आपलं महानगर
दिनांक :- २२ ऑगस्ट २०२१
12 ऑगस्ट 2021 रोजी थिएटर ऑफ रेलेवन्स या नाट्यसिद्धांताला 29 वर्षे पूर्ण झाली. आपल्या तत्वांवर ठाम राहत जगाला सुंदर आणि मानवीय बनवण्याच्या प्रतिबद्धतेची ही 29 वर्षं. या निमित्ताने धनंजय कुमार लिखित व मंजुल भारद्वाज दिग्दर्शित सम्राट अशोक या नाटकाची प्रस्तुती आम्ही थिएटर ऑफ रेलेवन्सच्या रंगकर्मींनी सादर केली. अध्यात्म अध्य आत्म म्हणजेच आत्म अध्ययन .. माणसाने माणूस म्हणून कसं जगावं हे सांगणारे अध्ययन. तालमीत सम्राट अशोक आणि अध्यात्म याचा थेट संबंध जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. स्व अध्ययन करणारी व्यक्ती अध्यात्माच्या शिखरावर असते. याची अनेक उदाहरणे आपल्या इतिहासात आहेत.
कलिंग! कलिंग! कलिंग! अशी गर्जना करत सम्राट अशोक नाटकातील ‘अशोक’ हे चरित्र माझ्यासमोर अवतरीत होते. रंगचिंतक मंजुल भारद्वाज सर हे चरित्र धारण करत रंगमंचावर प्रवेश करतात त्यावेळी सम्राट अशोकाचा सत्ता आणि अहंकाराचा हुंकार गुंजतो. या प्रयोगाच्या तालमीला मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. तालमीमध्ये पहिल्या दिवसापासून आतापर्यंत या चरित्राचा उंचावणारा आलेख, Depth, Grace आणि अभिनयाच्या अनेक मापदंडांना मोडीत काढून नव्या आयमांना सृजित करण्याचा मी अनुभव घेतला.
मी माझ्या जीवनात मराठी आणि हिंदी रंगभूमीवर विभिन्न नाटकांना जगले आणि काम केले आहे. सम्राट अशोकचे चरित्र मी आतापर्यंत पाहिलेल्या नाटकांच्या विविध कलाकारांच्या चारित्रांच्या कैक पलीकडे मला घेऊन जाते. सम्राट अशोक हे चरित्र पाहत असताना मंजुल सरांचे तीक्ष्ण डोळे, स्पंदीत होणारी स्पंदनं, शरीराच्या, हाताच्या, पायांच्या शार्प हालचालीतून प्रत्यक्षात उभा राहणारा सम्राट अशोक माझ्यातल्या अभिनेत्रीला खडबडून जागा करणारा होता.
12 ऑगस्ट 2021 रोजी थिएटर ऑफ रेलेवन्स या नाट्यसिद्धांताला 29 वर्षे पूर्ण झाली. आपल्या तत्वांवर ठाम राहत जगाला सुंदर आणि मानवीय बनवण्याच्या प्रतिबद्धतेची ही 29 वर्षं. या निमित्ताने धनंजय कुमार लिखित व मंजुल भारद्वाज दिग्दर्शित सम्राट अशोक या नाटकाची प्रस्तुती आम्ही थिएटर ऑफ रेलेवन्सच्या रंगकर्मींनी सादर केली.
अध्यात्म अध्य आत्म म्हणजेच आत्म अध्ययन .. माणसाने माणूस म्हणून कसं जगावं हे सांगणारे अध्ययन. तालमीत सम्राट अशोक आणि अध्यात्म याचा थेट संबंध जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. स्व अध्ययन करणारी व्यक्ती अध्यात्माच्या शिखरावर असते. याची अनेक उदाहरणे आपल्या इतिहासात आहेत. थिएटर ऑफ रेलेवन्समध्ये प्रत्येक नाटक एक संकल्पना घेऊन येते. तत्व आणि ध्येयावर उभे असते. ते तत्व कलाकार मोठ्या विश्वासाने आणि प्रतिबद्धतेने प्रेक्षकांसमोर मांडतो. आणि वैशिष्ठ्य म्हणजे ती तत्व व्यक्ती म्हणून आपल्या जीवनात उतरवण्याची सुरुवात करतो. सम्राट अशोक हे नाटक समग्र व्यक्तीत्व, स्टेट्समेनशीपच्या विचाराला घेऊन येते. स्व-अध्ययनाने परिवर्तनाची हुंकार भरते.
