आपलं महानगर
९ जून २०१९
जागतिकीकरण प्रत्येक मूल्य नष्ट करत आहे. परंतु, येथे आपण फक्त एक सामान्य माणूस नाही, कलात्मक कौशल्याने कुशल आहात. आपल्या स्वत:च्या या ताकदीवर टिकून राहा आणि ओळख कायम ठेवून प्रस्ताव स्वीकारा. रांगत नव्हे, तर पाठीचा कणा ताठ ठेवून आपल्या ‘कलात्मक मूल्यांवर’ टिकून राहा. प्रारंभिक धक्का दिल्यानंतरही बाजार आपले मत ऐकत आहे. बस सुरुवातीच्या धक्क्यांमध्ये आपली पतवार धरून ठेवायची आहे.
समर्पक कलाकार आहे. कलेसाठी जीवन समर्पित केले आहे. माझे शरीर लय, ताल घेऊन एका पात्राचा उपयुक्त आकार घेण्यास सदैव तत्पर आहे. माझ्या आवाजाला सतत अभ्यासाने पैलू पाडले आहे. अभिनय करताना चारित्र्याचा आवाज धारण करण्यामध्ये पारंगत आहे. भावमुद्रांना साधनेतून साध्य केले आहे. प्रत्येक पात्राच्या भावाला जिवंत करण्यास प्रवीण आहे. विचारांचा साधक आहे. तत्वाला एका व्यक्तिगत जीवनात जगतो. कलेची संकल्पना, त्याच्या निर्मितीच्या मूळ लक्ष्यापासून कधीच ध्यान भरकटवत नाही.. आणि म्हणूनच ‘कला ती जी मनुष्याला मनुष्य बनवते’ या मूळ ध्येयाला गाठण्यासाठी प्रतिबद्ध आहे किंवा असं म्हणायला हरकत नाही की हठयोगमध्ये पारंगत आहे. चेतनेच्या चैतन्य ब्रह्म सृजन स्वरूपामध्ये सिद्धहस्त सृजनकार आहे.
कलेची समर्पकता मला आध्यात्मिक संतुष्टी देते. पण माझ्या आसपासच्या सांसारिक गोष्टी मला प्रत्येक क्षणी निरर्थक करतात. समाज आणि बाजार कलेची एक विकली जाणारी छबी विकतात. नाचणे, गाणे, हतप्रभ करणे, भावविभोर करणे, हिंसेतून वीररस भरणे, गलथान पद्धतीने हसणे, अतिभावूक होऊन रडवणार्या कुशल, तार्किक विचारशून्य शरीरांना बाजार कलाकार म्हणून प्रस्थापित करतो आणि काही लोक जे विचार करतात त्यांना खरेदी करून नफा कमवत आहे. कलेच्या नावावर जगणार्या शरीरांचे पोट इतके वाढवतो की, ते स्टारपासून सुपरस्टार, सदीचा महानायक ते सुपर से उपर आणि फैंटाबुलस फैनटेसीपर्यंत काय काय होतात; पण त्यांच्या मुखातून हे कधी ऐकले नाही की माझे पोट भरले आहे. कारण बाजार गरजा पूर्ण करण्यासाठी नाही तर, लालसा वाढवण्यासाठी असतो.
यू डोंट नीड इट, बट यू वॉण्ट टू हॅव इट!
खरेदी आणि विक्रीच्या या काळात कलाकाराने काय करावे? कलाकाराने त्याच्या ‘व्यक्तिमत्वाची मूल्य स्वच्छ करत त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि दृष्टीकोन वाढवणे अनिवार्य आहे. केवळ भावविश्वात विहार करण्याऐवजी, प्रखर बुद्धीने कलेच्या नावाने येणार्या प्रस्तावांवर विचार करण्याची आवश्यकता आहे. हा देवाणघेवाणीचा काळ आहे. कलाकाराला प्रत्येक परिस्थितीत आपली ‘ओळख’ जिवंत ठेवावी लागणार आहे. ‘ओळखी’ला प्रसिद्धी हा पर्याय नाही. ओळख म्हणजे आपले ‘कलात्मक मूल्य’ आणि प्रसिद्धी म्हणजे आपल्या कलात्मक प्रतिभेची जन स्वीकार्यता. म्हणून ओळख म्हणजे ‘कलात्मक मूल्य’ व प्रसिद्धी म्हणजे कलात्मक प्रतिभेची जन स्वीकृती. जागतिकीकरण प्रत्येक मूल्य नष्ट करत आहे. परंतु, येथे आपण फक्त एक सामान्य माणूस नाही, कलात्मक कौशल्याने कुशल आहात. आपल्या स्वत:च्या या ताकदीवर टिकून राहा आणि ओळख कायम ठेवून प्रस्ताव स्वीकारा. रांगत नव्हे, तर पाठीचा कणा ताठ ठेवून आपल्या ‘कलात्मक मूल्यांवर’ टिकून राहा … प्रारंभिक धक्का दिल्यानंतरही बाजार आपले मत ऐकत आहे. बस सुरुवातीच्या धक्क्यांमध्ये आपली पतवार धरून ठेवायची आहे.
परंतु, बाजार आपल्या ‘कलात्मक मूल्यांचा’ सतत विध्वंस करत आहे. बाजाराला कलेची नाही वस्तूची गरज आहे. बाजार शरीराच्या मादकतेला भाववस्तू बनवून नफा मिळवत आहे. म्हणूनच अर्थच्या नावावरून आपल्याला भ्रमित केले जाते. सुरुवातीला पैसे नाही देत नंतर भरपूर पैसे देतात. या पैशांची चमक आपल्या दृष्टीस आंधळे करते. याच्या पलीकडे जाऊन स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःला या ओळीने प्रेरित करा. ‘एक माशी गुळाच्या ढेपेवर बसली, त्या ढेपेलाच ती चिटकली, गूळ वितळला ती त्यात रुतली, फसली आणि तिला स्वतःचा जीव गमवावा लागला’.
प्रसिद्धी नाही मिळाली तर त्याची खंत आणि मिळाली तर जगणे बेहाल.. म्हणून नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, की प्रसिद्धी ही तुमच्या कलात्मक कौशल्यांना मिळाली आहे आणि तुमच्या कलात्मक कौशल्यांचा आधार तुमची कलात्मक मूल्ये असतात. आपल्या यशाला वैयक्तिक यशापर्यंत मर्यादित करू नका, उलट आपली ‘कलात्मक मूल्ये’ अर्पित करून, कलेच्या मूळ ध्येयाला साध्य करणार्या साधनेच्या रुपात पहा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला ‘व्यक्तिनिष्ठ’ करण्याऐवजी ‘सार्वभौमिक’ स्वरूपात आपल्या जीवनाला समर्पित करा.
कलात्मक रूहें
समाधान के शोध में ,
उछलती, मचलती, डूबती
भावनाओं की तड़पती बहती धारा,
अपने तत्व की तलाश में
उलझता सुलझता मन
उष्णता, शीतलता के बीच
झूमती, डोलती काया
अपने होने, ना होने के समर में
अंदर, बाहर झांकते बिम्ब
चेतना के सूर्य का आत्मोदय
तत्व के यथार्थ को साधती
सिद्धहस्त करती सिद्धियाँ
अपने नाद को अनाहद में
परिवर्तित करती स्वरलहरियां
अपने कलात्मक सत्व को सुनती
गाती, गुनगुनाती कलात्मक रूहें !
-मंजुल भारद्वाज ( रंगचिंतक व तत्वज्ञ )


No comments:
Post a Comment