाले. तंत्राच्या नादात माणुसकी हरवली, संस्कृती उद्ध्वस्त झाली. भावनांचा व्यापार सुरू झाला. माणसालाही असं वाटू लागलं की, तो एक वस्तू आहे. ‘खरीदो और बेचोहे तत्त्व त्याने स्वीकारायला सुरुवात केली. तिथेच खरी माझ्या रंगचिंतनाला सुरुवात झाली. त्यातूनच एका नव्या रंगसिद्धांताची निर्मिती आणि मांडणी होत गेली. नवे रंगतत्त्व जगासमोर आले. त्याचेच नावथिएटर ऑफ रिलेव्हन्स’.
12 ऑगस्ट 1992 रोजी या अभियानाचा शुभारंभ करीतदूर से किसीने आवाज दीया नाटकाचा प्रयोग आम्ही केला. मला आजही तो दिवस आठवतोय. आमच्या कलाकारांना सफेत कुडते देताना मी सांगितले होते की, हे आपले कफन आहे. साधारणतŠ तो दंगलीनंतरचा काळ होता. खूप संवेदनशील परिस्थिती होती. आम्ही दंगलीच्या जागी जाऊन प्रयोग केले. द्वेष आणि घाव यांनी जखमी झालेल्या मनांवर प्रेमाची आणि माणुसकीची फुंकर घालण्याचा तो प्रयत्न होता. साऱयांनी शांतपणे प्रयोग बघितला. प्रयोग संपताच उपस्थितांमधूनइन्सानियत जिंदाबादअशा घोषणा आल्या. थिएटरच्या ताकदीचा सिद्धांत तेव्हाच उमगला. त्याच कलासिद्धांतावरून पुढे जायचा ठाम निर्धार झाला.
एसी थिएटर, भव्य रंगमंच, टाळ्यांच्या कडकडाटात दिलेली दाद असं काहीथिएटर ऑफ रिलेव्हन्सला अपेक्षित नसतं. जिथं माणसांना आमची खरी गरज आहे तिथं आम्ही पोचतो. आम्हाला हवं तिथं मंच उभा होतो. गल्ली, मैदान, शाळेचा परिसर, झोपडपट्टी.. अगदी कुठेही. आमच्या सिद्धांतानुसार थिएटर हा एक चैतन्यदायी अनुभव आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक परिस्थितीत तो वेगळा असतो, नवा असतो. तो बदलत राहतो. थिएटरसाठी मूलभूत गरज आहे ती एक सादरकर्ता आणि एक प्रेक्षक यांची.
गेल्या 27 वर्षांत थिएटर ऑफ रिलेव्हन्सने जीवनाला नाटकाशी जोडून एक रंगचेतना जागृत केली आणि रंगचेतनेला लोकांशी जोडले. विचारांची प्रयोगशाळा बनून आम्ही बदल घडवत राहिलो. ‘मेरा बचपननाटकाने देशभरात 50 हजारांहून अधिक बालमजुरांचे जीवन सुधारले ती मुले आज शाळा-कॉलेजांत शिकत आहेत. जागतिकीकरणाविरोधातबी 7’ नाटक केले. पाण्याच्या खासगीकरणाविरोधातड्रॉप बाय ड्रॉपवॉटरसादर केले. माणसाला माणूस म्हणून जगू देणारेगर्भ’, शेतकरी आत्महत्या, शेती विनाशावरसंघर्ष शेतकऱयाचानाटक केले. कला हे उत्पादन नव्हे आणि कलाकार उत्पादक नव्हेत हा संदेश घेऊनअनाहत नाद अनहर्ड साऊंड ऑफ युनिव्हर्सरंगमंचावर आणले. राजकारणाकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी देणारेराजगतीसादर केले. हे करताना प्रेक्षक इथून बाहेर पडताना सोबत काय घेऊन जातील याचा विचार केला. आम्ही कधीही प्रेक्षकांनारसिकहोअशी हाक मारीत नाही, आम्ही त्यांनासहसंवादीअसे संबोधतो. प्रेक्षक हाच पहिला सशक्त आणि प्रभावी रंगकर्मी असतो असं आमचा सिद्धांत सांगतो. सादरीकरणात प्रेक्षकांना सहभागी करून घेण्याचे अद्भुत प्रयोग आमचे सुरूच असतात. तुम्हाला विदर्भातील एका प्रयोगाचे उदाहरण देतो. प्रयोग सुरू असताना आमच्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या हातात राख दिली आणि ती देताना कलाकारांनी सांगितलं, ही त्या मुलीची राख आहे, जिची काल हुंडय़ासाठी तिच्या सासरच्यांनी जाळून हत्या केली. हातातील राख बघून प्रेक्षक अंतर्बाह्य थरारून गेले होते. भावनांचा कल्लोळ एका पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे त्यांच्यात आत घुसला. अशा संवादातून प्रेक्षक केवळ प्रेक्षक राहत नाहीत, तर तिथे प्रकट होणाऱया विचारांचा पोषक आणि विश्लेषक बनतो. असे अनेक प्रयोग थिएटर ऑफ रिलेव्हन्सने केले आहेत. पुन्हा सांगतो आमचे सादरीकरण फक्त प्रेक्षकांच्या टाळ्या वाजण्यापर्यंत मर्यादित नसते.
मला नाटक प्रेक्षकांनी शिकवलं. जोपर्यंत सामान्य माणसाला नाटक आपलं वाटतं नाही तोपर्यंत ते नाटकच नसतं हे मला लोकांनीच शिकवलं. हजारो कार्यशाळा आम्ही आयोजित केल्या आणि करत आहोत. कार्यशाळांच्या माध्यमातून रंगभूमीपासून दूर असणाऱया व्यक्तीच्या आत थिएटरचे रोपण करतो. त्यांच्यामध्ये जागरूकता, चेतना निर्माण करतात. मग ती व्यक्ती प्रेक्षक राहता रंगकर्मी होऊन जाते. रंगकर्माला केवळ मनोरंजनाचे वा अभिव्यक्तीचे माध्यम मानता आपल्या आत बदल घडवून आणण्याचा पाया मानतात. ही अनुभूती व्यक्तीमध्ये क्रांतीचा जोश भरते आणि क्रांतीची मशाल स्वीकारण्यासाठी तयार करते.
थिएटरचे व्यावसायिक, प्रायोगिक, समांतर हे भेद मला मान्य नाहीत. ही फसवणूक असते, ज्यामध्ये लोकांचा सहभाग तेच खरे मेनस्ट्रीमचे नाटक असे मी मानतो. म्हणून बहिणाबाईंचे गाणे मला नेहमीच मुख्य प्रवाहातील वाटत आले. तुम्ही लोकांमध्ये चेतनेची ज्योत किती तेवत ठेवता हे महत्त्वाचे असते. कठीण परिस्थितीत थिएटरला माणुसकीचा आवाज बनवण्याचे कार्य थिएटर ऑफ रिलेव्हन्स करीत आहे. कौशल्य आणि कटिबद्धता हे दोन शब्द आमच्यासाठी महत्त्वाचे ठरतात. सांस्कृतिक चेतना जागवून सुंदर मानवी विश्व निर्माण करण्यासाठी आपण सारे कटिबद्ध आहोत. जागतिक रंगमंच दिनाच्या पार्श्वभूमीवर तसे आव्हान मी तमाम रंगकर्मींना करतो.

– shilpa.surve6@gmail.com



No comments:

Post a Comment