स्व-अध्ययनात व्यक्ती स्वतःमध्ये स्वतःला, परिवाराला, समाजाला, देशाला, विश्वाला आणि ब्रम्हांडाला सामावून घेतो. या प्रत्येक आयमाच्या प्रश्नांची उकल स्वतः करायला लागतो. स्वतः उकल करणे याचा अर्थ केवळ त्याच्या पातळीवर विचार करतो असे नाही. तर या पातळीला व्यक्ती स्वतःला निसर्गाशी एकरूप करतो. निसर्ग म्हणजे पंचतत्वांनी बनलेली एक अद्भुत आणि अनाकलनीय रचना. मनुष्य या अकल्पनीय रचनेचे सर्वांग सुंदर साध्य. पंचतत्वांनी बनलेल्या या निसर्ग वा प्रकृतीला आपल्या आत स्थान देण्यासाठी पंचतत्वानेच बनलेली ही व्यक्ती आपल्या पंचेद्रियांच्या माध्यमाला आवाहन करते.
नाटकातील सम्राट अशोक हे चरित्र केवळ या पंचेंद्रियांनाच नाही तर अमूर्त असणार्या आपल्या सहाव्या इंद्रियाला ज्याला आपण आत्मा, जाणीव, मन या शब्दात मांडतो या माध्यमातून जगासमोर अद्भुत परिवर्तनाचा प्रवास मांडते. सम्राट अशोक हे चरित्र ज्यावेळी या पंचतत्वाच्या माध्यमातून मी पाहते त्यावेळी निसर्गाने निर्मित झालेल्या नीतीनुसार त्याच्या जडणघडणीचा प्रवास समोर येतो. जसे की निसर्ग हा सर्वसमावेशी, परिवर्तनवादी आणि सृजनशील आहे. सम्राट अशोक स्वतःशी संघर्ष करत पंचमहाभुतांच्या तत्वांना आपल्यात उतरवतो.
अहंकाराच्या अग्नीत स्वतःला तापवतांना कलिंग युद्धाने झालेल्या जखमांच्या जाणिवेने त्याच्या मनात माणुसकीची संवेदना जागृत होतात आणि अहंकार नष्ट होतो.आपल्या अहं ला सोडून स्व: ची ज्योत पेटवून विश्वाला पाहतो. अहिंसेच्या ठोस मातीवर उभं राहून पाण्यासारखं निर्मळ आणि सर्व समावेशक आकाशाचे स्वरूप धारण करत सम्राट अशोक युगांयुगे आपल्या समोर अशोक स्तंभ म्हणजे आपल्या देशाची ओळख म्हणून उभा राहतो.धनंजय कुमार यांच्या लेखणीतून साकार झालेल्या या नाटकाचे शब्द रंगभूमीच्या मातीत एकरूप होतात आणि तिथून मंजुल भारद्वाज यांच्या अभिनयाने अंकुरित होत अवकाशात झेप घेतात. या नाटकाचे प्रथम मंचन युसुफमेहेरली सेंटर, तारा, पनवेल येथे झाले. आपला देश निर्माण प्रक्रियेत असंख्य क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाची गाथा रचली. युसुफमेहेरली ज्यांनी ‘भारत छोडो’ हा नारा आपल्याला दिला. त्या तमाम क्रांतिकारकांना त्यांच्या भूमीवर आम्ही ‘सम्राट अशोक’ नाटकाची प्रस्तुती त्यांना सुमनपुष्प म्हणून वाहिली. या संकट काळातही शासनाचे सर्व निर्बंध पाळून 45 ते 50 प्रेक्षक सम्राट अशोकच्या परिवर्तनाचे साक्षीदार बनले. आपल्या विकारांवर विवेकाने केलेली मात याची जाणीव जगले.
सद्य:काळाशी साधर्म्य आणि संदर्भ शोधत या नाटकाची प्रस्तुती मी अनुभवली. संविधानाच्या मूलभूत तत्वांचे मूळ सम्राट अशोकच्या शासननीतीमध्ये मिळते. 12 ऑगस्टची प्रस्तुती माझ्यासाठी अविस्मरणीय प्रस्तुती ठरली आहे. मंजुल भारद्वाज यांनी त्यांच्या अभिनयाने मला त्या काळात नेले. अशोकचा स्वतःशी, स्वतःच्या मनाशी झालेला संघर्ष त्यांनी प्रभावीपणाने मांडला. तालीमीच्या सुरवातीला मंजुल सरांसोबत रंगमंचावर उभं राहण्यात माझी गाळण उडाली होती. पण जसं जसं सरांनी थिएटर ऑफ रेलेवन्सचे ध्येय, नाटकाचे ध्येय आणि प्रत्येकाचे व्यक्तिगत ध्येय यांना समन्वयीत करून तालमीला स्पंदीत केले. मला मंजुल सर एका सहकलाकाराप्रमाणे जाणवले. सम्राट अशोक नाटकाला अध्यात्म, पंचतत्व, पंचेंद्रियांच्या दृष्टीतून अनुभवताना माझ्या नाटकातील चारित्र्याच्या चेतनेने माझ्यातल्या कलाकाराची उंची वाढली आणि कलाकार म्हणून दृढ विश्वास निर्माण झाला. एक कलाकार म्हणून या नाटकाच्या प्रस्तुतीने मला प्रचंड ताकद दिली. एक कलाकार म्हणून स्वामित्व दिले.
थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिध्दांताचे सुत्रपात रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी 12 ऑगस्ट 1992 साली केले होते. 2021 मध्ये थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिध्दांताला 29 वर्षे पूर्ण झाली. थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत आपल्या रंग आंदोलनातून मागील 29 वर्षांपासून देशात आणि जगभरात आपल्या कलात्मक प्रतिबद्धतेने हे सचेतन कलात्मक कर्म करत आहे. परिवर्तनाला उत्प्रेरीत करत मागील 29 वर्षांपासून थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताने सतत सरकारी, नीम सरकारी, कॉर्पोरेटफंडिंग किंवा कोणत्याही देशीविदेशी अनुदानाशिवाय आपली प्रासंगिकता आणि आपली मूल्य व कलात्मकतेच्या संवाद स्पंदनांनी मानवतेची गाज असणार्या या जनमंचाने जागतिक रूप धारण केले आहे. सरकारच्या 300 ते 1000 करोडच्या अनुमानित संस्कृति संवर्धन बजेटच्या विरुद्ध प्रेक्षक सहभागितेने उभे आहे हे रंग आंदोलन … मुंबईपासून मणिपूरपर्यंत !
थिएटर ऑफ रेलेवन्सने जीवनाला नाटकाशी जोडून मागील 29 वर्षांपासून सांप्रदायिक मुद्द्यावर ‘दूर से किसी ने आवाज़ दी’, बाल मजुरी वर ‘मेरा बचपन’, घरगुती हिंसेवर ‘द्वंद्व’, आपल्या अस्तित्वाचा शोध घेत अर्ध्या लोकसंख्येचा आवाज ‘मैं औरत हूँ’ , ‘लिंगनिदान’ या विषयावर नाटक ‘लाडली’ , जैविक आणि भौगोलिक विविधतेवर बी-7, मानवता आणि निसर्गाच्या प्राकृतिक संसाधनांच्या खासगीकरणाच्या विरोधात ड्राप बाय ड्राप : वॉटर, मनुष्याला मनुष्य बनून राहण्यासाठी गर्भ, शेतकर्यांची आत्महत्या आणि शेतीच्या होणार्या विनाशावर ‘किसानों का संघर्ष’, कलाकारांना कठपुतली बनवणार्या आर्थिक तंत्रापासून कलाकारांच्या उन्मुक्ततेसाठी नाटक अनहद नाद-अन हर्ड साउंड्स ऑफ युनिवर्स , शोषण आणि दमनकारी पितृसत्तेच्या विरुद्ध न्याय, समता आणि समानतेची हुंकार न्याय के भंवर में भंवरी, समाजात राजनैतिक चेतना जागवण्यासाठी ‘राजगति’, समतेचा एल्गार लोकशास्त्र सावित्री नाटकांच्या माध्यमातून फॅसिस्टवादी ताकदींशी लढत आहे !
कला नेहमी परिवर्तनाला उत्प्रेरीत करते. कारण कला मनुष्याला मनुष्य बनवते. जेव्हा विकार मनुष्याच्या आत्महीनतेमध्ये झिरपू लागतो तेव्हा त्याच्या आत समाविष्ट असलेला कला भाव त्याला चेतावणी देतो.
— अश्विनी नांदेडकर

No comments:
Post a Comment